ख्रिस्ती जीवन
“आपल्या हृदयाचं रक्षण कर”
शलमोनने देवाच्या प्रेरणेने असं लिहिलं: “ज्या गोष्टींचं तू रक्षण करतोस, त्या सर्वांपेक्षा आपल्या हृदयाचं रक्षण कर.” (नीत ४:२३) पण दुःखाची गोष्ट अशी, की देवाचे लोक म्हणजे इस्राएली लोक “पूर्ण मनाने” त्याच्या मार्गांवर चालले नाहीत. (२इत ६:१४) इतकंच काय, तर शलमोन राजासुद्धा आपल्या मूर्तिपूजक बायकांमुळे इतर देवांची उपासना करू लागला. (१रा ११:४) तुम्ही तुमच्या हृदयाचं रक्षण कसं करू शकता? जानेवारी, २०१९ च्या टेहळणी बुरूज अंकातल्या पान १४-१९ वर असलेल्या एका अभ्यास लेखाचा हाच विषय होता.
टेहळणी बुरूज अंकातले धडे—आपल्या हृदयाचं रक्षण करा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
खाली दिलेल्या भाऊबहिणींचा विश्वास कोणत्या गोष्टींमुळे कमजोर होऊ शकला असता? पण या अभ्यास लेखामुळे त्यांना कशा प्रकारे आपल्या हृदयाचं रक्षण करता आलं?
ब्रेन्ट आणि लोरेन
उमजा
हॅप्पी लॅयू
या अभ्यास लेखामुळे तुम्हाला कशी मदत झाली?