साक्षकार्य करण्याची उत्कृष्ट व नवीन पद्धत
१. ज्या मंडळ्यांकडे खूप वर्दळ असलेली क्षेत्रे आहेत त्यांना कोणते उत्तेजन देण्यात आले आहे?
१ लोकांची जास्त वर्दळ असलेल्या क्षेत्रांत टेबलावर किंवा ट्रॉलीवर साहित्ये मांडून सार्वजनिक साक्षकार्य करण्याची व्यवस्था करावी, असे मंडळ्यांना उत्तेजन देण्यात आले आहे. ट्रॉलीचा उपयोग केला जाणार असेल तर एकातरी प्रचारकाने ट्रॉलीजवळ उभे राहावे किंवा बसावे. पण, जर टेबलावर प्रकाशने मांडण्यात येणार असतील तर दोन प्रचारकांनी तेथे असावे. ट्रॉलीजवळ किंवा टेबलाजवळ असणाऱ्या प्रचारकांनी चेहऱ्यावर मैत्रीपूर्ण स्मितहास्य ठेवावे. त्यांच्याकडे बघून लोकांना जवळ यावेसे वाटले पाहिजे. ट्रॉलीवर किंवा टेबलावर ठेवलेली प्रकाशने पाहण्यासाठी कोणी जवळ आल्यास प्रचारक त्याच्याशी संभाषण सुरू करू शकतो. तो म्हणू शकतो: “या विषयावर तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल का?” एक किंवा दोन प्रचारक, जेथे हे बांधव ट्रॉलीजवळ किंवा टेबलाजवळ उभे आहेत त्यांच्याच आसपास राहून त्यांना काही मदत हवी आहे का याकडे लक्ष ठेवू शकतात व सोबतच अनौपचारिक साक्षकार्यही करू शकतात.
२. प्रकाशनांचे प्रदर्शन मांडून साक्षकार्य करण्याचा काय फायदा होतो याचा एक अनुभव सांगा.
२ या नवीन पद्धतीमुळे अनेक बायबल अभ्यास सुरू झाले आहेत. एका कॉलेज विद्यार्थीनीने यहोवाच्या साक्षीदारांवर एक लेख लिहिण्याची निवड केली खरी, पण तिला राज्य सभागृह सापडत नव्हते. दुसऱ्या आठवडी तिला तिच्या कॉलेजच्या आवारातच टेबलावर प्रकाशनांचे प्रदर्शन मांडलेले साक्षीदार दिसले. तिच्याबरोबर बायबल अभ्यास सुरू करण्यात आला आणि आता ती बाप्तिस्मा घेतलेली प्रचारक आहे व स्वतः या प्रकारच्या साक्षकार्यात भाग घेत आहे.
३. काही प्रचारकांना या नवीन पद्धतीच्या साक्षकार्याबद्दल काय वाटते?
३ या नवीन पद्धतीच्या साक्षकार्याचा आनंद लुटणाऱ्या एका बहिणीने म्हटले: “काही लोक प्रदर्शनाजवळ नवीन मासिकं घेण्यासाठी येतात. तर काहींनी यहोवाच्या साक्षीदारांबद्दल पूर्वी कधी ऐकलेलं नसतं. खरंतर, या नवीन पद्धतीमुळं आपण कितीतरी लोकांना साक्ष देऊ शकतो.” आणखी एका बहिणीने म्हटले: “साक्षकार्य करण्याची ही उत्कृष्ट व नवीन पद्धत आहे. कारण, लोक तुमच्याकडे येतात. म्हणजे, लोकांना आवड नसली तरी ते, टेबलावर काय ठेवलंय हे पाहायला तरी जवळ येतात.”
४. दर आठवडी त्याच वेळी व त्याच ठिकाणी प्रदर्शन मांडण्याचे कोणते फायदे आहेत?
४ दर आठवडी त्याच ठिकाणी, त्याच दिवशी आणि त्याच वेळी प्रदर्शन मांडल्यास फायदा होऊ शकतो. लोकांना ही प्रदर्शने सारखी-सारखी दिसतील आणि एक दिवशी ते जवळ येऊन प्रश्न विचारतील किंवा प्रकाशने घेतील. तुमच्या मंडळीने या प्रकारच्या साक्षकार्याचे आयोजन केले आहे का? “देवाच्या राज्याची घोषणा” करण्यासाठी साक्षकार्याची ही पद्धत खरेच फलदायी व समाधानकारक आहे.—लूक ९:६०.