इतरासमोर नम्र हृदयाने प्रार्थना करणे
इस्राएलांच्या इतिहासातील तो आनंददायी दिवस होता, राजा दाविदाने यहोवाचा कोश नवीन राजधानीचे शहर यहरूशलेम मध्ये आणण्याची योजना केली होती. सर्व लोकापुढे त्याने हर्षाने यहोवाची स्तुती केली व त्याच्या अंतःकरणापासूनच्या प्रार्थनेचा शेवट या शब्दानी केला की: “इस्राएलाचा देव यहोवा याचा अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत धन्यवाद होवो.” ऐकणाऱ्यांनी पूर्ण हृदयाने “‘आमेन’ म्हणून यहोवाचे स्तवन केले.”—१ इतिहास १६:३६, द बायबल इन लिव्हींग इंग्लीश.
पुरातन काळात, देवाच्या लोकात अशामार्गी प्रार्थनेत इतरांचे लायक व्यक्तीने प्रतिनीधीत्व करणे हे असामान्य नव्हते. सद्याही यहोवाचे लोक त्याचा अवलंब करतात. मंडळीच्या सभा, संमेलने, कुटुंबाच्या भोजन समयी व कौटुंबिक पवित्रशास्त्र अभ्यास हे असे प्रसंग आहेत जेंव्हा ख्रिस्ती पुरुष—कांही वेळेस स्त्रीया—यांना प्रार्थनेमध्ये इतरांचे प्रतिनीधीत्व करण्याचा हक्क लाभतो. (१ करिंथकर ११:४, ५) परिणाम? दाविदाच्या दिवसाप्रमाणे जे ऐकतात व “आमेन” म्हणतात त्यांना भारावल्यासारखे होते व यहोवा सोबतचे नातेसंबध दृढ झाल्याचे वाटते.
प्रार्थनेमध्ये इतरांचे प्रतिनीधीत्व करणे गहन जबाबदारी आहे. प्रार्थना करतो त्याने ऐकणाऱ्याच्या अंतकरणात काय आहे ते विचार योग्यपणे व्यक्त केले पाहीजेत. त्याची प्रार्थना त्यांच्या आध्यात्मिकतेवर परिणाम करते. यास्तव ज्यांना याचा हक्क लाभतो ते “माझी प्रार्थना धूपाप्रमाणे तुजपुढे सादर होवो” या दाविदाच्या विनंतीचा साद उमटविण्याचा प्रयत्न करतात.—स्तोत्रसंहिता १४१:२.
यहोवापुढे आमची प्रार्थना धूपाच्या सुवासा प्रमाणे होण्यासाठी आम्ही ती कशी तयार करू शकतो? यहोवाने पुरविलेल्या मार्गदर्शनाच्या प्रकाशात आम्ही काय व्यक्त करणार यावर पूर्वदृष्टी देण्याने. पवित्रशास्त्र पुष्कळ उदाहरणीय प्रार्थना, त्याचप्रमाणे प्रार्थना या विषयावरील बऱ्याच उत्तम सूचना सामावून आहे. त्यांच्या माहीतीचा विचार करणे हे आम्हास खासकरून इतरांच्या वतीने व ते ऐकत असता प्रार्थना करताना महत्वपूर्ण असणारे सहाय्यक तत्व शिकविल.
नम्र हृदयाने
यातील एक तत्व, नम्र लोकांनी केलेल्या प्रार्थना यहोवा ऐकतो हे आहे. (२ इतिहास ७:१३, १४) स्तोत्रकर्ता आम्हास सांगतो: “यहोवा परम थोर आहे तरी तो नम्र जनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरुन ओळखितो.” (स्तोत्रसहिंता १३८:६) याचे उदाहरण म्हणून मंदिराचे समर्पण प्रसंगावेळीच्या जाहिर प्रार्थनेतील राजा शलमोनाची नम्रता पहा. त्याने या पृथ्वीवर पुर्वी कधीही उभारली गेली नव्हती अशी भव्य इमारत नुकतिच बांधून पूर्ण केली होती. पण या गोष्टीने त्यास गर्विष्ट बनविले नव्हते. त्याऐवजी, त्याने प्रार्थिले: “देव या भूतलावर मानवा बरोबर खरोखर वास करील काय? आकाश व नभोमंडळ यात तुझा समावेश होत नाही; तर हे जे मंदिर मी बांधले आहे यात तो कसा व्हावा?”—२ इतिहास ६:१८.
आम्ही ही खासकरून इतरांच्या वतिने प्रार्थना करीत असताना नम्र असलेच पाहिजे. आवाजाच्या सुराकरवी नम्रता दाखविली जाते. अर्थात ख्रिश्चनाने नम्रतेचा आव आणण्याचे किंवा पावित्र्याचे ढोंग टाळलेच पाहिजे. नम्र प्रार्थनांना ढोंगी किंवा नाटकी आवाजाची गरज नाही. (मत्तय ६:५) नम्रता ही आम्ही जे व्यक्त करतो त्या करवीही दाखविली जाते. आम्ही नम्रतेने प्रार्थना करू तर यहोवाने विशिष्ठ गोष्टी केल्याच पाहीजेत असा अट्टाहास करणार नाही. यापेक्षा, आम्ही त्याने त्याच्या इच्छेच्या संमतीकारक मार्गाने ती हालचाल करावी अशी विनंती करू.—स्तोत्रसंहिता ११८:२५ पडताळा.
नम्रता आम्हास एखादा मुद्दा शाबित करण्यास किंवा एखाद्या व्यक्तीस व्यक्तीगत सुचना प्रार्थनेतून देण्याचे टाळण्यास लावील. नाहीतर आम्ही येशूने त्याच्या दिलेल्या दाखल्याच्या एकातील परूशांचा आत्मा दाखविणारे असे होऊ. येशू, एकाच वेळी मंदिरात प्रार्थना करणारा परूशी व जकातदार याविषयी बोलत होता. परूश्याने म्हटले: “हे देवा, इतर माणसें लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्याच्या सारखा किंवा ह्या जकातदारा सारखा ही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; मला जे सर्व मिळते त्याचा दशांश देतो. परंतु जकातदार त्याचे ऊर बडवीत म्हणाला: “हे देवा, मज पाप्यावर दया कर.” येशूचा निष्कर्ष काय होता? “हा मनुष्य [जकातदार] त्या [परूशी] मनुष्यापेक्षा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला.”—लूक १८:९–१४.
खरोखर नम्र असणारे यहोवाचे सेवक त्याजसमोरचे त्यांचे स्थान जाणतात. ते देवदूतापेक्षा किंचित कमी आहेत; पण यहोवा हा तर सनातन व विश्वाचा सार्वभौम आहे. (स्तोत्रसंहिता ८:३–५, ९; १०:१–४) या जगातील सत्ताधीश व राजे यांचे सोबत बोलण्याची संधी व्यक्तीस लाभते तेंव्हा ते बहुदा आदरयुक्त व मान देऊन बोलतात व या हक्काचा सन्मान करतात. “जिवंत देव व सनातन राजा” याजसोबत बोलण्याची संधी मिळते तेंव्हा आम्ही यापेक्षा कमी आदर व रसिकता दाखविणारे असावे का? (यिर्मया १०:१०) कदापि नाही. अशाप्रकारे, असे वाक्यप्रयोग जसे “गुड आफ्टरनून यहोवा” किंवा “आम्ही तुजबरोबर बोलू इच्छीतो यहोवा” त्याचप्रमाणे अशाप्रमाणचे शब्दप्रयोग जसे “तु आज कसा आहेस?” “येशूला आमचे प्रेम दे” किंवा, “तुझा दिवस चांगला जावो” यास आमच्या प्रार्थनेस थारा नसावा.—उपदेशक ५:१, २ पडताळा.
परंतु, प्रेषित पौलानेच “मनमोकळे पणाने’ यहोवाचा धावा करा असे म्हटले नाही का? (इब्रीकर ४:१६; पडताळा १ योहान ३:२१, २२) आम्हास साजेसे वाटते त्याप्रमाणे मुक्तकंठाने बोलण्यास मुभा देत नाही का? नाही. पौलाचे ते शब्द आम्ही पापी असताही येशूच्या खंडणीमुळे यहोवाकडे धावा करू शकतो या संदर्भित करून आहेत. आम्ही त्यास कोणत्याही वेळेस व कोणत्याही विषयाबाबत आर्जवू शकतो. तथापि मुक्तकंठाने व्यक्तव्य करीत असता आम्ही आमचा स्वतःचा क्षुद्रपणा ओळखला पाहिजे. अशाप्रकारे यहोवा म्हणतो: “पण जो दीन व भग्नहृदयी आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो त्याजकडे मी पाहतो.”—यशया ६६:२.
धोक्याची सूचना
येशू ख्रिस्ताने डोंगरावरील प्रवचनात प्रार्थनेवर पुढील सूचना दिली. त्यात त्याने बजावले की प्रार्थना करताना “परराष्ट्रीय करतात त्याप्रमाणे वारंवार एकाच गोष्टीची धोकंपटी करू नका.” (मत्तय ६:७) याचा अर्थ असा नाही की आम्ही एकाच गोष्टीं बद्दल प्रार्थना पुन्हा करू नये (ज्याची आम्हास खात्री आहे की ही गोष्ट योग्य आहे) आम्हास सांगितले आहे की: “मागा म्हणजे ते तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्या साठी उघडले जाईल.” (मत्तय ७:७) यापेक्षा, येशूच्या म्हण्याचा अर्थ, त्यागोष्टी अर्थहीन होण्यापर्यंत परत परत मागू नयेत हा आहे दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर “व्यर्थ बडबड करू नका.”—मत्तय ६:७, संदर्भ पवित्र शास्त्राची तळटीप.
विशिष्ट लोक शब्दाकेडे कोणतेही ध्यान ने देता पुन्हा पुन्हा प्रार्थनेचा एकच नमुना म्हणण्यात पटाईत आहेत. कांहीवेळेस अशा प्रकारचा नमुना अशा भाषेत असतो जो प्रार्थना करणाऱ्यासच समजत नाही. ही एक प्रकारची “व्यर्थ बडबड” आहे अजून एक: जो ख्रिस्ती सहजपणे दररोज यहोवास आभार प्रदर्शन करताना एकच वाक्यप्रणाली उपयोगात आणण्याच्या सवयीत नकळत पडला असेल त्याचा विचार करा. सरतेशेवटी ती वाक्यरचना अर्थहिन बनते. तसेच इश्वरी नाम यहोवा याचा उपयोग असा केला जाऊ शकतो. हे खरे आहे की आम्हास यहोवाचे नाव घेऊन धावा करण्याचे आर्जविले आहे. (स्तोत्रसंहिता १०५:१) परंतु ते नाव आम्ही प्रत्येक वाक्यात घेत राहीलो तर मग ते बोलण्याची विशिष्ठ ढब किंवा ‘व्यर्थ बडबड’ या प्रमाणे बनते.
पौलाने अजून एका महत्वपूर्ण तत्वास त्याने असे लिहीताना सामोरे आणले की: “मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर मला मिळालेले आत्म्याचे दान प्रार्थना करते पण माझ्या बुद्धीचा कोणालाही उपयोग होत नाही. . . . तू केवल आत्म्याच्या दानामुळे प्रार्थना केली तर जो अशिक्षीत लोकापैकी आहे तो तुझ्या उपकार स्तुतीला ‘आमेन’ कसा म्हणेल? कारण तू जे बोललास ते त्याला समजत नाही.” (१ करिंथकर १४:१४–१६) पौलाच्या दिवसात विशिष्ट ख्रिश्चनांना भाषांचे दान प्राप्त झाले होते व स्पष्टपणे यातील कांहीनी मंडळीपुढे त्या भाषेत प्रार्थना केली. परंतु प्रेषित पौलाने दाखविले की या प्रार्थना मंडळीतील इतरांना समजत नव्हत्या.
सध्या आम्हापाशी ते आश्चर्यकारक भाषांचे दान नाही. परंतु इतरांच्या वतीने प्रार्थना करणाऱ्या ख्रिश्चनाने ती इतरांना समजेल अशामार्गी करावी. उदाहरणार्थ जाहीर व्याख्यानाच्या सुरुवातीस आम्ही प्रार्थनेमध्ये जाहीर जनतेस आम्हासोबत सहभागी होण्याचे अर्जवितो. अशाप्रार्थनेत नवोदीताना न समजणाऱ्या क्लिष्ट गोष्टी व तशी भाषाशैली टाळावी हे व्यवहार्य आहे.
प्रार्थना केवढ्या दिर्घ असाव्यात?
खाजगी प्रार्थना आमची इच्छा असेल तेवढ्या लांब कराव्यात. येशूने १२ शिष्य निवडण्यापूवी रात्रभर प्रार्थना केली. (लूक ६:१२) परंतु इतरांच्या पुढील प्रार्थना केवढी असावी? त्याच्या मृत्युचे स्मरण देणारी बोध चिन्हे वाटण्या अगोदर येशूने ‘आशीर्वाद मागीतला’ ‘व आभार प्रदर्शन’ केले, ज्याकरवी हे स्पष्टच आहे की ते संक्षिप्त प्रार्थनेने केले. (मत्तय २६:२६–२८) उलटपक्षी, मंदिराच्या समर्पणा वेळची शलमोनाची प्रार्थना बरीच दीर्घ होती. यासारखीच मृत्युपूर्व रात्री येशूची प्रार्थना होती.—२ इतिहास ६:१४–४२; योहान १७:१–२६.
तथापि जाहीर प्रार्थना केवढी लांबलचक असावी यासाठी नियम नाही. परंतु तसेच लांबड लावण्यात कांही तथ्य ही नाही. वस्तुतः येशूने, शास्त्री जे “विधवांची घरे गिळंकृत करतात व ढोंगाने लांब लचक प्रार्थना करतात” असे म्हणून त्यांच्यावर टिकास्त्र झोडले. (लूक २०:४६–४७) इतराच्या वतीने केलेली प्रार्थना स्पष्टपणे त्यांची परिस्थीती किंवा गरज व प्रसंगास अनुरुप एवढी दीर्घ असावी. आम्ही लांबलचक, वाहवत जाणारी व अनावश्यक मुद्दे सामावून असणारी प्रार्थना करण्याची गरज नाही. जेवणा साठी केलेली आभार प्रदर्शनाची प्रार्थनाफारच संक्षिप्त असू शकेल. ख्रिश्चन सभाच्या सुरवातीची प्रार्थना ही लांब असण्याची गरज नाही. दिवसाच्या समाप्तीस कुटुंबाचे, संमेलनाच्या समाप्तीस, प्रार्थनेत नेतृत्व करणाऱ्यास कदाचीत प्रसंगास उचित असणारे पुष्कळ मुद्दे घ्यावेसे वाटतील.
इतरांच्या वतीने केलेली प्रार्थना नम्र हृदयाने व योग्य समतोल व विचारीवृती ठेवून केली तर चांगला प्रभाव करील. ते ऐकणाऱ्यांची आत्मिक वाढ व यहोवा सोबतचे त्यांचे नातेसंबध दृढ करील. परिणामतः दाविदाच्या त्या हृदय द्रावक प्रार्थनेत सहभागी होते त्यांना, कराराचा कोश यरूशलेमेत आणला त्यावेळी ‘“आमेन” म्हणून यहोवाचे स्तवन कराची’ जी चालना दिली गेली तशीच चालना आमची प्रार्थना ऐकणाऱ्यांना मिळेल.—१ इतिहास १६:३६.
[२८ पानांवरील संक्षिप्त आशय]
जाहीर प्रार्थना ऐकणाऱ्यांनी समाप्तीस ऐकू येईल असे आमेन म्हणने उचित आहे का?
होय, त्यांची तशी इच्छा असली तर त्यांना तसे म्हणावे वाटेल. प्रार्थना ऐकणाऱ्यांनी “आमेन” म्हटल्याचे प्रेषित पौलाने म्हटले पण त्यांनी ते ऐकू येइल असे किंवा मनातल्या मनात म्हटले हे स्पष्टपणे सांगितले नाही. (१ करिंथकर १४:१६) तथापि मोशेच्या नियमानुसार असे प्रसंग होते की ज्यावेळी इस्राएलांना मोठ्याने “आमेन!” म्हणण्याचे बजावले होते. (अनुवाद २७:१४–२६) यास्तव, प्रार्थना करणारा त्याच्या प्रार्थनेचा शेवट “आमेन” म्हणून प्रदर्शित करतो तेव्हा ऐकणाऱ्यांनी मग ते मनातल्या मनात किंवा हळू आवाजात “आमेन” म्हणने उचित ठरेल. पालकांनी त्यांच्या लेकरांना शांतपणे “आमेन” म्हणून योग्य आदर प्रदर्शित करण्यास शिकविले पाहिजे.
[२९ पानांवरील संक्षिप्त आशय]
मंडळीच्या प्रार्थने दरम्यान बाळ रडते, दूरध्वनीची घंटा वाजते किंवा इतर कांही गोष्टींमुळे शांतता भंग पावते तेंव्हा ते ऐकणाऱ्या कोणी त्या परिस्थीतीची हाताळणी करणे अवमाण दाखविणारे आहे का?
नाही, त्याच्या ऐवजात ते एखाद्या उपाध्य सेवकाने शांतपणे मंडळीतून निघून ती स्थिती सुव्यवस्थीतपणे हाताळणे हे प्रेमाचे द्योतक ठरेल. (१ करिंथकर १४:४०) अशाप्रकारे, मंडळीतील इतरांना कोणत्याही विचलीतपणा विना प्रार्थना चालू ठेवणे शक्य होइल. जे कोणी अशा परिस्थीतीची हाताळणी करतील त्यांनी नंतर ते काम झाले म्हणजे परत प्रार्थनेस यावे.