ख्रिस्ती जीवन
यहोवाची सेवा करत राहण्यासाठी नवीन प्रचारकांना प्रशिक्षण द्या
अनुभवांवरून हे दिसून आलं आहे की ज्या प्रचारकांना सुरुवातीपासून सेवाकार्यात नियमित रीत्या आणि आवेशाने भाग घेण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, ते सहसा प्रभावी प्रचारक बनतात. (नीत २२:६; फिलि ३:१६) सेवाकार्याचा चांगला पाया तयार करण्यासाठी विद्यार्थ्याला कशी मदत करता येईल, याची काही व्यावहारिक पावलं पुढे देण्यात आली आहेत:
तुमच्या विद्यार्थ्याला प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात येतं तेव्हा लगेचच त्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात करा. (आपली राज्य सेवा ८/१५ पृ. १, २) प्रत्येक आठवडी सेवाकार्यात सहभाग घेणं किती महत्त्वाचं आहे हे त्याला सांगा. हा त्याच्या नित्यक्रमाचा एक भागच असला पाहिजे हे त्याच्या मनात बिंबवा. (फिलि १:१०) प्रचाराच्या क्षेत्राबद्दल नेहमी सकारात्मक बोला. (फिलि ४:८) विद्यार्थ्याला गट पर्यवेक्षकासोबत आणि इतर प्रचारकांसोबत सेवा करण्याचं प्रोत्साहन द्या. इतर अनुभवी प्रचारकांसोबत काम केल्यामुळे विद्यार्थ्याला खूप फायदा होऊ शकतो.—नीत १:५; आपली राज्य सेवा १०/१२ पृ. ६ परि. ३
विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतरही त्याला प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याचं थांबवू नका. खासकरून देवाचे प्रेम या पुस्तकातून त्याचा अभ्यास चालू असताना, असं करणं जास्त गरजेचं आहे.—आपली राज्य सेवा १२/१३ पृ. ७
नवीन प्रचारकांसोबत प्रचार करताना आपली प्रस्तावना अगदी साधी ठेवा. नवीन प्रचारकाचं घरमालकाशी बोलून झाल्यानंतर, प्रचारकाची मनापासून प्रशंसा करा. प्रचारकाला आणखी प्रभावीपणे बोलण्यासाठी मदत करतील, असे काही सल्ले त्याला द्या.—आपली राज्य सेवा ५/१० पृ. ७