वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ५/१ पृ. १८-१९
  • ठराव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ठराव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • मिळती जुळती माहिती
  • मोठ्या बाबेलवरील उघड दोषारोप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • प्रकटीकरणातील “सुवार्ता”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाच्या वेळी मुक्‍तता
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • प्रकटीकरण आणि तुम्ही
    प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ५/१ पृ. १८-१९

ठराव

“ईश्‍वरी न्याय” अधिवेशनांची उपस्थिती गतवर्षापेक्षा कैकपटीने अधिक होती यात काही संशय नाही, कारण सर्व जगात १,०९८ स्थळी भरलेल्या अधिवेशनांना ६४,४३,५९७ लोक उपस्थित होते आणि ९३,८२२ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. “कुप्रसिद्ध वेश्‍या” हे भाषण “ईश्‍वरी न्याय” अधिवेशनाच्या प्रत्येक अधिवेशनात देण्यात आले व त्याच्या शेवटी २० पेक्षा अधिक भाषेत ३२० पानांचे रेवलेशन—इटस्‌ ग्रॅण्ड क्लायमॅक्स ॲट हॅण्ड! हे सुंदर चित्रमय पुस्तक प्रकाशित करण्यात आले. वक्त्याने श्रोत्यांना निक्षून सांगितलेः “हे नवीन पुस्तक वैयक्‍तिक तसेच मंडळीच्या अभ्यासात चांगल्या रितीने उपयोगात आणा. मोठी बाबेल लवकरच नाशास जात आहे, तसेच राष्ट्रे आता हर्मगिद्दोनासमोर ठाकली आहेत, आणि सर्व गोष्टींचा गौरवी शेवट, ख्रिस्त व त्याची वधु यांच्या अधिपत्याखालील देवाच्या भव्य गौरवी राज्याच्या स्थापनेत होईल. या गोष्टी ऐकण्यात आणि पाळून चालण्यात आपण धन्य ठराल, कारण ‘नेमलेला समय जवळ आला आहे’!”—प्रकटीकरण १:३.

आम्ही, जे १९१४ पासून “प्रभूच्या दिवसात” तसेच ईश्‍वरी न्यायाच्या दिवसात जगत आहोत, त्यात सर्वात अप्रतिम हक्काचा आनंद अनुभवीत आहोत कीः सार्वभौम प्रभु यहोवा याची, त्याच्या राजांचा राजा येशू ख्रिस्त याच्या अधिपत्याखाली सेवा करतो. (प्रकटीकरण १:१०) यास्तव, यहोवाचे साक्षीदार म्हणून आम्ही साक्ष देतो कीः

(१) आम्हास तिटकारा आहे तो, मोठी बाबेल व खासकरुन ख्रिस्ती धर्मराज्यांनी जो एकमेव खरा व जिवंत यहोवा याच्या नामाची जी निंदा केली तिचा आहे. आम्ही प्रतिज्ञापूर्वक संपूर्ण हृदयाने प्रकटीकरण ४:११ च्या शब्दात म्हणतोः “हे यहोवा, आमच्या देवा, गौरव, सन्मान व सामर्थ्य ही तुझीच आहेत, असे म्हणवून घ्यावयास तू योग्य आहेस.”

(२) आम्हास तिटकारा आहे की, ख्रिस्ती धर्मराज्ये बाबेलच्या शिकवणी, खासपणे त्रैक्य देवाच्या, मानवी जीव अमर असल्याच्या, नरकातील अमर अग्नीच्या, अग्निमय परगेटरीच्या आणि मूर्तिपूजेच्या, जसे मेडोना आणि क्रुसाच्या शिकवणींना कवटाळून आहेत. प्रकटीकरण २२:१८, १९ च्या अनुरोधात देवाच्या लिखित वचनास आणि जे काही त्यात आहे त्यासच आम्ही निश्‍चयाने अनुसरतो.

(३) आम्हास तिटकारा आहे तो, देवाविरुद्धच्या तत्वज्ञानाचा आणि संस्कृतीचा, ज्या ख्रिस्ती धर्मराज्यात अगदी सर्वसाधारण आहेत. जशा उत्क्रांती, रक्‍तसंक्रमण, गर्भपात, लबाडी, हाव आणि अप्रामाणिकता या आहेत. आम्ही आमच्या भक्‍तित आणि जीवन मार्गात आमचा सृष्टीकर्ता सर्वसमर्थ यहोवा देव याचेच गौरव करु. त्याच्या मार्गांचा प्रकटीकरण १५:३ उल्लेख करुन म्हणते की तेः “नीतीचे व सत्य आहेत.”

(४) आम्ही तिटकारा करतो ते, ख्रिस्ती धर्मराज्ये येशूने प्रकटीकरण २ व ३ अध्यायामध्ये सात मंडळ्यांना उद्देशून, स्वसंप्रदायाभिमानाने पंथ पाडण्याचा स्वभाव, मूर्तिपूजा, जारकर्म, इजबेलवृत्तीचा प्रभाव, कोमटपणा व जागृतीची कमतरता यासारख्या प्रकरणात दिलेला संदेश पाळून चालण्यात मागे पडली आहेत. आम्ही तर, “आत्मा मंडळ्यास काय म्हणतो” तेच निश्‍चयपूर्वक ऐकणार व पाळून चालणार.

(५) आम्हास तिटकारा आहे तो ख्रिश्‍चन धर्मराज्यातील व त्यांच्या पाद्रीगटातील अनीतीचा व मनास वाटेल ते करण्याची मोकळीक देण्याचा. यास्तव, यहोवाने प्रकटीकरण २१:८ मध्ये कथित केलेल्या स्पष्ट शब्दातील न्यायाचे आम्ही स्वागत करतो कीः जे सर्व स्वतःस जारकर्म, सर्व प्रकारची लबाडी आणि यासारख्या प्रकारात गढलेले असतील अशांचा समूळ नाश केला जाईल. आम्ही संपूर्ण ह्रदयाने, पवित्र शास्त्र, लैंगिक संबंधाबाबत, विवाह आणि कौटुंबिक जीवनाबद्दलचे जे आदर्श पुरविते त्यांना पाठिंबा देतो.

(६) आम्हाला तिटकारा आहे की ख्रिस्ती धर्मराज्यातील पाद्रीगट सत्ता, धन आणि सर्वसाधारण प्रजेवर जुलमी वर्चस्व प्राप्त करण्यात सत्ताधिशांच्या संगतीत एवढी शतके आध्यात्मिक शिंदळकी चालवीत आहेत व मूक संमति देत आहेत. यास्तव आम्ही हा ठराव केला आहे की, जे प्रामाणिक अंतःकरणाचे आहेत अशांची प्रकटीकरण १८:४ मध्ये दिव्यदूताने जी हाक दिली ती पाळण्यात मदत करावी कीः “माझ्या लोकांनो . . . तिच्यातून निघा.”

(७) आम्हास तिटकारा वाटतो तो, या शतकातच केवळ युद्धात एक अरब जिवांचा बळी चढविला गेला, जो मुख्यतः मोठ्या वेश्‍येच्या राजकीय सत्तासोबतच्या जारकर्मामुळे घडला. आम्हास आनंद वाटतो की, मोठ्या बाबेलवर न्यायदंड बजाविण्याची देवाकडिल नियुक्‍त वेळ, प्रकटीकरण १८:२१-२४ मध्ये स्पष्ट शब्दात म्हटल्याप्रमाणे अगदी जवळ आली आहे.

यास्तव, यहोवाचे साक्षीदार म्हणून जगास हे जाहीर करण्यास आम्हास आनंद वाटतो व त्यासोबत हा एक विशेष हक्क मानतो कीः १९१४ मध्ये “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे [यहोवाचे] व त्याच्या ख्रिस्ताचे झाले.” (प्रकटीकरण ११:१५) याचकरता, आम्ही हा ठराव केला की, मोठ्या बाबेलवरील यहोवाचा न्यायदंड घोषित करण्यात आणि देवाकडील हर्मगिद्दोनचे युद्ध केवढ्या जवळ येऊन पोहोचले आहे याचा इशारा देण्यात निर्भिडपणे पुढे चाल करावी. आम्ही हा निश्‍चय केला आहे की, एका सुरात मोठ्याने “सर्व राष्ट्रे, वंश, भाषा व लोक” यांना ही सुवार्ता सांगू की, “नवे आकाश व नवी पृथ्वी” ही सर्व आज्ञाधारकांवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यास अगदी जवळ येऊन ठेपली आहेत. (प्रकटीकरण १४:६; २१:१) आम्हास आनंद वाटतो की या घोषणेमुळे सर्व राष्ट्रातून, ३० लाखाहून अधिकांचा एक मोठा समुदाय आज सबंध गोलार्धावर आमच्या संगतीत जमा आहे. अंतराळात उडणाऱ्‍या देवदूताच्या संगतीत आम्ही सर्व हेच घोषित करीत आहोतः “देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्यायनिवाडा करावयाची घटिका आली आहे; ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्‍न केले, त्याला नमन करा.”—प्रकटीकरण १४:७.

[अभ्यासाचे प्रश्‍न]

“ठराव” याचा अभ्यास करण्यास प्रश्‍नः

१. यहोवाचे साक्षीदार आज कशात आनंद मानून आहेत?

२. ठरावात असलेल्या सात मुद्यातून प्रत्येकावर भाष्य कराः (अ) यहोवाच्या साक्षीदारांना कशाचा तिटकारा आहे व (ब) साक्षीदारांनी कोणते निर्विवाद विधान प्रतिज्ञापूर्वक केले आहे?

३. (अ) यहोवाच्या साक्षीदारांना कोणता आनंद व हक्क आहे? (ब) साक्षीदारांचा ठराव काय आहे? (क) आम्ही आणखी काय करण्याचा निश्‍चय केला आहे? (ड) कोणत्या आनंदात व घोषणेत यहोवाचे साक्षीदार सहभागी होतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा