ख्रिस्ती जीवन
सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—JW.ORG वेबसाईटचा वापर करा
हे का महत्त्वाचं: आपल्या शिकवण्याच्या साधनांमधल्या प्रत्येक साहित्यांमध्ये jw.org चा उल्लेख आहे. खरं पाहिलं तर आपल्या संपर्क कार्डचा आणि जीवनातील महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे कोण देऊ शकेल? या पत्रिकेचा मुख्य उद्देश लोकांना आपली वेबसाईट पाहण्यासाठी आर्जवणं हा आहे. शिकवण्याच्या साधनांतून एखादं साहित्य देण्यासाठी त्याची इलेक्ट्रॉनिक प्रत jw.org वरून तुम्ही ई-मेल करू शकता किंवा त्याची लिंक पाठवू शकता. हे खासकरून दुसरी भाषा बोलणाऱ्या लोकांना साक्ष देताना फायद्याचं ठरू शकतं. तसंच, लोक आपल्याला कदाचित असे प्रश्नं विचारतील ज्यांची उत्तरं आपल्या शिकवण्याच्या साधनांमधल्या साहित्यांमध्ये नसतील पण इतर साहित्यांमध्ये असतील. जर आपण आपली वेबसाईट नीट वापरायला शिकलो तर आपल्याला आणखी प्रभावीपणे सेवाकार्य करता येईल.
हे कसं करता येईल:
“शास्त्र से जानिए” टॅब वापरा. समजा तुम्ही अशा पालकाला प्रचार करत आहात ज्याला मुलांच्या संगोपनाबद्दल अधिक माहिती हवी आहे. यासाठी तुम्ही jw.org/hi वर शास्त्र से जानिए > शादीशुदा ज़िंदगी और परिवार या पेजवर जाऊ शकता.
“प्रकाशने” टॅब वापरा. समजा तुम्ही शाळेत अनौपचारिक साक्षकार्य करत आहात आणि तुम्हाला वर्गसोबत्याला तरुणांच्या मनात येणाऱ्या १० प्रश्नांची उत्तरं हे माहितीपत्रक द्यायचं आहे. यासाठी तुम्ही प्रकाशने > पुस्तके आणि माहितीपत्रके या पेजवर जाऊ शकता.
“आमच्याविषयी” टॅब वापरा. समजा तुमच्यासोबत काम करणाऱ्याला तुम्ही प्रचार केला आणि त्याला आपल्या विश्वासांबद्दल थोडक्यात माहिती हवी असेल, तर तुम्ही आमच्याविषयी > सहसा विचारले जाणारे प्रश्न या पेजवर जाऊ शकता.
JW.ORG वेबसाईटचा वापर करणं हा व्हिडिओ पाहा आणि नंतर तुम्ही खाली दिलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना मदत करण्यासाठी वेबसाईटवर कुठलं पेज दाखवाल ते लिहा:
नास्तिक
जीवनात दुःखद घटना घडली आहे अशी एक व्यक्ती
एक अक्रियाशील बांधव किंवा बहीण
जगभरात चाललेल्या आपल्या कामासाठी आर्थिक मदत कुठून मिळते असा प्रश्न पुनर्भेटीदरम्यान विचारणारी व्यक्ती
दुसऱ्या देशातली एक व्यक्ती जिला तिच्या देशात साक्षीदारांच्या सभेला जायचं आहे