तुम्ही कोणते ध्येय निवडून घ्याल?
तुम्ही शाळेला जाणारे युवक आहात का? तर युवक या अर्थी तुम्हापाशी उत्तम आरोग्य, जोम व उत्साह हा अपूर्व ठेवा आहे. तुमचे एकंदर आयुष्य तुम्हापुढे अजून मोठ्या हमरस्त्यासारखे उभे आहे ज्याची वाटचाल अद्याप तुम्हाला पूर्ण करायची आहे. मग, येणाऱ्या वर्षात तुमच्या जीवनाची वाटचाल कशी असणार?
आपल्या भवितव्याबद्दल विचार करताना तुमच्या मनात बरेच प्रश्न सामोरे येतील यात काही शंका नाही. मी महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेऊन डॉक्टर होणार, वकील होणार की शास्त्रज्ञ होणार? आर्थिक यशप्राप्ती व प्रतिष्ठा यांचे स्वप्न मला भुरळ पाडते का? अभिनय किंवा चित्रकला यांच्या माध्यमाने मी माझे नाव मशहूर करणार का? किंवा यहोवा देवाचा निष्ठावंत युवक या अर्थी मी पूर्ण वेळेची सेवा माझे जीवनभरचे ध्येय निवडून घेऊन “माझ्या तारूण्याच्या दिवसात मी निर्माणकर्त्याचे स्मरण करणार”?—उपदेशक १२:२.
वर्तमानपत्रे आणि मासिके यात तुम्हाला प्रसिद्ध लोकांचे जीवन अगदीच आवेशी व रंगीबेरंगी छटांनी चितारलेले दिसून येईल. पण तुम्हाला पूर्ण वेळेच्या उपाध्यायाबद्दल काय माहिती आहे? ते फारच मंद व कंटाळवाणे आहे की, खरेच मनोरंजक व उत्साहवर्धक आहे? ज्यांनी पूर्ण वेळेचे उपाध्यपण कित्येक वर्षें पत्करले त्यांच्या खऱ्या जीवन मानातील अनुभवांचा विचार केल्यावर तुम्हाला कदाचित याविषयी निश्चिती करण्यास मदत मिळेल.
त्यांनी पूर्ण वेळेचे उपाध्यपण का निवडून घेतले
व्हिएतनाम मध्ये युद्ध सुरु असता हॅरी हवाई येथील विद्यालयात शिकत होता. त्याची इतिहासाचा प्राध्यापक बनण्याची इच्छा होती. याशिवाय तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत पवित्र शास्त्राचा अभ्यास देखील करीत होता. आपल्या इतर विद्यार्थी मित्रांप्रमाणे तो त्या काळच्या विद्यार्थ्याच्या पुरोगामी मताचा पुरस्कर्ता बनला होता. त्याने मादक औषधांचे संशोधन आरंभिले व त्यात त्याला एल.एस.डी खूपच मनोरंजक वाटले. एके दिवशी भल्या पहाटेच तो उठला तेव्हा घरात सभोवार दारुच्या फुटलेल्या बाटल्या इतस्ततः पडलेल्या, सिगारेटची थोटकी व जमिनीवर लोळत पडलेले स्त्री पुरुष पहायला मिळाले. त्याने स्मरणशक्तीला ताण दिला तेव्हा कोठे त्याला हे अंधुकपणे आठवले की पोलिसांबरोबर त्याचा वाद झाला होता व शिवाय घरमालकानेही जागा खाली करण्याची आज्ञा केली होती. त्या क्षणीच त्याने विचार केला की एकतर पवित्र शास्त्राचा अभ्यास बंद केला पाहिजे किंवा स्वतःच्या जीवनात आमुलाग्र बदल केले पाहिजे. त्याने दुसऱ्या गोष्टीची केलेली निवड सूज्ञपणाची होती.
हॅरीने पवित्र शास्त्र ज्ञानात प्रगति साधली तेव्हा विद्यालयीन शिक्षण घेत राहणे व प्राध्यापक बनण्याचे ध्येय यांचे प्रलोभन गमावले गेले. त्याने विद्यालय सोडले, अर्धवेळची नोकरी धरली, बाप्तिस्मा घेतला व तो लवकरच पायनियर, पूर्ण वेळेचा प्रचारक बनण्याच्या पात्रतेचा झाला. या प्रकाराने हॅरीने एक नवे ध्येय पत्करले ज्यात आव्हान हे होतेच पण सोबत हितकरी व मनोरंजक अनुभव सुद्धा समाविष्ट होते.
खास पायनियरांच्या रांकेतून हॅरी व त्याच्या बायकोला मिशनरी या अर्थी पश्चिम पॅसिफिकच्या बेलाऊ या “खडकाळ बेट” येथे नेमणूक मिळाली. येथेच ते अद्याप सेवा करीत आहेत. अशा या द्विपात मिशनरी जीवन कसे असते?
बोटीने साक्षीकार्य
मेक्रोनेसिया या द्विपात बहुतेक साक्षीकार्य बोटीने किंवा पायी करावे लागते. हॅरी व त्याची बायको रिन यांना आठवते की त्यांनी प्रथमतःच बोटी द्वारे बाहेरील द्विपात कसा प्रचार केला. “आम्ही अशा घरी राहत होतो जे कित्येक मैल दूर होते व येथे नदी नागमोडी वळसा घालून जात होती. ते असे घनदाट अरण्य होते जे आमच्या डोक्यावर जणू हिरव्या छताप्रमाणे होते,” असे हॅरी आठवून सांगतो. “आम्ही आमच्या घरालगत नदीच्या मार्गाने प्रवास करीत असू व किनाऱ्यावरील लोकांकडे थांबून त्यांना प्रचार करत होतो एके दिवशी सायंकाळी घरी जाण्यासाठी आम्ही नदीकडे परतत होतो. एकाएकी रिन किंचाळली. मी अगदी वेळेवर मागे पाहिले तो असे दिसले की काहीतरी सरपटत जाऊन त्याने नदीत झेप घेतली. ती खाऱ्या पाण्याची मगर होती जी जगातील सर्वात मोठ्या जातीतली होती. आम्ही घरी सुरक्षित येऊन पोहचलो हे बरे झाले. नेहमी प्रमाणे नदीत अंघोळ करण्याची वेळ झाली पण ती प्रचंड मगर बघून नदीत उतरण्याचा हिय्या होईना. त्यामुळे एका बादलीला दोरी बांधून तिने बोटीत पाणी उपसून घेऊन आम्ही अंघोळ उरकली.”
वाहन अथवा बोटीद्वारे कित्येक खेडी व घरे यांच्याकडे जाता येत नसल्यामुळे मिशनऱ्यांना नारळाच्या रांगा लागलेल्या सुंदर जंगलातून कित्येक तास पायी प्रवास करून मित्रत्व दाखविणाऱ्या गरीब लोकांचा संपर्क घ्यावा लागतो. हॅरी म्हणतो: आम्हाला सत्याविषयी उत्तम प्रतिक्रिया दाखविणारे लोक आढळत. हे विरळजागी राहणारे लोक उत्तम पाहुणचार दाखवीत. ते सरसर नारळाच्या झाडावरून चढून जात, ताजा नारळ घेऊन खाली येत, कुऱ्हाडीने त्याचे डोके छाटीत व आतील ताजे पाणी नारळाच्या “खोक्या”सहित प्यावयास देत. ते फारच ताजेतवाने, सुमधुर व पौष्टिक पेय होते.”
बेलाऊ येथील मिशनऱ्यांना प्रचार कार्याबद्दल कोणते प्रतिफळ लाभले? तेथे आता ४२ खऱ्या ख्रिश्चनांची मंडळी स्थापली गेली आहे. गेल्यावर्षी दर महिन्याला सरासरी १० जण पूर्ण वेळेच्या कार्यात सहभागी झाले आणि १९८५ मध्ये ख्रिस्ताच्या स्मरण दिनास १९३ जणांची उपस्थिती होती.
पूर्ण वेळेच्या सेवेत १७ वर्षे घालविल्यानंतर हॅरीला, त्याने यहोवाची सेवा आपल्या जीवनभर करण्याचा जो निर्धार केला होता त्याच्याबद्दल आता कसे वाटते? “मला १७ वर्षांआधी देवाचे सत्य समजले नसते तर माझा वेळ व माझे जीवन जागतिक गोष्टींमध्ये वाया गेले असते,” असे तो म्हणतो. “मला पायनियर व मिशनरी असताना सडा होतो व विवाहीत झालो तेव्हा देवाच्या कार्यापासून जी मनःशांती व निर्भयता लाभली आहे ती मला कधीच प्राप्त झाली नसती. रिन बरोबर विवाह झाल्यावर आम्ही एकत्रपणे आठ वर्षाच्या मिशनरी कार्याचा अनुभव घेतला आहे.”
पूर्ण वेळेच्या सेवेची शिफारस करणे
मिल्टन हवाईमध्ये माध्यमिक शाळेत शिक्षण घेत होता. इतरजण त्याला आर्थिक निर्भयता असणारे ध्येय निवडण्याचे प्रोत्साहन देत होते. तरीपण त्याचे दोन वडील भाऊ व बहिण यांनीही त्याला ते होते त्या पूर्ण वेळेच्या सेवेचा विचार करण्याचे उत्तेजन दिले. याशिवाय त्याने पूर्ण वेळेच्या कार्याच्या आशीर्वादाविषयी आणि आम्ही आमच्या जीवनात यहोवा देवाला प्रथम स्थान देऊन त्याच्यावर आपली भिस्त ठेवली तर तो आमच्या भौतिक गरजा कशा पूर्ण करू शकतो त्या विषयीचे भाषण ऐकले होते. तेव्हा मिल्टन म्हणतो: “यामुळेच मला माझ्या जीवनात पूर्ण वेळेचे उपाध्यपण निवडून घेण्याची चालना मिळाली. या कारणामुळे माझे माध्यमिक शिक्षण संपविण्या अगोदर मी बाप्तिस्मा घेतला व पूर्ण वेळेच्या कार्यात प्रवेश केला.”
मिल्टनने पायनियरींग सुरु केली त्यावेळी त्याच्या मंडळीत दहापेक्षाही कमीच पायनियर्स होते. तर मग त्याने याविषयी काय केले? “मी तरूण बांधवांना मजसोबत प्रचार कार्यात येऊन काम करण्याचे आमंत्रण दिले,” असे तो म्हणतो. “याचा असा परिणाम झाला की यापैकी बहुतेक जण मजसोबत नंतर यापूर्ण वेळेच्या कार्यात येऊन मिळाले.”
“माझे मेहुणे स्वतः मंडळीत वडील व पायनियर होते,” मिल्टन पुढे म्हणतो. “आम्ही एकाच मंडळीत होतो आणि आम्ही इतरांना पायनियर होण्याचे एकत्र मिळून प्रोत्साहन दिले. असे ठरले की मी युवकांना उत्तेजन द्यावे तर ते बहिणींना उत्तेजन देतील. कित्येक महिन्यानंतर मंडळीत २५ पूर्ण वेळेचे उपाध्याय झाले. विभागीय देखरेखे आले तेव्हा त्यांनी यापैकीच्या दहा जणांना खास पायनियरींगसाठी अर्ज करण्यास लावून जवळच्या मंडळीत स्थलांतरीत होण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही पुन्हा दहा जणाना मदत करून पायनियर कार्यात आणावे असे ठरविले की ज्याकरवी आम्हातून गेलेल्या दहा जणांची ते जागा भरून काढू शकतील. विभागीय देखरेख्यांची पुढची भेट येईपर्यंत १५ अधिक जणांनी पूर्ण वेळेची सेवा निवडून घेतली. आता आम्ही ३० पायनियर्स होतो. परत विभागीय देखरेख्यांना आम्हातील दहा जणांना दुसऱ्या मंडळीत स्थलांतरीत होण्यास सांगितले. तेव्हा परत आम्ही आम्हामध्ये निर्माण झालेली पायनियरांची पोकळी भरुन काढण्याची ठरविले. पुढची विभागीय देखरेख्यांची भेट येईपर्यंत आणखी २० जणांनी पायनियरींग कार्याकरता अर्ज भरले!”
पायनियरींगच्या संसर्गजन्य आत्म्याने युवकांना भारावून टाकले होते. माध्यमिक शाळेत पोहचल्यावर बहुतेक प्रत्येकाचा पूर्ण वेळेची सेवा हा निर्धारच ठरला होता. वयाच्या १३व्या वर्षीच एका भगीनीने पायनियरींग करण्याचे ठरवले. तिने म्हटले: “ही जणू स्वाभाविक गोष्ट वाटते.” ती व तिच्या मंडळीतील युवकांनी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही. शाळा सुटल्यावर गटाच्या साक्षीकार्याची व्यवस्था आखण्यात आली तेव्हा तीन वेगवेगळ्या शाळातील ओघाओघाने ६० विद्यार्थ्यांनी पायनियरांना या कार्यात सोबत दिली. उन्हाळयाच्या सुट्टीत तर हे गटाचे साक्षीकार्य इतके प्रोत्साहन दायक दिसले की याला जास्तीत जास्त १३० जणांनी आपली हजेरी दाखवली!
पायनिरींगने मोठ्या हक्काप्रत निरविले
“१९७४ मध्ये” मिल्टन आठवून सांगतो, “मला माझ्या घरापासून ४,००० मैल (६,४०० कि.मी) दूर असलेल्या मायक्रोनेशिया येथील बेलाऊ या द्विपावर मिशनरी कार्य करायची नियुक्ती मिळाली.” या उष्णदेशीय हिरव्यागार प्रदेशातून दुरदूरवर पायी प्रवास करणे आणि बोटीने प्रवास करणे या गोष्टी हस्तगत करून घेणे एक आव्हान होते.
एका उष्ण, दमट दिवशी बरेच तास धुळीच्या पायवाटेने चालत गेल्यावर, मिल्टन आठवतो, ‘आम्ही फारच थकलेल्या दशेत एका आस्था व्यक्त करणाऱ्या घरी येऊन पोहचलो. आईने आपल्या मुलाला नदीकडे पाठवले. तो नदीच्या पाण्यात थंड झालेले मोठे कलिंगड आम्हासाठी घेऊन आला. आम्ही तर ते आर्ध्यापेक्षा अधिक खाऊन फस्त केले! ते आम्हाला खूपच उत्साहवर्धक वाटले.”
सुमारे वर्षभराच्या मिशनरी कार्यानंतर मिल्टनने तीन ध्येयांची पूर्ति बेलाऊ मध्ये करण्याचे ठरविले. स्थानिक बांधवांना मंडळीतील जबाबदाऱ्या पत्करण्यास मदत देणे, युवकांना पूर्ण वेळेच्या कार्यात प्रवेश करण्याची मदत देणे आणि मंडळीने स्वतःचे राज्य सभागृह बांधणे ही ती तीन ध्येये होती. आता मिल्टन म्हणतो: “येथे दहा वर्षाच्या कालावधीनंतर या सर्व तीन ध्येयसाठी केलेल्या प्रार्थनांचे उत्तर मला मिळत आहे.”
मिल्टनने १४ वर्षांआधी पूर्ण वेळेची सेवा हे आपले जीवन ध्येय बनविले तेव्हा त्याने योग्यच निवड केली होती असे त्याला वाटते का? माझ्या पूर्ण वेळेच्याकार्याच्या या सर्व वर्षात एक गोष्ट मला प्रामुख्याने शिकायला मिळाली ती ही की, आमची इच्छाच आहे तर यहोवा योग्य वेळी आमचा वापर करून घेईल.” त्याने उत्तर दिले. “आम्ही कधीही माघार घेता कामा नये; उलटपक्षी त्याच्या सेवेत आपणास स्वेच्छेने सादर करण्याचे चालू ठेवावे. यहोवाची, पूर्ण वेळेचा उपाध्याय या अर्थी सेवा करून घेण्याचे ध्येय निवडून घेतल्याचा तुम्हाला केव्हाही पस्तावा वाटणार नाही.”
तुम्ही स्वतःच्या जीवनाचा कसा वापर कराल?
युवकांनो, तुम्ही आपल्या भविष्याचा कसा वापर होऊ द्याल? तुमच्या स्वतःसाठी की पूर्णपणे यहोवा देवासाठी? (रोमकर १४:८) आपल्या युवकावस्थेत पूर्ण वेळेच्या सेवा कार्याच्या ध्येयाचा प्रार्थना पूर्वक विचार करा. “देवाच्या इच्छेस्तव” तुमच्या उरलेल्या जीवनाचा वापर करण्यात येशूचे उदाहरण अनुसरा. (१ पेत्र ४:२) हे तुम्हाला घातक अशा जागतिक आकांक्षा, ध्येये व सहवास यापासून संरक्षण देण्यात सहाय्य करील. स्वतःच्या परिस्थितीचे परिक्षण करून पहा आणि पूर्ण वेळेच्या कार्यात शिरण्याच्या ध्येयासाठी एक निश्चित तारीख ठरवून टाका. त्याकरता परिश्रम घ्या. ते तडीस न्यावे याकरता यहोवाकडे प्रार्थना करा.—इफिसकर ६:१८.
पायनियरींगची एक ध्येय या नात्याने केलेली निवड तुम्हाला वाटणार इतक्या सुंदर हक्काप्रत निरवील. तुमचे जीवन आनंद, निर्भयता व प्रेम यांनी भरून जाईल. ते तुम्हाला उत्साहवर्धक, मनोरंजक आणि तृत्पीदायक वाटेल. सर्वांपेक्षा अधिक म्हणजे तुमचे जीवन यहोवास संतुष्टकारक वाटू लागेल.—नीतीसूत्रे २७:११.