राज्य घोषकांचा वृत्तांत
यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना संभाळतो
येशूने असे म्हटले होतेः “दास धन्यापेक्षा मोठा नाही. . . . ते माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील.” (योहान १५:२०) पण यहोवाच्या विश्वासू सेवकांना ही हमी आहे की तो त्यांचा संभाळ करील. (स्तोत्रसंहिता १८:२; नहूम १:७) एका आफ्रिकी देशात यहोवाच्या साक्षीदारांच्या शांतीमय कार्याला कडक विरोध आहे तेथे यहोवाच्या सेवकांना मार व धरपकड यांना अनुभव येत असता तो त्यांचे रक्षण करतो, हे पुढील अहवालावरून दिसून येतेः
“एका विभागीय देखरेख्याला व चार बांधवांना धरुन, जेथे भटकलेल्या कुत्र्यांना ठेवीत त्या छोट्या खोलीत डांबण्यात आले.” असे अहवाल सांगतो. “तेथे त्यांना १२३ दिवस आतील कपड्यात ठेवण्यात आले आणि लघुशंकेलाही बाहेर येऊ दिले नाही.” या निर्दयी परिस्थितीची माहिती एका लोकसभा सदस्यांना कळली व त्यांनी निषेध मांडला, व मग १२३ दिवसांनी बांधवांची सुटका झाली. यहोवाने आपल्या आत्म्याद्वारे या विश्वासू बांधवांना संभाळले.
याच देशातील दुसरा एक अनुभव आमच्या प्रचारकार्यामुळे केवढे लाभदायक परिणाम होतात ते सांगतो. अहवाल म्हणतोः “एका खेड्यात लोकांची हिंसाचारी व बंडखोरी करण्याविषयीची ख्याति होती. पण यहोवाच्या साक्षीदारांनी तेथे प्रचार केल्यावर पुष्कळात परिवर्तन घडले गेले. ते स्थानिक अधिकाऱ्यांना मान देऊ लागले आणि वसाहतीमध्ये केल्या जाणाऱ्या आठवड्याच्या रस्त्यावरील कामात भाग घेऊ लागले.” लोकात हा बदल का घडला याची स्थानिक अधिकाऱ्यापैकी एकाला माहिती हवी होती. त्यांना कळविण्यात आलेः “हा बदल यहोवाच्या साक्षीदारांच्या एका ‘पाळका’ने जे शिक्षण दिले त्यामुळे घडला.” “एके दिवशी या अधिकाऱ्याने मला त्याच्या घरी बोलावले,” असे साक्षीदार सांगतो, “व मला म्हटले की हे चांगले काम मी येथे नियमित करावे. त्याने मला एक मोठी कोंबडी बक्षीस म्हणून दिली व म्हटले की, ती आपल्या कुटुंबासोबत मिळून खावी.” दुसऱ्या एके प्रसंगी स्थानिक महापौरांनी या बंधूला भेट दिली. बंधूने त्यांना आत बोलावले व साक्ष दिली. महापौरांनी “काही मासिके मागितली व म्हटले, ‘तुम्हाकडून आम्हाला काही धोका नाही, तुमचे काम चालू ठेवा. तुमची धरपकड करावी असा आदेश आम्हाला आला नाही. मला वाटतं की, आमचे शासन लवकरच तुमच्या समस्यांच्या विचार करील.”
एक खास पायनियर लिहितोः “एका राजकीय पक्षाच्या सचिवाने मजविरूद्ध आरोप केला. मला स्थानिक अधिकाऱ्याने धरले व जनावरांचे मूत्र आणि खत यांनी डबडबलेल्या एका खोलीत डांबले. त्या अंधारकोठडीत मला पाच दिवस ठेवण्यात आले. येथे जाताना मी यहोवाला प्रार्थना केली व स्तोत्रसंहिता ५०:१५ हे वचन आठविले. तेथे राखण करणाऱ्या पहारेकऱ्यांना माझी दया आली व त्यांनी कोठडीचा दरवाजा पूर्ण बंद ठेवला नाही की, ज्यामुळे मला श्वासोच्व्छासासाठी हवा मिळत राहिली. पाच दिवसानंतर माझी एक परिक्षा घेण्यात आली. मला एक बकरे स्थानिक अधिकाऱ्याच्या घरी पोचते करण्यासाठी देण्यात आले. माझ्या सोबतीला कोणी नव्हता. मी पळून गेलो नाही हे पाहून मला दररोज दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत मोकळे सोडले जात होते. मला बांधवांना भेटता आले व आम्ही एकत्र मिळून प्रचार करू शकलो. या कठीण काळात मी आजारी पडलो आणि मी मरेन अशी माझ्या शत्रूंनी अपेक्षा धरली तरी यहोवाने माझा कधीही त्याग केला नाही. या अनुभवामुळे मला यहोवाची समीपता लाभली आणि माझी खात्री झाली की, छळ मला यहोवाच्या लोकांपासून कधीही वेगळे करू शकणार नाही.”—पडताळा रोमकर ८:३५-३९.
कठीण काळी देव किती साहाय्य देतो ते यहोवाच्या साक्षीदारांना अर्थपूर्णतेचे वाटते. याचप्रमाणे जीवनप्रदायक सुवार्तेचा प्रचार करण्याच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामी जे त्यांना दया दाखवितात त्याविषयीही त्यांना मोठी रसिकता वाटते. अशा या दयाळूपणास यहोवा कधीही विसरणार नाही.—मत्तय २५:४०.