एप्रिल २० च्या सप्ताहाचा आराखडा
२० एप्रिल पासून सुरू होणारा सप्ताह
गीत २६ आणि प्रार्थना
मंडळीचा बायबल अभ्यास:
बायबल कथा ४७ (३० मि.)
ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: १ शमुवेल २३-२५ (८ मि.)
क्र. १: १ शमुवेल २३:१३-२३ (३ मि. किंवा कमी)
क्र. २: बायबलमध्ये भविष्याबद्दल काय सांगण्यात आले आहे?—देवाच्या वचनाची प्रस्तावना पृ. १६ परि. १-३ (५ मि.)
क्र. ३: बारूख—विषय: निःस्वार्थपणे यहोवाची सेवा करा—यिर्म ३२:९-१६; ३६:१-३२; ४३:४-७; ४५:१-५ (५ मि.)
सेवा सभा:
महिन्याचा मुख्य विषय: सुज्ञ लोकांप्रमाणं “वेळेचा सदुपयोग करा.”—इफिस. ५:१५, १६.
१५ मि: “ट्रॉली किंवा टेबल वापरून साक्षकार्य कसं करता येईल?” चर्चा. एक प्रात्यक्षिक दाखवा: दोन प्रचारक ट्रॉली किंवा टेबलाजवळ उभे आहेत. एक प्रचारक जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीकडं बघून फक्त स्मितहास्य करतो. दुसरा प्रचारक जवळून जाणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडं बघून स्मितहास्य करतो, ती व्यक्ती जवळ आल्यावर तिला प्रश्न विचारून संभाषण सुरू करतो. हीच पद्धत, निरनिराळ्या मार्गांनी साक्ष देतानाही कशी वापरली जाऊ शकते?
१५ मि: स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्या लोकांना पुन्हा भेटा. भाषण. स्मारकविधीची उपस्थिती आणि आलेले चांगले अनुभव सांगा. स्मारकविधीला उपस्थित राहिलेल्यांना पुन्हा भेटण्याचं आणि त्यांच्यासोबत बायबल अभ्यास सुरू करण्याचं सर्वांना उत्तेजन द्या. स्मारकविधीला आलेल्यांपैकी जे अधूनमधून सभांना येतात अशांसोबत बायबल काय शिकवते या पुस्तकातून अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करा. याचं एक प्रात्यक्षिक दाखवा.
गीत २८ आणि प्रार्थना