वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 एप्रिल पृ. ७
  • खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांना सल्ला देताना तुम्हाला ईयोबच्या पुस्तकातून मदत होऊ शकते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • समस्या कशा हाताळाव्यात याविषयीचा धडा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • नियमन मंडळाकडून पत्र
    यहोवाकडं परत या
  • ईयोबाचे प्रतिफळ —आशेचा एक स्रोत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 एप्रिल पृ. ७

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | ईयोब ३३-३७

खरा मित्र उत्तेजन मिळेल असा सल्ला देतो

छापील आवृत्ती

अलीहूचा सल्ला आणि ईयोबाबरोबरचे त्याचे वागणे अलीफज, बिल्दद आणि सोफर या तिघांपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्याने दाखवून दिलं, की तो ईयोबाचा खरा मित्र आहे. त्याचे बोलणे प्रभावी होते. आपण सर्वांनी खरंच त्याचे अनुकरण केले पाहिजे.

अलीहू ईयोबाशी बोलत असताना, अलीफज, बिल्दद आणि सोफर त्यांच्याकडे पाहत आहेत

प्रभावीपणे सल्ला देणाऱ्‍याचे गुण

अलीहूने उत्तम उदाहरण मांडलं

३२:४-७, ११, १२; ३३:१

  • सहनशील

  • लक्ष देऊन ऐकणारा

  • आदरानं बोलणारा

  • वयानं मोठं असलेल्या इतरांचं बोलणं संपेपर्यंत अलीहू थांबून राहिला

  • सल्ला देण्याआधी, त्याने इतरांचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. यामुळे त्याला, चर्चा होत असलेला विषय नीट समजला

  • सल्ला देताना त्याने ईयोबाचे नाव घेतले आणि एका मित्राप्रमाणे त्याच्याशी बोलला

३३:६, ७, ३२

  • नम्र

  • प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे त्याच्याकडे निःसंकोचपणे कोणीही जाऊ शकतं

  • इतरांचं दुःख समजून घेणारा

  • अलीहू नम्र व दयाळू होता. आपणही अपरिपूर्ण आहोत, हे त्याने कबूल केले

  • ईयोबाला सहन करावं लागत असलेलं दुःख त्यालाही समजलं

३३:२४, २५; ३५:२, ५

  • संतुलित दृष्टिकोन बाळगणारा

  • दयाळू

  • यहोवाचा दृष्टिकोन बाळगणारा

  • अलीहूने अतिशय दयाळूपणे ईयोबाच्या लक्षात आणून दिलं, की त्याचा दृष्टिकोन संतुलित नव्हता

  • स्वतःच्या धार्मिकतेचाच विचार करणं महत्त्वाचं नाही, तर निर्माणकर्त्यावर लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे, ही गोष्ट समजण्यास त्याने ईयोबाला मदत केली

  • अलीहूच्या उचित सल्ल्यामुळे, यहोवाकडून आणखी बोध घेण्यास ईयोब तयार झाला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा