वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ४/०२ पृ. ४
  • पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • पायनियर सेवा—तुम्हाला ती जमेल का?
    आमची राज्य सेवा—१९९८
  • तुम्ही तुमच्या मुलांकरता कोणती ध्येये राखली आहेत?
    आमची राज्य सेवा—१९९५
  • नियमित पायनियर सेवेत अधिक बांधवांची गरज आहे
    आमची राज्य सेवा—१९९६
  • “तू एक चांगला पायनियर बनशील!”
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ४/०२ पृ. ४

पूर्ण-वेळेच्या सेवेतील आनंद

१ तरुण या नात्याने तुम्ही नक्कीच तुमच्या भवितव्याचा विचार केला असेल. नीतिसूत्रे २१:५ म्हणते: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात.” जीवनातील ध्येयांचा गंभीरपणे विचार केल्याने तुमचे भले होईल. तुम्ही भवितव्याच्या योजना करता तेव्हा, पूर्ण-वेळेची सेवा सुरू करण्याचा विचार करा. असे का केले पाहिजे?

२ तरुणपणी पायनियरींग सुरू केलेल्या बंधूभगिनींना, पूर्ण-वेळेच्या सेवेविषयी त्यांचे मत विचारा आणि पाहा ते एकच गोष्ट सांगतील: “तो माझ्या जीवनातला सर्वात उत्तम काळ होता!” तरुणपणीच पूर्ण-वेळेची सेवा सुरू केलेल्या एका बांधवाने काही वर्षांनी असे म्हटले: “तरुण असताना मी माझा वेळ कसा घालवला याचा विचार करतो तेव्हा मला खूप समाधान मिळते व मी म्हणू शकतो, की मी, ‘आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर,’ या सुज्ञ सल्ल्याचे पालन केले आहे.” (उप. १२:१) मुलांनो, स्वतःच्या व तुमच्या पालकांच्या विचारपूर्वक योजनांनंतरच तुम्हाला, तुमच्या तारुण्याच्या दिवसांत अशाप्रकारचा आनंद अनुभवता येऊ शकेल!

३ पालकांनो, पूर्ण-वेळेच्या सेवेसाठी उत्तेजन द्या: यहोवा काळजी घेणारा देव आहे; तुम्ही कोणत्या मार्गाने गेले पाहिजे हे त्याला चांगल्याप्रकारे माहीत आहे. (यश. ३०:२१) अशाप्रकारे प्रेमळ मार्गदर्शन पुरवून तो ख्रिस्ती पालकांसाठी स्वतःचे एक उदाहरण मांडतो. आपल्यासाठी कोणता उत्तम मार्ग आहे हे निवडण्याचे काम पूर्णपणे मुलांवर टाकून देण्याऐवजी, पालकांनो तुम्ही त्यांना सुज्ञपणे प्रशिक्षित करा जेणेकरून ते असा मार्ग निवडतील ज्यामुळे त्यांना यहोवाचे आशीर्वाद प्राप्त होतील. मग मोठे झाल्यावर, तुम्ही दिलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांना, “चांगले आणि वाईट” यांतला भेद कळेल. (इब्री ५:१४) आपण आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू शकत नाही हे प्रौढांना अनुभवानंतर कळते; त्यांना मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहावे लागते. (नीति. ३:५, ६) तेव्हा, जीवनात कम अनुभव असलेल्या तरुणांना यहोवावर निर्भर राहण्याची किती अधिक गरज आहे!

४ पालकांनो, तुमची मुले किशोरावस्थेत येतात तेव्हा किंवा त्याही आधी, त्यांना पुढे काय करायचे आहे याविषयी त्यांच्याशी उघड चर्चा करा. शाळा सल्लागार, शिक्षक, वर्गमित्र त्यांना जगीक, भौतिक गोष्टींचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित करतील. व्यावहारिक प्रशिक्षण देणारे कोर्स निवडण्यास त्यांना साहाय्य करा जेणेकरून देवाच्या राज्याकडे कानाडोळा न करता ते आपल्या भौतिक गरजा पूर्ण करू शकतील. (१ तीम. ६:६-११) पुष्कळ वेळा, उच्च शालेय शिक्षण आणि व्यावहारिक प्रशिक्षण किंवा एखादे कौशल्य, सामान्य पायनियर सेवा सुरू करताना आपल्या दररोजच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे ठरू शकते.

५ अविवाहित राहिल्याने मिळणारे आशीर्वाद प्राप्त करण्याचे उत्तेजन आपल्या मुलांना द्या. पुढे त्यांनी लग्न करायचे ठरवले तर, लग्न झाल्यावर येणाऱ्‍या भारी जबाबदाऱ्‍या उचलायला ते समर्थ असतील. पायनियरींगविषयी, अधिक गरज आहे त्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी, बेथेल सेवेविषयी सकारात्मक गोष्टी बोलून, यहोवाला संतुष्ट करणारे, इतरांना फायदेकारक ठरणारे व स्वतःला आनंद देणारे जीवन जगण्याची उर्मी त्यांच्या मनात अगदी कोवळ्या वयापासूनच तुम्ही निर्माण करू शकता.

६ तरुणांनो, पूर्ण-वेळेच्या सेवेला प्राधान्य द्या: तरुणांनो, पायनियर कार्य कसे असेल याविषयी तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही. शाळा चालू असताना किंवा सुट्या पडतात तेव्हा तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही साहाय्यक पायनियरींग करण्याचा प्रयत्न करू शकता. तेव्हा तुम्हाला समजेल की पायनियर सेवा खरोखरच किती समाधान देणारी सेवा आहे! मग, आता आणि शाळेच्या सुट्या संपेपर्यंतच्या काळात साहाय्य पायनियरींग करण्याचे तुम्ही ध्येय ठेवू शकाल का?

७ तुम्ही देवाच्या संघटनेत, तरुण बांधव असाल तर सेवा सेवकाची योग्यता प्राप्त करण्याचा गंभीरपणे विचार करा. (१ तीम. ३:८-१०, १२) त्याचबरोबर, हेही ठरवा, की तुमचे अपेक्षित वय झाल्यावर तुम्ही बेथेल सेवेसाठी अर्ज भरणार की सेवा प्रशिक्षण प्रशालेला उपस्थित राहणार. पायनियर सेवेच्या अनुभवामुळे तुम्हाला, वक्‍तशीरपणा, व्यक्‍तिगत गोष्टींच्याबाबतीत सुव्यवस्थितपणा, इतरांशी जमवून घेणे, जबाबदाऱ्‍या सांभाळणे यांसारखे महत्त्वपूर्ण धडे शिकायला मिळतील. या सर्व गोष्टींमुळे तुम्ही नंतर सेवेतील मोठे विशेषाधिकार सांभाळण्यासाठी तयार व्हाल.

८ पूर्ण-वेळेच्या सेवेत यशस्वी होण्यामागचे एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे, ईश्‍वरशासित गोष्टींमध्ये उद्योगी असणे. अशाप्रकारची मनोवृत्ती बाळगण्यास प्रेषित पौलाने उत्तेजन दिले व यामुळे मिळणाऱ्‍या आशीर्वादांबद्दलही सांगितले: “जे काही तुम्ही करिता ते . . . प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा. प्रभूपासून . . . प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे.” (कलस्सै. ३:२३, २४) पूर्ण-वेळेच्या सेवेत तुमच्यावर यहोवाच्या आशीर्वादांचा वर्षाव होवो!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा