पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यावर भर द्या
मे २०११ पासून प्रचारकांना प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्याचा प्रयत्न करण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. आणि त्यासाठीच, टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या सार्वजनिक आवृत्तीत, “बायबल प्रश्नांची उत्तरे,” हे सदर सुरू करण्यात आले आहे. तेव्हा दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी होणाऱ्या क्षेत्र सेवा सभेत, बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी या सदराचा उपयोग कसा केला जाऊ शकतो यावर भर द्या आणि त्यावर एक प्रात्यक्षिकही दाखवा.
दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी, प्रत्येक गटाने आपापली क्षेत्र सेवा सभा घ्यावी किंवा क्षेत्र सेवा सभेसाठी सर्व गटांनी एकत्र मिळून राज्य सभागृहात भेटावे हे मंडळीतील वडील ठरवू शकतात. पण, अनेक मंडळ्या जर एकच राज्य सभागृह वापरत असतील तर क्षेत्र सेवेची एकत्र सभा घेण्यासाठी कोणत्याही मंडळीने बायबल अभ्यास सुरू करण्याचा हा खास दिवस बदलू नये.