ऑगस्ट १० च्या सप्ताहाचा आराखडा
१० ऑगस्ट पासून सुरू होणारा सप्ताह
गीत १४ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ६५, ६६ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ राजे २१-२२ (८ मि.)
क्र. १: १ राजे २२:१३-२३ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: तुम्ही देवाबरोबर मैत्री कशी करू शकता?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. २८ परि. १-४ (५ मि.)
क्र. ३: दलीला—विषय: पैशावरचे प्रेम आपल्याला विश्वासघात करण्यास प्रवृत्त करेल—शास्ते १६:१-२१ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: मी आणि माझं घराणं यहोवाची सेवा करू.—यहो. २४:१५.
१० मि: मी आणि माझं घराणं यहोवाची सेवा करू. महिन्याच्या मुख्य विषयावर आधारित भाषण. अनुवाद ६:६, ७; यहोशवा २४:१५; आणि नीतिसूत्रे २२:६ ही वचनं वाचा आणि त्यांतून आपण काय शिकतो ते सांगा. यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत पतीनं व पित्यानं पुढाकार घेतला पाहिजे, यावर जोर द्या. कुटुंबांना मदत करण्यासाठी संस्थेनं आपल्याला अनेक साधनं दिली आहेत, हेही सांगा. ऑगस्ट महिन्याच्या सेवा सभेतील काही भागांची थोडक्यात उजळणी करून ते महिन्याच्या विषयाशी कसे संबंधित आहेत ते सांगा.
२० मि: “सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—नवीन प्रचारकांना प्रशिक्षण द्या.” चर्चा. आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत करताना पालक या लेखातील तत्त्वांचं पालन कसं करू शकतात ते श्रोत्यांना विचारा. एक वडील आपल्या लहान मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर एका सादरतेची तयारी करत आहेत, असं प्रात्यक्षिक दाखवा.
गीत ४५ आणि प्रार्थना