राज्य घोषकांचा वृत्तांत
“तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही”
मध्य अमेरिकेतील एका देशात १५ शस्त्रधारी लोकांनी यहोवाच्या दोन साक्षीदारांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने काढून आणून त्यांना सोटे व लांब चाकू यांनी सिद्ध असणाऱ्या ७५ लोकांच्या समूहामध्ये उभे केले. यांनी साक्षीदारांना शिव्याशाप दिल्या व नंतर ३५० लोकांच्या आणखी एका गटाच्या हवाली केले. यांची अशी धारणा होती हे दोन बांधव गर्भगळीत होतील आणि आपली ख्रिस्ती तटस्थता भंगवून त्यांच्या दलात सामील होतील. (यशया २:४) तरीपण साक्षीदार निश्चल राहिले आणि त्यांनी त्यांच्या सैनिकी कारवायात भाग घेण्यास नकार दिला. याकरता त्यांना तुरूंगात डांबण्यात आले. याचवेळी चर्चेसच्या बहुतेक सदस्यांनी हातमिळवणी केली त्यांना दलासमवेत डोंगरी इलाख्यात पाठविले गेले.
दुसऱ्या दिवशी आमच्या बंधूना मुख्य शहरात सुनावणीकरता नेण्यात आले. ते जात असताना रक्षक त्यांना म्हणाले की त्यांच्या बुद्धीचे मतप्रवर्तन होणार. बंधूनी म्हटले: आमचे आधीच मतप्रवर्तन झाले आहे! आता आम्ही कोणालाही इजा करीत नाही. आम्ही चोर, मद्यपि किंवा व्यभिचारी नाही,” अधिकाऱ्यांपुढे त्यांची चौकशी झाली तेव्हा अधिकाऱ्याने त्यांना दयाळूपणे वागविले व त्यांचे अभिनंदन करून म्हटले: “तुमच्यासारखे सगळे असते तर सर्व काही वेगळे दिसले असते . . . तुमचा देव यहोवा तुमचे रक्षण करो.” नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
देवाच्या नीतीमान दर्जा उंचावून धरणाऱ्या अहिंसक व शांतीप्रिय ख्रिश्चनांचा छळ का व्हावा बरे? कारण ते हे “जग” व त्याची राजकारणी घडामोडी यांचे “भाग नाही.” (योहान १७:१६) यास्तव दियाबल व त्याचे हे जग यहोवाच्या सेवकांविरूद्ध लढले तरी त्यांचा वरचष्मा होणार नाही हे जाणणे केवढे सांत्वनदायक आहे! (यिर्मया १:१९) हे या देशाच्या बाबतीत खरे झाले. यहोवाच्या साक्षीदारांच्या तटस्थ भूमिकेची जाण राखल्यामुळे अधिकाऱ्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
◻ यिर्मयाचे शब्द, जेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर निर्बंध आहे त्या एका आफ्रिकन देशाच्या अनुभवाबाबत खरे झाले. लोकांना यहोवाच्या अद्र्भित उद्देशाचे शिक्षण देण्यात बांधव किती त्रास व परिश्रम घेतात ते सांगितल्यावर अहवाल म्हणतो: “यहोवाच्या लोकांच्या तटस्थ भूमिकेमुळे खूप बांधव कैदेत आहेत व त्यांची शिक्षाही वाढवली जाते. त्यांना मार, चाबूकमार मिळतो व प्रखर दबाव आणून त्यांचा ख्रिस्ती विवेक भंगविण्याचा प्रयत्न होत आहे. एकाच्या बाबतीत असे घडले की खूप मारहाण केली तरी त्या बंधूची सचोटी भंगविता आली नाही म्हणून काही शिपायांनी त्याचा खून करण्याचा आपसात कट रचला. जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याला हा कट कळला तेव्हा त्याने व्यक्तिशः त्यात हस्तक्षेप केला व त्या बंधूची अगदी गुप्तपणे दुसऱ्या शहरी रवानगी केली व अशाप्रकारे त्याचा जीव वाचविला गेला.”
या छळाने यहोवाच्या साक्षीदारांना देवाने आज्ञा दिलेले सुवार्तेच्या प्रचाराचे कार्य थांबविण्यात यश आणता आले नाही. (मत्तय २४:१४) यहोवा आपल्या आत्म्याद्वारे त्यांचे संगोपन करतो व त्यांच्या विश्वासू भूमिकेबद्दल आशीर्वाद देतो. या देशातील अहवाल असेहि म्हणतो: “पराकाष्ठेचा शारिरीक त्रास, उपासमार, आजार, भयंकर मुलकी युद्ध आणि छळ असला तरी प्रचारकांच्या सर्वसाधारण संख्येत १७ टक्कयांची वाढ साध्य होऊ शकली.” स्मारकविधिच्या उपास्थितांचा आकडा २१ टक्कयाने वाढला तर एप्रिल १९८४ मध्ये प्रचारकांच्या २१ टक्कयांनी पायनियरींगचे कार्य केले.
अशाप्रकारे, छळ आहे तरी आमचे बांधव आनंदी आहेत. ते यहोवावर आपला आत्मविश्वास ठेवून आहेत आणि त्यांना यिर्मयाच्या शब्दांचे स्मरण आहे की, “ते तुजबरोबर सामना करतील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणार नाही. कारण ‘तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे’ असे यहोवा म्हणतो.”—यिर्मया १:१९. (w86 1/1)
[३१ पानांवरील चित्रं]
यहोवा आपल्या छळग्रस्त साक्षीदारांचे संगोपन करतो