ख्रिस्ती जीवन
बेथेल कुटुंबातल्या भाऊबहिणींना सांत्वन देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था
प्रत्येकाला कधी ना कधी समस्यांचा सामना करावा लागतो. आणि त्या वेळी प्रत्येकाला सांत्वनाची आणि मदतीची गरज असते. इतकंच नाही, तर आध्यात्मिक रीत्या मजबूत असलेले किंवा संघटनेत मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे भाऊबहीणसुद्धा निराश होऊ शकतात. (ईयो ३:१-३; स्तो ३४:१९) म्हणूनच बेथेल कुटुंबातल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी मेंढपाळ भेटीची व्यवस्था केली जाते. मग या तरतुदीतून तुम्हाला काय शिकायला मिळतं?
“देवावर भरवसा ठेवा,” हा व्हिडिओ पाहा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
बेथेल कुटुंबातल्या भाऊबहिणींना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?
त्यांना सांत्वन देण्यासाठी कोणत्या चार गोष्टी केल्या जातात?
सांत्वन देणाऱ्या भावांना यामुळे कशा प्रकारे फायदा झाला आहे?