विश्वास व चांगला विवेकभाव राखून ठेवा
तीमथ्याच्या पहिल्या पत्रातील ठळक वैशिष्ट्ये
इ. स. ५६ च्या सुमाराला प्रेषित पौलाने इफिस मंडळीतील वडिलांना इशारा दिला होता की, त्यांच्यामधून “क्रूर लांडगे” येतील व ते “शिष्यांना आपल्यामागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील.” (प्रे. कृत्ये २०:२९, ३०) काही वर्षांतच, ते धर्मत्यागी शिक्षण इतके प्रगत झाले की, मंडळीची शुद्धता टिकविण्यासाठी तसेच समविश्वासूंना विश्वासात टिकून ठेवण्यासाठी आध्यात्मिक लढत द्यावी हे पौलाला तीमथ्याला सांगावे लागले. पौलाने तीमथ्याला आपले पहिले पत्र मासेदोनियाहून इ. स. ६१-६४ च्या दरम्यान का लिहिले त्याचे हे प्रमुख कारण होते.
तीमथ्याला वडीलांची कर्तव्ये, स्त्रियांना देवाने नेमून दिलेले स्थान, वडील तसेच उपाध्य सेवकांच्या गुणविशेषता व इतर गोष्टीविषयीच्या सूचना देण्यात आल्या. याच सूचना आज लाभदायक आहेत.
विश्वासासाठी आर्जव
पौलाने आपल्या पत्राची सुरवात विश्वास व चांगला विवेकभाव राखून ठेवावा या सूचनेद्वारे केली. (१:१-२०) त्याने तीमथ्याला इफिसमध्ये राहून कित्येक लोकांना “अन्य शिक्षण देऊ नका” अशी ताकीद देण्यास सांगितले. पौलाने स्वतःला सोपवलेल्या सेवेविषयी कृतज्ञता व्यक्त केली व म्हटले की, त्याने येशूच्या अनुयायांचा छळ केला तो न समजून अविश्वासामुळे केला होता. प्रेषिताने तीमथ्याला म्हटले की, त्याने सुयुद्ध करावे, ‘विश्वास व चांगला विवेकभाव धरावा,’ आणि ज्यांचे “विश्वासरुपी तारू फुटले” आहे अशांसारखे बनू नये.
भक्तीसंबंधीच्या सूचना
यानंतर, पौलाने “विश्वास व सत्य ह्यासंबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक” या नात्याने सूचना दिल्या. (२:१-१५) ख्रिस्तीजनांना शांतपणे व स्वस्थपणे जगता यावे यासाठी मोठ्या हुद्यांवर असलेल्या लोकांविषयी प्रार्थना करण्यास सांगितले. सर्व माणसांचे तारण व्हावे ही देवाची इच्छा आहे. तसेच ख्रिस्ताने “स्वतःला सर्वांसाठी जुळणारे मुक्तीचे मोल” असे दिले हे शिक्षण महत्त्वपूर्ण होते. पौलाने स्पष्ट केले की, स्त्रीने स्वतःला भिडस्तपणाने शृंगारावे आणि तिने पुरुषावर धनीपण चालवू नये.
मंडळीने सुव्यवस्थितपणे संघटीत असावयास हवे. (३:१-१६) याकरताच पौल देखरेखे व उपाध्य सेवकांच्या गुणविशेषता सादर करतो. प्रेषिताने जे लिहिले त्याद्वारे आपण “सत्याचा पाया व स्तंभ” असणाऱ्या मंडळीत स्वतःला कसे वागवावे हे तीमथ्याला कळणार होते.
खोट्या शिक्षणाविरुद्ध सज्ज असण्यासाठी मदत मिळावी म्हणून पौलाने तीमथ्याला व्यक्तीगत सूचना दिल्या. (४:१-१६) नंतरच्या काळी काही लोक विश्वासापासून दूर जाणार होते. पण स्वतःकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष दिल्यामुळे तीमथ्याला ‘स्वतःचे व त्याचे ऐकणाऱ्याचे तारण साधता येणार होते.’
तरुण व वृद्ध यांच्यासोबत कसे दळणवळण ठेवावे याविषयीच्या सूचना तीमथ्याला मिळाल्या. (५:१-२५) उदाहरणार्थ, ज्यांनी ख्रिस्ती ख्याति संपादिली आहे अशा वृद्ध विधवांसाठी योग्य ती तरतुद करायची होती. चारचौघात चहाड्या सांगत बसण्यापेक्षा तरुण विधवांनी लग्न करून आपला संसार करायचा होता. चांगल्या रितीने देखरेख करणाऱ्या वडीलजनांना दुप्पट सन्मान देणे जरूरीचे होते.
चित्तसमाधानासह असणारी ईश्वरी भक्ती
पौलाने ईश्वरी भक्तीविषयीची सूचना सादर करून आपले पत्र संपविले. (६:१-२१) “चित्तसमाधानासह असणारी ईश्वरी भक्ती” तर मोठाच लाभ आहे, पण धनवान होण्याची लालसा धरणे हे पाशात व नाशात पाडणारे आहे. पौलाने तीमथ्याला विश्वासासंबंधीचे सुयुद्ध करण्यास आणि ‘सार्वकालिक जीवनावरील आपली पकड घट्ट’ करण्यास सांगितले. त्या खऱ्या जीवनाच्या प्राप्तीसाठी धनवानांनी ‘चंचल धनावर नव्हे तर, देवावर आपली आशा ठेवणे’ जरुरीचे होते.
[२७ पानावरील चौकट/चित्रं]
बालकाच्या जन्माद्वारे तारणः येथे पौल सार्वकालिक जीवनाच्या तारणाविषयी सांगत नव्हता तर तो ईश्वरी भक्ती करणाऱ्या स्त्रीची भूमिका स्पष्ट करीत होता. तो म्हणालाः “मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यात त्या राहिल्यास बालकाच्या जन्माद्वारे त्यांचे तारण होईल.” (१ तीमथ्य २:११-१५) मुलाला जन्म देण्याद्वारे, आपल्या मुलांची काळजी घेण्याद्वारे आणि आपले घर व्यवस्थितपणे ठेवण्यामुळे तिला रिकामटेकडेपणामुळे चहाड्या करीत फिरण्यात आणि इतर लोकांच्या घडामोडीत डोके खुपसण्यापासून ‘वाचविले जाणार होते.’ (१ तीमथ्य ५:११-१५) तिची घरातील कामे ती यहोवास करीत असलेल्या सेवेला पूरक ठरणार होती. अर्थात, सर्व ख्रिस्तीजनांनी आपल्या वागणूकीकडे लक्ष दिले पाहिजे व आपला वेळ सूज्ञपणे घालविला पाहिजे.—इफिसकर ५:१५, १६.