ख्रिस्ती जीवन
प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना
इतर गोष्टींमध्ये जसं आपण देवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल प्रेम दाखवतो, तसंच अधिवेशनाच्या वेळीसुद्धा प्रेम दाखवलं पाहिजे. (मत्त २२:३७-३९) पहिले करिंथकर १३:४-८ या वचनांमध्ये आपण हे प्रेम कार्यांतून कसं दाखवू शकतो ते सांगितलं आहे. तिथं म्हटलं आहे: “प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे; . . . ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, . . . प्रीती कधी अंतर देत नाही.” प्रांतीय अधिवेशनासाठी सूचना हा व्हिडिओ पाहत असताना, आपण अधिवेशनादरम्यान इतरांबद्दल असलेलं प्रेम कार्यांतून कसं दाखवू शकतो त्यावर विचार करा.
आपल्या कार्यांतून प्रेम कसं दाखवाल?
जागा राखून ठेवताना
संगीत कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी
लॉजमध्ये राहत असताना
स्वयंसेवक म्हणून काम करण्याद्वारे