“देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा”
“देवाचे भीती बाळगा व त्याचे गौरव करा.”—प्रकटीकरण १४:७.
१. आम्ही कोणाचे भय बाळगावे व कोणाचे बाळगू नये?
आम्ही कोणाची भीती बाळगावी? निश्चितच अग्निवर्ण अजगराची, तसेच सैतान व त्याच्या दुरात्मसमूहाची नव्हे! १९१४ मध्ये स्वर्गात राज्याचा जन्म घडल्यानंतर ख्रिस्त येशूने यांना स्वर्गातून बाहेर हाकलून दिले. पण आता अपोक्लीप्समधील यानंतरचे दृष्टांत, देवाच्या उद्देशांना आपल्या शेवटल्या निकराच्या प्रयत्नात उलटवून टाकावे यासाठी सैतान या पृथ्वीवर ज्या संघटनेचा वापर करीत आहे त्याची माहिती देतात. यातील देखाव्यात दोन भयानक श्वापदे आणि मद्याने मस्त झालेली वेश्या—मोठी बाबेल या गोष्टी ठळक आहेत. तर मग यांना आपण भ्यावे का? मुळीच नाही! उलटपक्षी, आपण यहोवा व त्याच्या ख्रिस्ताला भ्यावे, कारण यांच्याच राज्याने सैतानाच्या भ्रष्ट जगाला त्याच्या अंतिम दंडाज्ञेपर्यंत आणले आहे.—नीतीसूत्रे १:७; मत्तय १०:२८; प्रकटीकरण १२:९-१२.
देवनिंदात्मक श्वापदे
२. आठव्या दृष्टांतात कोणते श्वापद दिसते व ते कशाचे प्रतिनिधित्व करते?
२ प्रकटीकरणाचा आठवा दृष्टांत उलगडतो तेव्हा मानवजातीच्या प्रक्षुब्ध सागरातून एक श्वापद वर येते. याला सात डोकी, दहा शिंगे आणि दहा मुकुट आहेत व ते याला सैतानाकरवी बादशाही अधिकार मिळाला आहे हे सूचित करते. ते यहोवाची निंदा करते आणि चिता, अस्वल किंवा अजगर ज्याप्रमाणे मानवाला इजा करते त्याप्रमाणे ते त्याच्या सेवकांना इजा करते, पण याचा अधिकार तात्पुरता आहे व तो त्याच्यासारखाच दिसणारा अजगर, दियाबल याकडून मिळाला आहे. दानिएल संदेष्ट्याने आधी पृथ्वीवरील राजकीय सरकारांना श्वापदाच्या रुपात चितारले होते व प्रत्यक्षात पाहता, सरकारांनीही स्वतः जंगली श्वापदांना आपली राष्ट्रीय चिन्हे या अर्थी कवटाळली, जसे की ब्रिटीशांनी सिंह व अमेरिकनांनी गरुड. (दानीएल ८:५-८, २०-२२) आता येथे आपण एक संयुक्त श्वापद बघतो जे पवित्र शास्त्र इतिहासातील सर्व राजकीय सत्तांना एकवटून आहे व यांनीच देवाच्या पृथ्वीवरील खऱ्या सेवकांना नेहमी जाच दिला होता. यापैकीची उल्लेखनीय “डोकी” मिसर, अश्शुर, बाबेलोन, मेद-पारस, ग्रीस, रोम, आणि शेवटली अँग्लो-अमेरिकन जोड जागतिक सत्ता, ही आहेत.—प्रकटीकरण १३:१, २; १२:३, ७-९.
३. (अ) श्वापदाच्या एका शिंगास “मरण येईसा घाव” कसा लागला? (ब) पहिल्या श्वापदाची मूर्ति तयार करण्यात दोन शिंगे असणारे श्वापद कसा पुढाकार घेते? (क) पहिल्या श्वापदाची नाम-संख्या काय आहे व त्याची सूचकता काय आहे?
३ १९१४-१८ च्या पहिल्या जागतिक युध्दात सातवी जागतिक सत्ता ग्रेट ब्रिटनने “मरण येईसा घाव” प्राप्त केला जो कदाचित प्राणघातक ठरला असता. पण अमेरिका त्याच्या सहाय्याला आली. आणि तेव्हापासून अमेरिका व ब्रिटन यांनी जोड जागतिक सत्ता यानात्याने आपले प्रभुत्व केले. याच सत्तेचे वर्णन योहान, “पृथ्वी” म्हणजे प्रस्थापित मानवी समाजातून सामोरे आलेले दोन शिंगे असणारे श्वापद असे करतो. हे दोन शिंगे असणारे श्वापद पहिल्या श्वापदाची मूर्ति तयार करण्यात पुढाकार घेते आणि त्यात जीवनी श्वास घालते. याकरवी अँग्लो-अमेरिकन जोड सत्ता ही लीग ऑफ नेशन्स आणि याची वारस संयुक्त राष्ट्रसंघ यांची पुरस्कर्ती आणि जीवन देणारी कशी ठरली ते चांगले चित्रित झाले. पहिल्या श्वापदाची संख्या ६६६ अशी आहे. सहा हा आकडा अपूर्ण—म्हणजेच सात या पवित्र शास्त्रीय पूर्ण संख्येचा एक उणा—आहे आणि सहाच्या तीनपटीत असणारी ही संख्या आजच्या मानवी शासनकर्त्यांची उच्चतम अपूर्णता सूचित करते. यहोवाचे साक्षीदार सरकारांचा आदर करतात आणि ते राहात असलेल्या देशाच्या कायद्यांचा अवलंब करण्यात उदाहरणशील आहेत तरीही ते “श्वापद” किंवा त्याची मूर्ति यांची भक्ती मोठ्या निर्भिडपणे टाळतात.—प्रकटीकरण १३:३-१८; रोमकर १३:१-७.
देवाची भीती बाळगा—का?
४. (अ) स्वर्गीय सियोन डोंगरावर कोण उभे असल्याचे दिसले, आणि देवाच्या राजासनासमोर असलेले २४ वडील कोणाचे प्रतिनिधित्व करतात? (ब) अभिषिक्त गात असलेले “नवे गीत” आणि मोठ्या लोकसमुदायामार्फत गायिले जाणारे “नवे गीत” यात कोणता फरक आहे?
४ आता तरी ती श्वापदे पुरेत! नवव्या दृष्टांतात आम्हाला एक उत्साहवर्धक फरक दिसतो व येथे आपले लक्ष कोकऱ्यावर केंद्रित होते. तो सियोन डोंगरावर उभा असून त्याच्यासोबत मानवजातीतून प्रथम फळ असे विकत घेण्यात आलेले १,४४,००० जण आहेत. यांच्यापैकीचे आज काही पृथ्वीवर हयात असले तरीही आध्यात्मिक दृष्टीने सर्व १,४४,००० जण “सीयोन डोंगर . . . स्वर्गीय यरूशलेम” याच्या समीप आलेले आहेत. (इब्रीयांस १२:२२) या दृश्यात देवाच्या राजासनासमोर २४ वडील दिसतात तेही योग्यच आहे कारण ते याच गटाला वेगळ्याच रचनेत—यांचे जणू आधीच पुनरुत्थान झाले असून ते राजे व याजक झाले आहेत—असे चित्रित करण्यात आले आहे. हे १,४४,००० लोक “एक नवे गीत” गात आहेत. ते, त्यांना राज्याचे वारसदार होण्यासाठी पृथ्वीवरून विकत घेण्यात आले त्या त्यांच्या अनुभवावर आधारित आहे. मोठा लोकसमुदाय देखील ‘यहोवाला एक नवे गीत गातो.’ पण हे वेगळेच गीत आहे ते या अर्थी की, ते राज्याच्या पृथ्वीवरील अंमलात सार्वकालिक जीवनाचे भवितव्य प्राप्त होण्याच्या संभाव्यतेवर गायिले जात आहे.—प्रकटीकरण ७:९; १४:१-५; स्तोत्रसंहिता ९६:१-१०; मत्तय २५:३१-३४.
५. (अ) अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्या दिव्यदूताकरवी कोणती घोषणा निनादविण्यात येत आहे व ती सार्वकालिक का आहे? (ब) हा देवदूत मोठ्याने कोणती आज्ञा करतो व ती योग्य का आहे?
५ आता दृष्टांत विस्तारित होतो. योहान आणखी एका दिव्यदूताला आकाशाच्या मध्यभागी उडताना पाहतो. त्याच्यापाशी केवढी आनंदाची बातमी आहे! ती सार्वकालिक सुवार्ता आहे, कारण तिचा अर्थ, देवाच्या या न्यायनिवाडाच्या घटकेला त्याची आज्ञा पाळणाऱ्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा आणि लोक यांमधील माणसांना चिरकालिक जीवन असा होतो. आत्ताच योहानाने पाहिलेल्या त्या भेसूर श्वापदाऐवजी या अद्भूत देवाची भक्ती का केली जाऊ नये व त्याचे गौरव का होऊ नये? कारण त्यानेच आकाश व पृथ्वीची निर्मिती केली. अस्तित्वात असणाऱ्या सचेतन आणि निर्जिव गोष्टींचा निर्माताही तोच आहे. याकरताच दिव्यदूताने मोठ्या खणखणीत आवाजात ही आज्ञा निनादविलीः “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा”! या देवदूताचा आवाज सबंध जगभरात ऐकला जात आहे आणि त्याचे हे निमंत्रण यहोवाचे साक्षीदार सबंध मानवजातीला २०० पेक्षा अधिक भाषांत प्रतिध्वनित करीत आहेत.—प्रकटीकरण १४:६, ७; यशया ४५:११, १२, १८.
मोठ्या बाबेलचे पतन
६. आणखी एक दूत कोणती आश्चर्याची बातमी कळवितो?
६ आणखी एक दूत दिसतो. तो जो संदेश सांगत आहे तो मोठा आश्चर्याचा धक्का देणारा आहे. तो म्हणतोः “पडली, मोठी बाबेल पडली. तिने आपल्या जारकर्माचा क्रोधरुपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजिला!” (प्रकटीकरण १४:८) त्यांना भुरळ घालून धुंद करणारी ही मोठी बाबेल कोण आहे?
७. मोठी बाबेल काय आहे व ती कशी वाढली?
७ प्राचीन बाबेल खोट्या धर्माचे उगमस्थान होते आणि त्याची वाढ होऊन ते पृथ्वीभरात दुरात्मिक जागतिक साम्राज्य बनले व यामुळेच त्याला “मोठी बाबेल” हे योग्य नाम मिळाले. या धर्म साम्राज्यात रोमने काही काळातच प्राबल्य मिळवले आणि येथेच धर्मत्यागी ख्रिस्तीत्व बहरले. आताही रोम बाबेलोनी धर्माचे जागतिक केंद्र आहे. हे १९८६ मध्ये तर उघड दिसले कारण यावेळी जगाच्या धर्मपुढाऱ्यांनी रोमच्या पोपच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन रोमजवळ असीसी येथील संमेलनात, संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेल्या आंतरराष्ट्रीय शांतीवर्षाखातर प्रार्थना म्हटल्या.
८. (अ) मोठ्या बाबेलीचे मोठे पतन कसे घडले व ही गोष्ट केव्हापासून दिसत आहे? (ब) शांतीसाठी धर्मपुढाऱ्यांनी ज्या प्रार्थना केल्या त्या सर्व निष्फळ ठरल्या आहेत हे कशाद्वारे दिसते?
८ तरीपण मोठ्या बाबेलीचे मोठे पतन घडले! ही गोष्ट १९१९ पासून खोट्या धर्माला जागतिकपणे जे कमी पाठबळ मिळत आहे त्याकरवी दिसत आली आहे. नास्तिकवादी कम्युनिस्ट मतप्रणाली आता पृथ्वीच्या मोठ्या भागावर वर्चस्व राखून आहे. आजच्या युवकांना उत्क्रांतीवाद शिकविला जातो जो देववचनाविरूध्द आहे. प्रॉटेस्टंट धर्म असणाऱ्या युरोपात फारच थोडे लोक चर्चला उपस्थित राहात आहेत, आणि पोप ठिकठिकाणचा प्रवास करून आपले कॅथोलिक साम्राज्य एकत्रित ठेवण्याचा लढा देत आहेत. जगाच्या धर्मांच्या अगणित देवांना केलेल्या प्रार्थना निष्फळ जात आहेत. रुथ एल. सिवार्ड यांनी कळविलेः “१९८७ मध्ये २२ युध्दे घडली व ही इतिहासात मागे अहवाल देण्यात आलेल्या कोणत्याहि वर्षांपेक्षा अधिक होती. या युध्दात आतापर्यंत जी प्राणहानी झाली आहे ती २२,००,००० आहे आणि ती वाढतच आहे.”a तर मग, असीसी येथे करण्यात आलेल्या प्रार्थना केवढ्या निष्फळ ठरल्या! तरीही १९८७ मध्ये या सभेच्या वार्षिकोत्सवाची आठवण म्हणून पोपनी एक नाणे काढले, ज्यात एका बाजूला त्यांच्याप्रमाणेचे चित्र आहे तर दुसऱ्या बाजूला प्रार्थना सभेचे चित्र आहे. “शांतीचे नाव नसता, ‘शांती, शांती’ असे” ते म्हणत राहतात.—यिर्मया ६:१४.
बाबेलची वेश्यावृत्ती उघड होते
९. मोठ्या बाबेलचे धर्मपुढारी कोणत्या अनैतिक मार्गाक्रमणाबद्दल कुविख्यात बनले आहेत?
९ प्रकटीकरण १४:८ दाखविते की मोठी बाबेल व्यभिचारी आहे. तिचे धर्मपुढारी आपल्या अनैतिक मार्गाक्रमणाच्या बाबतीत कुविख्यात झालेले आहे. टी व्ही सुवार्तिकांनी आपल्या कळपाच्या खिशाला लाखो डॉलर्सना कात्री लावली, पण याचवेळी त्यांनी निर्लज्ज वा बेशरमी अनैतिकताहि आचरली. कॅथोलिकांचे पाळकपणही आता प्रश्नात आले आहे जे फिलडेल्फिया, पेन्सिल्वेनियाच्या द बीकन जर्नल यात प्रसिध्द झालेल्या अहवालाकरवी सूचित आहे. जानेवारी ३, १९८८ च्या अंकातील हा अहवाल म्हणतोः “गेल्या पाच वर्षांपासून अमेरिकेत कॅथोलिक पाळकांकरवी शेकडो मुलांचा छळ होत असून त्यांना फार मोठा भावनिक आघात सहन करावा लागत आहे असे या प्रकरणांशी संबंधित असणारे पालक, मनोविकारतज्ञ, पोलिस अधिकारी आणि मुखत्यार म्हणतात.” लैंगिक अनीतीने मोठ्या बाबेलातील पुष्कळ धर्मपुढाऱ्यांची ख्याति काळपट केली आहे.
१०. (अ) प्रकटीकरण १८:३ मध्ये मोठी बाबेल हिच्या “जारकर्मा”विषयी जे सांगण्यात आले ते काय सूचित करते? (ब) प्रकटीकरण १८:२४ मध्ये निरिक्षिल्याप्रमाणे मोठ्या बाबेलच्या पुरोहितांवर प्रचंड रक्तदोष का आहे?
१० तरीपण, खोट्या धर्माने राज्यकर्त्यांशी जी प्रणयाराधना राखली आहे, त्यांच्या राजकीय मोहिमा, युद्धे यांना पाठबळ दिले आहे तसेच लोकांना श्वापदाच्या कोणा राष्ट्रीयवादी भागाची भक्ती करण्यास लाविले आहे हे सर्वकाही “आपल्या जारकर्माचा क्रोधरूपी द्राक्षारस” या विधानात खासपणे संदर्भित आहे. आपल्या ध्येयांची पूर्ति करण्यात धर्म हा अत्यंत उपयुक्त सोबती असल्याचे राजकारणी मुत्सद्यांना वेळोवेळी दिसले आहे. हे हिटलरने १९३३ मध्ये व्हॅटिकनसोबत जो समेट केला त्यात तसेच १९३५-३६च्या स्पॅनिश मुलकी युध्दात दिसले. दुसऱ्या जागतिक महायुध्दात दोन्ही बाजूकडील कॅथोलिक, प्रॉटेस्टंट, बुध्दीस्ट, आणि इतर धर्मांच्या पुरोहितांनी अशी हालचाल केली की ते जणू युध्दाच्या राष्ट्रीय तळमळीने धुंद झाले आहेत. १९१४ च्या युद्धापासून जितके लाखो सैनिक व मुलकी लोक ठार झाले त्याविषयीचा मोठा रक्तदोष यांचा आहे. याचप्रमाणे ज्या पुरोहितांनी फॅसिस्ट व नाझींना आपले पाठबळ दर्शविले तेही यहोवाचे साक्षीदार व इतरांना राजकीय बंद्यांच्या छावण्यात ठार करण्याच्या कृत्याचे रक्तदोषी आहेत.—यिर्मया २:३४; प्रकटीकरण १८:३, २४.
११. (अ) अभिषिक्त ख्रिस्ती आणि मोठा लोकसमुदाय यांनी कशाची भक्ती करण्याचे नाकारले? (ब) कोणते अद्भुत भवितव्य देवाची भीती बाळगण्याचे व त्याचे गौरव करण्याचे प्रबळ कारण पुरविते?
११ गेल्या ७४ वर्षांत निष्ठावंत अभिषिक्त ख्रिस्तीजन आणि त्यांच्याशी सोबत राखून असणारा वाढता लोकसमुदाय याने देवाची भीती बाळगली आहे व त्याचे गौरव केले आहे. आम्ही श्वापदाच्या कोणत्याहि राष्ट्रीयवादी भागाची भक्ती करण्याचे कटाक्षाने टाळले आहे. श्वापदाची मूर्ति—लीग ऑफ नेशन्स आणि संयुक्त राष्ट्रसंघ—यांचे गौरव करण्याचे नाकारले आहे. कारण, आम्हाला हे पूर्णपणे माहीत आहे की “आमच्या प्रभु [यहोवा] चे व ख्रिस्ताचे राज्य”च केवळ खरी शांती व निर्भयता आणील. आमचा ‘देवाची आज्ञा पाळण्याचा व येशूवरील विश्वास धरून राहण्याचा’ निर्धार आहे. या धीराचे प्रतिफळ आहे. “प्रभुमध्ये मरणारे” अभिषिक्त ख्रिस्तीजन धन्य आहेत असे म्हटले गेले आहे कारण “त्यांची कृत्ये त्यांजबरोबर जातात.” याचप्रकारे, मोठ्या लोकसमुदायातील कोणाला छळ, आजारपण, अपघात यामुळे मरण आलेच तर, त्यांनी देवाबरोबर जे मित्रत्व संपादले आहे त्याकरवी त्यांना ‘नव्या पृथ्वी’तील समाजात आरंभीचे पुनरुत्थान लाभण्याची शाश्वती देते. होय, हे भव्य व अद्भुत असे भवितव्य देवाची भीती बाळगण्याचे व त्याला गौरव देण्याचे प्रबळ कारण देते.—प्रकटीकरण ११:१५, १७; १२:१०; १४:९-१३; २१:१.
१२. कोणत्या दोन कापणी होतात व केव्हा?
१२ न्यायाची बजावणी होते तशी देवदूत दोन प्रकारच्या कापणीच्या हंगामाविषयी हाक देतात. पहिला कापणी करणारा हा अर्थात, येशू आहे जो १९१४ पासून राज्यवैभवाने राजासनी बसलेला आहे. त्याचे चित्र पांढऱ्या घोड्यावर बसलेल्या, डोक्यावर मुकुट असणाऱ्या स्वारासारखे, ‘मानवपुत्रासारखे’ दिले आहे. आताच्या प्रभुच्या दिवशी तो पृथ्वीवर विळा चालवून प्रथम अभिषिक्त ख्रिश्चनांच्या शेषांची व नंतर लाखो मोठ्या लोकसमुदायाची कापणी करतो. (पडताळा मत्तय २५:३१-३४; योहान १५:१, ५, १६.) पण तेच, दुसरीकडे ‘पृथ्वीच्या द्राक्षां’ची कापणी होते व त्यांना “देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात” फेकून देण्यात येते. हा हर्मगिद्दोनात बजावण्यात येणारा न्यायदंड असून त्यावेळी दुष्ट व गुंता झालेल्या मानवी समाजास पूर्णपणे उपटण्यात येईल व त्याच्या विषारी फळांचा चेंदामेंदा केला जाऊन लगदा बनविण्यात येईल. पृथ्वीची ही विषारी दाखलता काढून टाकण्याच्या वेळी यहोवाचे गौरव होवो!—प्रकटीकरण १४:१४-२०; १६:१४, १६.
‘यहोवा . . . नीतीमान व सत्य’
१३. (अ) दहाव्या दृष्टांतात पुनरुत्थित अभिषिक्त जन कोणते गीत गात आहेत, आणि त्याचे बोल काय आहेत? (ब) देवाचे नीतीमान न्यायदंड अगदी स्पष्टरित्या या दृष्टांतात कसे दाखविण्यात आले आहेत?
१३ प्रकटीकरणाच्या दहाव्या दृष्टांतात आपण पुन्हा देवाच्या राजासनासमोरील भव्य घटना पाहू लागतो. त्याच्यासमोर केवढ्या आनंदमय गोष्टी घडत आहेत बरे! देवाची भीती बाळगल्यामुळे व त्याचे गौरव केल्यामुळे विजय प्राप्त झालेले अभिषिक्त जन ‘मोशाचे व कोकऱ्याचे गीत’ गात आहेतः “हे सर्वसत्ताधारी यहोवा देवा, तुझी कृत्ये थोर व आश्चर्यकारक आहेत. हे सनातन राजा, तुझे मार्ग नीतीचे व सत्य आहेत. हे यहोवा, तुला कोण भिणार नाही, तुझ्या नामाचा महिमा कोण करणार नाही? कारण निष्ठावंत असा काय तो तूच आहेस. तुझी न्यायकृत्ये प्रकट झाली आहेत म्हणून सर्व राष्ट्रे येऊन तुझ्यासमोर नमन करतील.” देवाचे न्यायदंड खरेच नीतीमान व सत्य आहेत व ते सर्व दृष्टांतात अगदी स्पष्टपणे प्रदर्शित करण्यात आले आहेत! सात देवदूत देवाच्या क्रोधाच्या सात वाट्या ओततात आणि सर्व राष्ट्रांना हर्मगिदोन येथे एकत्र करण्यात येते तसेच आणखी एक स्मरण की, “देवासमोर मोठ्या बाबेल नगरीचे स्मरण करण्यात आले”! तर मग, देवाची भीती बाळगा आणि त्याचे गौरव करा हा पुकारा अत्यंत समयोचित आहे.—प्रकटीकरण १५:१-१६:२१.
१४. अकरा व बाराव्या दृष्टांतात मोठी बाबेल कोणती ठळक भूमिका करते, पण तिला सोडून देण्याची ही तातडीची वेळ का आहे?
१४ प्रकटीकरणात मोठ्या बाबेलीचा पुनः एकदा उल्लेख येतो. आपण तिला ११ व १२व्या दृष्टांतात प्रमुख पात्र याअर्थी पाहतो. ती “बहुत जलांवर बसलेली” असून लोकांवर आपला ताबा ठेऊन त्यांना आपल्या खोट्या तत्वप्रणालीचे विष भरवीत आहे. ती स्वतःच “पवित्र जनांच्या रक्ताने” मस्त झालेली आहे याचा अर्थ हा की तिनेच यांना छळात ठार केले. याशिवाय, आपल्या घातकी युद्धपिपासूपणामुळे “पृथ्वीवर वधिलेल्या सर्वांच्या रक्ताविषयी” ती रक्तदोषी आहे. मोठमोठे व्यवसाय यातील भागीदारीमुळे आणि लोकांना पिळून त्यांच्याकडून पैसा उकळून तिला बरीच दुराचारी मार्गाची धनसंपत्ती मिळाली आहे. याबरोबरच, भुलथापा देऊन फसविण्याचे तिचे राजकारणी डावपेच हेही अधिक दुष्य आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रसंघ या शांती व निर्भयतेच्या श्वापदावर आरूढ होऊन त्याला हाकण्यात देखील ती आसक्त बनली आहे. यासाठीच, देवाची भीती बाळगणारे व त्याचे गौरव करणाऱ्यांनी आता तिला सोडून देण्याची ही निकडीची वेळ आहे कारण, “तिच्या पापांचा ढीग स्वर्गापर्यंत पोहंचला आहे, आणि तिच्या अधर्मांची आठवण देवाने केली आहे.”—प्रकटीकरण १७:१-१८:२४.
१५. मोठ्या कळवंतीणीच्या नाशामुळे कोणते स्तुतीगान होते आणि यानंतर आणखी कोणती आनंदी घटना घडते?
१५ यासाठीच मोठ्या बाबेलवर सूड उगवणे हे यहोवाकडिल नीतीमान न्यायदंडाचा भाग आहे. याच्या रसिकतेप्रीत्यर्थ स्वर्गात व तद्नंतर पृथ्वीवर “हालेलूया”चा स्वर ऐकू येतो आणि तारण, गौरव व सामर्थ्य ही यहोवाची आहेत असे श्रेय दिले जाते. “अहो, . . . जनांनो, . . . यहोवाचे स्तवन करा!” यात मोठ्या वेश्येचा जो सार्वकालिक नाश करण्यात आला त्यातील आनंदाचा सूर ऐकू येतो. तिच्या विनाशामुळे स्वर्गात एक आणखी आनंदोत्सव होतो—कोकरा येशू ख्रिस्त आणि १,४४,००० विश्वासू विजेत्याची मिळून होणारी त्याची वधू यातील विवाह! यावेळी, “सर्वसत्ताधारी आमचा यहोवा देव” याला प्रचंड ध्वनीने स्तुतीगान केले जाते. होय, “आपण आनंद व उल्लास करु व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.”—प्रकटीकरण १९:१-१०.
१६. तेराव्या दृष्टांतानुसार सरतेशेवटी कोणता वादविषय मिटविला जाईल व कसा?
१६ तरीपण तो विवाह संपन्न होण्याआधी १३ वा दृष्टांत, यहोवाच्या सार्वभौमत्वाचा वादविषय कसा निकालात काढण्यात येतो ते दाखवितो. त्याचा राजांचा राजा व प्रभुंचा प्रभु, येशू, आपल्या दूतसैन्यासह “नीतीने न्यायनिवाडा करतो व लढाई चालवितो,” आणि सर्वसत्ताधारी देवाच्या तीव्र क्रोधाचे द्राक्षकुंड तुडवितो. सैतानाच्या पृथ्वीवरील व्यवस्थीकरणाच्या राहिलेल्या भागाचे तुकडे करून चूर्ण केले जाते. (प्रकटीकरण १९:११-२१) प्रकटीकरणाच्या या दृष्टांतामधून आपण आपल्या ज्ञानचक्षुंकरवी तो समीप येत असलेला विजय न्याहाळीत असता देवाची भीती बाळगण्याचे व त्याचे गौरव करण्याचे आम्हास उत्तम कारण आहे!
देवाचे सदासर्वकाळासाठी गौरव करणे
१७. देवाचे भय बाळगून त्याचे गौरव करणाऱ्यांना कोणते आनंदी परिणाम लाभतील असे १४ व १५वा दृष्टांत प्रकटवितात?
१७ प्रकटीकरणाचा १४ व १५ वा दृष्टांत, देवाची भीती बाळगणारे व त्याचे गौरव करणारे यांना कोणता आनंदी परिणाम मिळणार ते सांगतो. आता सैतान व त्याच्या दुरात्म्यांना हजार वर्षांसाठी अगाधकूपात बांधून ठेवले असल्यामुळे, कोकरा व त्याची वधू यांचा विवाह स्वर्गात संपन्न होतो आणि हे १,४४,००१ राजे व याजक हजार वर्षांसाठी राज्य करून मानवजातीला पूर्णतेप्रत आणतात. यानंतरच्या शेवटल्या परीक्षेतहि जे देवाची भीती बाळगून राहतील आणि त्याचे गौरव करीत राहतील अशांना विजयी म्हणून घोषित करण्यात येईल आणि ते सार्वकालिक जीवनास पात्र ठरतील. यात पुनरूत्थान मिळालेल्या कित्येक महापद्म लोकांचा, “लहान थोरां”चा समावेश राहील आणि यांनी आपली नावे जीवनी पुस्तकात लिहिली जाण्याच्या पात्रतेचे असल्याचे स्वतःबाबतीत शाबीत केले असणार. “एक नवे आकाश व नवी पृथ्वी” मानवजातीला अवर्णनीय आशीर्वादांचा वर्षाव करतील; हे आशीर्वाद खात्रीचे आहेत कारण ‘सर्व नवे करणारा’ यहोवा हे घोषित करतोः “लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २०:१-२१:८.
१८. सोळाव्या दृष्टांतानुसार प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा कळस काय आहे?
१८ सोळावा दृष्टांत आपल्याला प्रकटीकरणाच्या कळसास आणतो. तो काय आहे? तो एका शहराचा दृष्टांत आहे. हे नगर, नवे यरूशलेम, पृथ्वीवर कोणा मानवाने बांधले त्यापेक्षा खूपच वेगळे आहे आणि मोठी बाबेल या नगरीपेक्षाही भिन्न आहे कारण या नगरीच्या धर्मत्यागाने, घाणेरडा दुराचार आणि राजकारणी वेश्यापण यांनी देवाच्या नावाची केवढी निंदा केली होती! नवे यरूशलेम हे पवित्र नगर शुद्ध, स्वच्छ व मोलवान आहे. ते कोकऱ्याची लाक्षणिक वधू असून मानवजातीच्या जगास सार्वकालिक जीवन प्रदान करणारी त्याची सोबतीण आहे. (योहान ३:१६) तर मग, मोठी बाबेल या बनावट शहरामधून बाहेर पडण्याचा जो जोरदार व स्पष्ट इशारा देण्यात आला तो आश्चर्ययुक्त नाही!—प्रकटीकरण १८:४; २१:९-२२:५.
१९. (अ) वधू वर्गामार्फत कोणते आमंत्रण दिले जात आहे, आणि नम्र जन याविषयी कोणता प्रतिसाद दाखवितात? (ब) आम्ही “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा” या आज्ञेला सरळ मनोवृत्तिने प्रतिसाद दिला तर काय परिणाम होईल?
१९ यहोवाचा प्रबळ आत्मा वधूवर्गाच्या माध्यमाने हे आग्रहाचे निमंत्रण देतोः “ये!” होय, अहो सर्व नम्र जनांनो, ज्या तुम्हास गोलार्धव्याप्त नंदनवनात सार्वकालिक जीवन मिळविण्याची इच्छा आहे, तुम्ही सर्व “जीवनी पाण्याची नदी” याकडे या आणि यहोवाने ख्रिस्त आणि त्याच्या वधूमार्फत सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी ज्या तरतुदी केल्या आहेत त्यांचा स्विकार करा! नंदनवन बनलेल्या पृथ्वीवर परिपूर्ण मानवी जीवन—केवढे हे अद्भुत भवितव्य! “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा” या आज्ञेनुरुप जे सरळ मनोवृत्ति दाखवतील अशांना ते प्रतिफळ देण्यात येईल.—प्रकटीकरण २२:६-२१.
[तळटीपा]
a वर्ल्ड मिलिटरी ॲण्ड सोशल एक्स्पींडिचर्स १९८७-८८.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ दोन श्वापदांच्या दृष्टांतात आम्हाला कोणत्या समयोचित सूचना आहेत?
◻ अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्या देवदूताने जी घोषणा केली त्याला आम्ही कसा प्रतिसाद द्यावा?
◻ मोठी बाबेल जारकर्मात कशी गुंतली आणि जे देवाचे भय धरतात त्यांना हे कसे वाटते?
◻ प्रभुच्या दिवसात पृथ्वीवर कशी कापणी करण्यात येत आहे?
◻ कोणत्या आनंदी घटनांनी प्रकटीकरणाची समाप्ती घडते, आणि देवाच्या लोकांना यात कसा सहभाग मिळू शकेल?
[२९ पानांवरील चित्रं]
असीसी येथे शांतीप्राप्त्यर्थ जो प्रार्थना मेळावा भरला होता त्याच्या वार्षिकोत्सवाच्या वेळी डिसेंबर १९८७ मध्ये काढण्यात आलेले हे ताम्रपदक. याच्या एका बाजूला “होली फादर”ची प्रतिमा असून सभोवताली ही अक्षरे कोरण्यात आली आहेतः “जॉन पॉल २ पाँटीफेक्स मॅक्झीमस” आणि तारीख. दुसऱ्या बाजूस “संत फ्रान्सीस”, असीसी येथे शांतीच्या प्रार्थनेच्या मेळाव्यात “देवाची देणगी शांती” साठी याचना करीत आहे