कठीण काम आनंद देते का?
“शेवटी कामच मानवासाठी सर्वकाही आहे, नाही का?” अशी जपानी धंद्यातील एक अग्रेसर धंदेवाईक बूनपेई ओत्सुकी याने विचारणा केली. उन्हाळी सुट्टी घेण्याची त्याची का इच्छा नव्हती याविषयीचे कारण देताना त्याने ते म्हटले. त्याचे हे शब्द, युद्धानंतर, विस्कळीत झालेल्या देशाची पुनर्बांधणी करताना इतर जपान्यांनी जे म्हटले होते त्यासारखेच आहेत. अमेरिकेच्या कोमोडर पेरीने जपानला त्याच्या दीर्घकालीन एकांतवासातून मुक्त केले तेव्हापासून जपानी लोकांना उद्यागशील लोक असे म्हणण्यात येऊ लागले. कठीण काम करण्यामध्ये यांना मोठा अभिमान वाटतो.
परंतु, औद्योगिक राष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त वार्षिक कामाचे तास जपानमध्ये असल्यामुळे त्याची आज अतिकामासू म्हणून टिका केली जात आहे. ही कामासूपणाची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी जपानी सरकार प्रयत्न करीत आहे. एका वर्तमानपत्रातील ठळक मथळा होताः “‘एवढ्या कष्टाने काम करण्याचे थांबवा’—मजूर मंत्रिमंडळ.” १९८७ च्या उन्हाळी सुटीविषयीच्या मोहिमेचे बोधवाक्य म्हणून याच मंत्रीमंडळाने असे देखील म्हटलेः “तुमच्या कार्यक्षमतेचा पुरावा म्हणजे सुटी घेणे हा होय.” दुसऱ्या शब्दात म्हटले तर सरकारच प्रत्यक्षात सांगत आहे की, “एवढे कष्ट तरी का घेता?”
हे खरे की, जपानमध्ये सर्वच समर्पित, कष्टाळू असे नाहीत. अलिकडेच जपान प्रॉडक्टीव्हिटी सेंटरने घेतलेल्या पाहणीत दिसले की, ७००० नव्या कामगारांपैकी केवळ ७ टक्के लोकांनीच खाजगी जीवनापेक्षा कामाला प्राधान्य दिल्याचे बोलून दाखविले. दुसऱ्या देशातही असाच कल दिसून येतो. जर्मनीमधील ॲलेन्सबॅरचर इन्स्टिट्यूट फॉर डेमोसकोपी या संस्थेच्या लक्षात आले की, १८ ते २९ वयोगटातील केवळ १९ टक्केच असा दावा करून म्हणाले की, कामाचा मोबदला लक्षात न घेता ते आपले काम होता होईल तितक्या उत्कृष्टपणे करण्याचा यत्न करतात.
जपानमधील पाहुणे कामगार तेथील युवकांपेक्षा अति कष्टाळू आहेत. टोकियोमधील एक मालक, हाताने कष्टाचे काम करणाऱ्या आपल्या अल्जेरियन कामगाराविषयी फार आत्मविश्वासाने बोलतो. तो म्हणतोः “जपानी लोक असे काम करायला पुढे येणार नाहीत; आणि आलेच तरी ते काम लवकर सोडून जातील.” नाही, कष्टाळू जपानी देखील कठोर परिश्रम करणारे नाहीत. लोक जेव्हा कष्टाचे काम करायला तयार होतात तेव्हा त्यामागे बळकट हेतू असतो.
कठीण परिश्रम करण्याची कारणे
“संपत्ती, स्थैर्यता, मालमत्ता व जगात पुढे जाणे” या गोष्टी मिळविण्यासाठी कष्टाळू जर्मन लोक धडपडतात असे जर्मन साप्ताहिक डेर स्पिगेल याने कळवले. होय, बरेच जण भौतिक संपत्ती मिळवावी यासाठी कष्टाचे काम करतात. यामुळे जीवनात स्थैर्यता मिळवता येते असे त्यांचे म्हणणे आहे. इतरांचा कष्ट करण्यामागील हेतू हा “जगात पुढे जाणे” किंवा प्रतिष्ठित बनण्यासाठी धडपड करणे या कारणासाठी असतो. शैक्षणिक स्पर्धात्मक व्यवस्थेने भारावून जे अशा ध्येयांच्या मागे धडपडतात, ते शेवटी औद्योगिक समाजात पदयंत्रावरील कामात अडकतात आणि त्यातच थकून जातात व शेवटी काहीच राहात नाही.
तथापि, पैसा व प्रतिष्ठा याच केवळ अशा गोष्टी नाहीत की, ज्यासाठी लोक कष्टाचे काम करतात. काही तर काम करावे म्हणून काम करतात. अशांना काम हेच सर्वकाही वाटत असते. इतरांना कामात आनंद वाटत असतो. “मी माझ्या प्रयोगशाळेत इतका गढून जातो की, माझ्या आध्यात्मिक गोष्टींकडे माझे लक्ष राहात नाही,” असे हाराऊ कबूल करतो.
याचप्रमाणे इतरांची सेवा व्हावी व त्यांचे कल्याण व्हावे या योग्य कारणासाठी इतर काही कामाला वाहून घेतात. इतरांचे जीव वाचविण्याचे ते कष्ट घेतात. उदाहरणार्थ, आग विझविणारा कर्मचारी दर दिवशी आपल्या उपकरणांना सुस्थितीत ठेवण्याची काळजी घेत असतो.
पण ही सर्व कारणे कठीण परिश्रम करण्यास योग्य आहेत का? हे सौख्यानंदाकडे नेऊ शकते का? खरेच, कोणते काम तुम्हाला आनंदी बनवू शकते?