वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 सप्टेंबर पृ. ३
  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • अभ्यास करण्यासाठी एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • तुम्हाला मदत हवी आहे का?
    सावध राहा!—२०२०
  • वेबसाईट वापरण्याबद्दल एक टीप
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • आपली अधिकृत वेबसाईट —आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 सप्टेंबर पृ. ३

ख्रिस्ती जीवन

JW.ORG वर दररोजच्या जीवनासाठी उपयोगी असलेलं मार्गदर्शन शोधा

आजच्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी लागणारं मार्गदर्शन आपल्याला देवाच्या वचनात सापडतं. (२ती ३:१, १६, १७) पण कधीकधी एखाद्या विशिष्ट परिस्थितीत बायबलची नेमकी कोणती तत्त्वं लागू होतात हे आपल्याला लगेच कळत नाही. कदाचित तुम्ही मुलांना कसं वाढवावं याबद्दल मार्गदर्शन शोधत असाल. किंवा तुम्ही तरुण असाल आणि ख्रिस्ती तरुणांना येणाऱ्‍या समस्यांचा सामना कसा करावा यावरची माहिती शोधत असाल. किंवा, आपल्या जोडीदाराला गमवल्यामुळे तुम्ही दुःखी असाल. या आणि यांसारख्या बऱ्‍याच परिस्थितींत लागू होणारी विशिष्ट बायबल तत्त्वं jw.org वर दिलेल्या साहित्यात सापडतील.—नीत २:३-६.

jw.org ही वेबसाईट टॅबवर उघडली आहे. गोलात बायबलच्या शिकवणी हा टॅब दाखवला आहे.

सगळ्यात आधी jw.org च्या होम पेजवर बायबलच्या शिकवणी या टॅबवर क्लिक करा. (चित्र १ पाहा.) मग लिस्टमधून तुम्हाला आवडणारा विषय निवडा. किंवा लायब्ररी > लेखमालिका सिलेक्ट करा आणि मग तुमच्या आवडीचा विषय निवडा. (चित्र २ पाहा.) JW लायब्ररीa ॲपवरसुद्धा तुम्हाला हे विषय पाहायला मिळतील. jw.org वर किंवा JW लायब्ररी ॲपवर तुम्ही वेगवेगळ्या विषयांबद्दल कोणती माहिती उपलब्ध आहे ते पाहू शकता. आणखी एक पर्याय म्हणजे, jw.org वर असलेल्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या आवडीचा विषय टाकून तुम्ही माहिती शोधू शकता.

jw.org ही वेबसाईट टॅबवर उघडली आहे. गोलात लायब्ररी टॅब आणि लेखमालिका विभाग दाखवलाय.

सर्च बॉक्समध्ये खाली दिलेले विषय टाका आणि तिथे दाखवलेल्या लेखांपैकी तुम्हाला कोणते वाचायला आवडतील ते लिहा.

  • मुलांचं संगोपन

  • तरुणांमध्ये नैराश्‍य

  • जोडीदाराचा मृत्यू

a काही लेखमालिकांमधले सगळे लेख सध्या फक्‍त jw.org वर उपलब्ध आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा