वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w90 ९/१ पृ. ३०-३२
  • आम्हास यहोवाची परतफेड कशी करता येईल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आम्हास यहोवाची परतफेड कशी करता येईल?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाकडील उपकार
  • मी यहोवाची परतफेड कशी करणार?
  • आम्हापाशी जे आहे तेच आम्ही कसे उपयोगात आणावे?
  • वृद्ध व युवकांकडील दाने
  • “सर्व चांगल्या देणगीचा” दाता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • राज्य-प्रचारकार्यासाठी काही जण कशाप्रकारे देणग्या देतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • “पैसा येतो तरी कोठून?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवा त्याच्या कार्याचा कसा उत्कर्ष करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
w90 ९/१ पृ. ३०-३२

आम्हास यहोवाची परतफेड कशी करता येईल?

जेव्हा कोणी आम्हाबद्दल आपुलकी बाळगून आमच्या हिताचे काही करीत असेल त्यावेळी आमची प्रतिक्रिया कशी असते? दयाळूपणा व औदार्य या गोष्टी नेहमीच चांगला प्रतिसाद देतात, होय ना? मग, आमचा देव यहोवा आम्हावर जी प्रेमळ कृपा सतत व्यक्‍त करीत असतो त्याविषयी आम्हाला कसे वाटते बरे?

दररोजच्या दगदगीच्या जीवनात अनेक समस्यांना तोंड देत असता यहोवाकडील सत्कृत्यांना, ही तर दानार्थात आहेत असे मानून चालतो व काही वेळा तर जणू खरेच उपकृत नसल्यासारखे वागतो व हे सर्व केवढ्या सहजपणे व वेगात घडते व पुढे सरत असते. या कारणास्तव अंमळ थांबून व स्तोत्रकर्त्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष पुरविलेले बरे की, “यहोवाने मजवर केलेल्या उपकारांची मी परतफेड कशी करणार?” (स्तोत्रसंहिता ११६:१२, न्यू.व.) आम्ही कोणत्या मार्गी प्रतिसाद देणार?

यहोवाकडील उपकार

यहोवाने त्याचे वचन, पवित्र शास्त्राचे दान दिले नसते तर आम्ही केवढ्या गोंधळात असतो बरे! हे पुस्तक जवळ बाळगल्याबद्दल व वाचन केले म्हणून गतकाळातील अनेक निर्भय पुरुष व स्त्रियांनी आपले प्राण पणास लाविले व ते का हे आता आम्ही समजू शकतो. देवभक्‍त नेहमीच प्रेरित शास्त्रवचनाबद्दल कृतज्ञ राहिले आहेत; कारण ते जाणून आहेत की, ते “सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण यांकरिता [केवढे] उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.

तथापि, आम्ही हे जाणतो की, “प्रत्येक चांगल्या कामास सज्ज” होण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर काही अधिक हवे. (२ तीमथ्य ३:१७) देवाच्या पवित्र आत्म्याच्या शक्‍तीद्वारे आमच्या जीवनात अनेक प्रतिफळे आणविली जातात व हीच गोष्ट यहोवाने आपल्या अपीलपूर्वक वक्‍तव्यात आपला संदेष्टा यशया याजद्वारे सांगितलीः “आता सार्वभौम प्रभु यहोवाने मला व आपल्या आत्म्याला पाठविले आहे. यहोवा तुझा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभु म्हणतोः ‘तुला जे हितकारक ते मी यहोवा तुझा देव तुला शिकवतो. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो. तू माझ्या आज्ञा लक्षपूर्वक ऐकतास तर बरे होते; मग तुझी शांती नदीसारखी, तुझी धार्मिकता समुद्राच्या लाटांसारखी झाली असती.” (यशया ४८:१६-१८) आपल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तसेच आपल्या वचनांच्या जोडीने यहोवा आमच्या फायद्यांकडे आम्हाला निरवीत असतो, ज्याचे प्रतिफळ आम्हास शांती व नीतीमत्वतेत प्राप्त होते.

याशिवाय, यहोवाची कार्यकारी शक्‍ती आमच्या हितास्तव आपल्या कार्यक्षमतेत कार्यशील असते कारण तशी मांडणी रचलेली आहे; त्याची पृथ्वीवरील संस्था, जिच्याद्वारे पवित्र आत्म्याने सर्वकाही चालविले जाते. पहिले करिंथकराच्या १२ व्या अध्यायात पौल ख्रिस्ती मंडळीला एखाद्या शरीरासमान संबोधून ७ व्या वचनात म्हणतोः “तरी आत्म्याचे प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते.” तो पुढे दाखवितो की, आम्ही जर देवाच्या भूतल संस्थेशी नेहमी संलग्न राहिलो तर कसे फायदे मिळवीत असतो.

त्याने ते शब्द लिहून पाच किंवा काही अधिक वर्षे झाली असतील, तोच त्याने इफिसमधील मंडळीला पत्र लिहिले ज्यात त्याने, पृथ्वीवरील योजनांशी संलग्न राहण्यातील फायद्यांचे अधिक सविस्तर वर्णन केले आहे. जरी ते प्रामुख्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना लागू होते तरी, जे आजच्या “मोठ्या लोकसमुदाया”तून आहेत त्यांनीही स्वतःस ‘सेवेच्या कामासाठी, प्रौढ मनुष्यपण प्राप्त होण्यात आध्यात्मिक वृद्धी करून विश्‍वासात व तत्संबंधीच्या ज्ञानात स्थिर होण्याने यापुढे बाळासमान न राहता, प्रीतीने सर्व प्रकारे वाढत वाढत त्या मस्तकाप्रत, जो ख्रिस्त आहे, पोचावे’ हे लागू होणारे नाही का? (प्रकटीकरण ७:९; इफिसकर ४:१२-१६) आम्ही सर्वांनीच कृतज्ञ असण्याची पुरेशी कारणे आहेत.

ख्रिस्ती मंडळीशी संलग्न असल्याची ओळख देणारा विश्‍वासू व बुद्धीमान दास वर्ग आहे, ज्याचे काम आहे की, आमची आध्यात्मिक भरवणूक करणे. हा एक असाच पुरावा आहे की, यहोवा आमच्या फायद्यांकरिता केवढे करीत आहे. (मत्तय २४:४५, ४६) आता आम्ही पूर्वभाकित केलेल्या धन्याच्या उपस्थिती समयात आहोत. “दास”वर्ग आपले काम करीत आहे का? या “शेवटल्या काळा”चे निराशजनक वातावरणातही आम्ही आशेने संपन्‍न आहोत का? आम्ही आपणापाशी जीवनातील योग्य तोच उद्देश बाळगून आहोत का? (२ तीमथ्य ३:१-५; रोमकर ५:५; १ तीमथ्य ४:१०) होय! शिवाय आम्हाठायीची आशा संभाव्यतेवर आधारीत नसून विश्‍वासावर उभारलेली निश्‍चित खात्री आहे; जी तिच्यापरिने भक्कम पुराव्यावर आधारीत आहे.—इब्रीयांस ११:१.

मग, हे उघड आहे की, यहोवा आमचा सर्वथोर दाता याने आम्हास एवढे सर्व दिले आहे ज्याच्याबद्दल आम्ही त्याचे कृतज्ञ असण्यास हवे. मग साहजिकपणे हा प्रश्‍न उद्‌भवतोः

मी यहोवाची परतफेड कशी करणार?

प्रथम, आम्ही हे ओळखून असण्यास हवे की, यहोवा आम्हाकडून कशाचीही अपेक्षा करीत नाही. तोच स्वतः म्हणतोः “रुपे माझे आहे, सोने माझे आहे.” त्याचप्रमाणे, “हजारो डोंगरावरील गुरेढोरे माझी आहेत.” (हाग्गय २:८; स्तोत्रसंहिता ५०:१०; ईयोब ४१:११) याचा अर्थ हाच की, कोणाही मार्गी आम्ही यहोवाच्या कृपेस “विकत” घेऊ शकत नाही; तरीही आम्हास स्वेच्छा अर्पणे त्याला वाहण्यास उत्तेजन दिले आहे. (पडताळा १ इतिहास २९:१४.) तथापि, यहोवास अर्पणे वाहण्यात काही आवश्‍यक अटी आहेत.

“मी काय घेऊन यहोवासमोर येऊ? परात्पर देवासमोर नमस्कार कसा घालू? होमबली, एका वर्षाची वासरे घेऊन त्याजपुढे येऊ काय? हजारो एडके, तेलाच्या दशसहस्र नद्या यांनी यहोवाला संतोष होईल काय? माझ्या पातकाबद्दल मी आपला ज्येष्ठ पुत्र देऊ काय? माझ्या जिवाने केलेल्या पापाबद्दल मी आपल्या पोटचे फळ देऊ काय? हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले आहे; नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून यहोवा तुजजवळ काय मागतो?”—मीखा ६:६-८.

यावरुन आम्ही हेच शिकतो की, यहोवाच्या मागण्या नेहमीच रास्त, नेहमी सुलभ असतात. याशिवाय, आमची अर्पणे स्विकारणीय ठरावीत म्हणून येशूने एका पूर्वगरजेकडे अंगूली दर्शवून हे स्पष्ट केले की, यहोवा आणि आमचे सहकारी यांच्यासोबतचे आमचे नातेसंबंध सुरळीत असलेच पाहिजेत. (मत्तय ५:२३, २४) अगदी यथार्थ पाया घातल्यावर आम्ही सर्व हे पाहू शकतो की, यहोवाने आम्हा सर्वांकरिता जी काही सत्कृत्ये केली त्यांचे गुणग्राहकतेत आम्हा सर्वांना त्याला काहीतरी देणे आहे.

आम्हापाशी जे आहे तेच आम्ही कसे उपयोगात आणावे?

याकरिता, वेळ, श्रम व काही वेळा पैसा देखील खर्च करावा लागतो, पण प्रचार कार्य करण्यात प्रत्यक्षात यहोवाचे प्रतिनिधित्व करणे हा केवढा थोर हक्क प्राप्त आहे! ही उपकारस्मरणरुपी यज्ञार्पणे अशी आहेत जी आम्हापैकी कोणीही यहोवाला सहज वाहू शकतात. याबद्दल एका पायनियर वडील बंधुला, तीन लहान लेकरे असताही काय वाटते ते पाहूः

“सर्व वेळेच्या सेवेत सहभागी होणे हा कोणाही वैयक्‍तीक अर्पणातील सर्वश्रेष्ठ हक्क आहे—एवढेच नव्हे तर—आमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करण्याचा तो सर्वात प्रभावी मार्ग आहे. शिवाय, व्यक्‍तीगतपणे त्याने मजवर जो अनुग्रह प्रदर्शित केला आहे त्याबद्दल त्याचे आभार प्रदर्शनाची शक्यता तो मला पुरवितो.”

त्यांची पत्नी म्हणतेः “माझ्या पतीचे पायनियरींग करण्यात साहाय्य करणे हा खरोखरी केवढा वास्तविक हक्क आहे. त्यामुळे सबंध कुटुंबाला सेवकपणात अधिक सहभागी होण्याचे उत्तेजन मिळते, आणि आम्हास आध्यात्मिक तसेच आर्थिक साहाय्य पुरविण्यातील यहोवाचा प्रेमळ हात पाहून त्याचे अधिकाधिक अंतःकरणपूर्वक गौरव करीत राहावे असेच वाटू लागते.”

आज शंभरपेक्षा अधिक वर्षे व खासकरुन १९२० पासून स्वतःच्याच छापखान्यात स्वयंसेवक तत्त्वावर वॉचटावर सोसायटी पवित्र शास्त्रे व त्यावर आधारीत प्रकाशने छापून वितरीत करते. आज जी सर्व प्रकाशने उपलब्ध आहेत ती बेथेलगृही स्वयंसेवकांनी आपला वेळ आणि श्रम खर्च करून तयारी केलेली आहेत. यासोबतच मंडळीतील प्रचारक व पायनियर त्यांचे वितरण करण्यात केवढा मोठा वाटा उचलून आहेत; ज्याचे परिणामात, महत्त्वपूर्ण प्रचार कार्यात एक अधिक दान प्राप्त होत आहे.—मत्तय २४:१४.

तसेच ज्या ज्या देशातील आर्थिक परिस्थिती अधिक स्थिर आहे तेथील ख्रिश्‍चनांना हे ऐकून आनंद वाटतो की, त्यांच्या प्रेमळ आर्थिक देणग्या ज्या ते त्या त्या देशातील वॉचटावर संस्थेच्या शाखा दप्तरांकडे पाठवितात, त्यायोगे जे सर्व प्रचारकामात व शिष्य बनविण्यात ज्यांचा सर्व वेळ खर्च करतात, त्यांचे साहाय्य केले जाते. तसेच वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडकरवीचे मिशनरी, विभागीय, प्रांतिय देखरेखे तसेच खास पायनियर्स या सर्वांचे, त्यांच्या सर्ववेळेच्या सेवेला सतत पुढे चालू ठेवण्यात या निधीतून आर्थिक साहाय्य केले जाते.

कदाचित तुम्हाला बेथेलगृही राहणे किंवा जो आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक बांधकाम कामगार कार्यक्रम राबविला जात आहे त्यात सहभागी होणे शक्य नसेल. पण जे या कामात सहकार देत आहेत अशांचे साहाय्य करण्यात, आर्थिक सुलभता आपणापाशी असल्यास, ज्यांना “अधिक” सुलभता नाहीत अशांची मदत करता येते. याप्रकारे सर्वांस समानतेत लेखणारे कर्तव्यही पार पाडण्याचे साध्य होते, जसे २ करिंथकर ८:१४ मध्ये उल्लेखित आहे. अशा दानासोबत पत्रे असतातच, त्यातील एक पत्रात एका वृद्ध भगिनीने असे लिहिलेः

“यहोवाने मजवर पाठविलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल मी त्याचे फार आभार मानते. जी सर्व बांधकामे व संस्थेची कामे सतत चालू आहेत त्यांच्याबद्दल मी प्रार्थना करते.”

दुसऱ्‍या भगिनीने म्हटलेः “मी हे छोटेसे दान, ईश्‍वरशासितपणे काही हितावह करावे म्हणून पाठविले आहे. ही रक्कम ज्या बँका लवकरच कोसळणार त्यांच्यामध्ये राहून फुकट जाण्याऐवजी येथे वापरलेली बरी!”

एका बंधूने आपला प्रतिसाद या मार्गाने व्यक्‍त केलाः “यहोवाच्या गौरवार्थ आमच्या कमाईचा वापर करणे ही त्याची सूचना सैतानाच्या व्यवस्थीकरणातील “तिसरा कक्ष” म्हणजे व्यापार व त्याची हाव यापासून आमचा खरेपणाने बचाव करते. मी यासोबत हेही सांगू इच्छितो की, यहोवा आज जे काही पुरवीत आहे तिला अधिक गती प्राप्त होण्यात हातभार म्हणून मी काही दान देऊ इच्छितो; शिवाय मी त्याचे आभार मानतो की, त्याने मजकरिता ही सुलभता पुरविली आहे.”

वृद्ध व युवकांकडील दाने

वयस्करांचा विश्‍वासू पण दृढ निश्‍चय बघून केवढे उत्तेजक वाटते की, जरी या व्यवस्थीकरणाच्या अंतातून बचावून राहण्याची आशा ते बाळगून असले तरीही त्यांनी आपले अंतिम मृत्युपत्र तयार करून ठेवले आहे ते यासाठी की, जर मरण आले तर या मृत्युपत्रामुळे राज्याच्या कामाला फायदा मिळू शकेल. ज्यांनी अशाप्रकारचे मृत्युपत्र तयार केले व नंतर निवर्तले आणि त्यांच्या मृत्युपत्राप्रमाणे परिपूर्ती करणाऱ्‍या हक्कदारांकडून जी निवेदने प्राप्त झाली ती मृत्युपत्र लिहून देणाऱ्‍यांठायी दिसून येणाऱ्‍या सुंदर प्रवृत्तीचे दर्शन घडवितातः

“ती सर्वांसोबत खूप सहानुभूतीने वागे. . . . तिचे यहोवावर व त्याच्या सृष्टीवर अधिक प्रेम होते.”

“तिच्या सर्वस्वात राज्याच्या आस्थेला नेहमी प्रथम स्थान होते.”

“७० वर्षांच्या निष्ठावंत सेवेनंतर त्यांनी आपले स्वर्गीय जीवनाचे दान मिळविले. . . . आपणापाशी असणाऱ्‍या मिळकतीद्वारे ते नेहमी सत्याची वाढ पाहू इच्छित होते.”

तसेच, जे तरुण आपल्या जडवादीय वस्तुंचा यहोवाच्या सेवेत योग्य उपयोग करण्याचा मानस ठरवितात, अशांचे अनुभव ऐकून आनंद वाटतो. ब्रिटनमधील संस्थेच्या दप्तरात आलेल्या पत्रात एक पत्र एका युवक प्रचारकाकडून होते. तिने म्हटले की, तिला निबंध लिखाणाच्या स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले. तिने त्या पत्रासोबत पारितोषिकाची सबंध रक्कम पाठविली होती. तिने तिच्या “ख्रिस्ती जबाबदारी” याविषयीच्या निबंधात संस्थेच्या प्रकाशनातील माहिती उपयोगात आणली होती; यास्तव तिला वाटले की, पारितोषिकाची रक्कम हक्काने यहोवाची ठरते.

यहोवास काय परतफेड करणार याची विचारणा केल्यावर स्तोत्रसंहिता ११६ चा लेखक पुढे १३ व १४ व्या वचनात म्हणतोः “मी तारणाचा प्याला हाती घेऊन यहोवाच्या नामाचा धावा करीन. यहोवाला केलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.” यहोवाकडील तारणाच्या त्याच्या पुत्राद्वारे पुरविण्यात आलेल्या अमोल दानाची खरी आवड बाळगून आम्हास स्तोत्रकर्त्याप्रमाणे, आम्हावरील जबाबदारीची आठवण होते की, त्याच्याकडे धावा करावा व आपले अभिवचन पाळावे.

यहोवाने आम्हास कितीतरी फायदे पुरविलेले आहेत, व त्यांचे ऐवजात आम्ही जे करतो ते केवढे त्रोटक दिसते! तेव्हा, कृतज्ञतेच्या उद्‌गार रुपात आम्ही जेवढे शक्य तेवढे सर्व मार्गी करीत राहू याः “मी तुला उपकारस्मरणरुपी होमबली अर्पीन; आणि यहोवाच्या नामाची घोषणा करीन.”—स्तोत्रसंहिता ११६:१७.

[३१ पानावरील चौकट]

राज्य कार्यास काहीजण कसे अनुदान देतात

◻ देणग्याः पैशांचे आपखुशीने दिलेले अनुदान थेटपणे वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वानिया, २५ कोलंबिया हाइट्‌स, ब्रुकलिन, न्यूयॉर्क ११२०१ किंवा संस्थेच्या स्थानिक शाखा दप्तर कार्यालयाकडे पाठवावे. मालमत्ता जशी की इस्टेट व शिवाय दागिने वा चीजवस्तु दान केल्या जाऊ शकतात. या देणगीसोबत हे सरळपणे दान केले आहे हे स्पष्ट करणारे पत्र असावे.

◻ सशर्त दान योजनाः वॉचटावर सोसायटीच्या ट्रस्टला वैयक्‍तीक गरजेप्रसंगी ते देणगीदारास परत केले जातील या अटीवर पैसे दिले जाऊ शकतात.

◻ इन्शुअरन्सः लाईफ इन्शुअरन्स पॉलिसीवर किंवा निवृत्ती वेतन योजनेवर देणगी उपभोग घेणारा म्हणून द वॉचटावर सोसायटीचे नाव दिले जाऊ शकते. अशा योजनेबाबत संस्थेला कळविले जावे.

◻ ट्रस्ट्‌सः बँक सेव्हींग्ज खाते संस्थेस विश्‍वस्त यानाते ठेऊन चालविता येते. असे केल्यास कृपया संस्थेला कळवा. ठेवी, लेखी करारनामे व मालमत्ता तिच्या किंवा त्याच्या जीवनभरात देणगीदाराच्या फायद्याच्या दान योजनेखाली देणगी म्हणून दिल्या जाऊ शकतात. ही पध्दत खर्च व स्वइच्छित मृत्युपत्राची अनिश्‍चितता काढून टाकते. याची खात्री देताना मृत्युप्रसंगी मालमत्ता संस्थेला प्राप्त होते.

◻ मृत्युपत्रेः मालमत्ता वा धन मृत्युनंतर वॉचटावर संस्थेच्या हवाली कायदेशीरपणे दिले जाऊ शकते. त्याची प्रत संस्थेस पाठवा.

याविषयीच्या अधिक माहिती व सल्ल्यासाठी ट्रेझरर्स ऑफिस, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेन्सिल्वेनिया, २५ कोलंबिया हाईट्‌स, ब्रुकलिन, न्यूयॉर्क ११२०१ किंवा संस्थेच्या स्थानिक शाखा कार्यालयाला लिहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा