“माझ्या मुलाने मला एक मिनिट सुद्धा शांत बसू दिले नाही”
असे हे उद्गार एका बापाने, वॉच टॉवर संस्थेच्या पेरू शाखेला भेट दिली तेव्हा काढले. त्यांनी म्हटले:
“गेल्या कित्येक आठवड्यांपासून माझा लहान मुलगा, त्याला माय बुक ऑफ बायबल स्टोरीज या पुस्तकाची प्रत मिळावी म्हणून मला सारखा त्रास देत आहे. त्याच्या विद्यार्थी मित्राकडे हे पुस्तक बघितल्यावर माझ्या मुलाने मला एक मिनिट सुद्धा शांत बसू दिले नाही. हे पुस्तक मला कोठे मिळेल याचा मी सर्वत्र शोध घेत राहिलो. शोधायला कोठून सुरवात करावी याचा मी थोडा देखील विचार केला नाही. पुस्तक दुकानात मी विचारणा केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
“माझ्या कार्यालयीन कर्मचाऱ्याकडे मी याविषयी बोलणी केली तेव्हा त्याने म्हटले की, त्या पुस्तकासाठी मी यहोवाच्या साक्षीदारांचा संपर्क साधावा. मी म्हणालो, ‘नाही, ते या लोकांकडे मिळू शकणार नाही. ते तर नेहमीच माझ्या दारी येतात पण मीच त्यांना घालवून देतो.’ पण माझ्या या मित्राने मला खात्री दिली की तुम्ही वाईट लोक नाहीत—खरे म्हणजे तो तुमच्याबद्दल चांगलेच बोलला आणि म्हणाला की, ज्या पुस्तकाचा मी शोध घेत आहे ते खूपच चांगले पुस्तक आहे. तर पहा, मी येथे आलो आहे. मला ते पुस्तक द्या.”
हे सुंदर चित्रांचे, मोठ्या अक्षर छपाईचे पुस्तक तुम्हालाही आवडेल अशी आम्हास खात्री वाटते. त्यातील ११६ पवित्र शास्त्रीय अहवाल वाचकाला पवित्र शास्त्र एकंदरीत काय आहे त्याची कल्पना देते.