ट्रॉली किंवा टेबल वापरून साक्षकार्य कसं करता येईल?
नम्र मनाच्या लोकांना सत्याकडं आकर्षित करण्यासाठी ट्रॉलीचा किंवा टेबलचा उपयोग करून साक्षकार्य करण्याची ही पद्धत प्रभावी ठरत आहे. (योहा. ६:४४) त्यामुळं, जिथं लोक जास्त ये-जा करतात अशा ठिकाणी सार्वजनिक साक्षकार्य करण्याचं उत्तेजन मंडळीच्या वडिलांना दिलं जात आहे. ट्रॉली किंवा टेबल आपण कायमस्वरूपी एकाच जागी मांडत नसल्यामुळं अधिकाऱ्यांना सहसा परवानगी मागण्याची गरज पडत नाही. पण, जर तसा नियम असेल तर परवानगी मागितलेली बरी. यात कोण सहभागी होऊ शकतात? असे प्रचारक जे परिस्थितीनुसार समजूतदारपणा दाखवतात, ज्यांचं बोलणं-वागणं सभ्य आहे आणि ज्यांच्यात संवाद साधण्याचं कौशल्य आहे ते यात सहभागी होऊ शकतात. हे कार्य जास्त प्रभावशाली करता यावं म्हणून काय करावं आणि काय करू नये याबद्दल पुढं काही गोष्टी दिल्या आहेत.