ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
२६ ऑगस्ट २०१३ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची उजळणी होईल. प्रत्येक मुद्द्यावर कधी चर्चा करण्यात आली त्याची तारीख देण्यात आली आहे जेणेकरून प्रत्येक आठवडी प्रशालेची तयारी करताना संशोधन करता येईल.
१. जी स्तुती व जो गौरव खरेतर देवाला मिळाला पाहिजे तो हेरोद राजाने स्वीकारला, त्यावरून आपण कोणता महत्त्वपूर्ण धडा शिकू शकतो? (प्रे. कृत्ये १२:२१-२३) [जुलै १, टेहळणी बुरूज ०८ ५/१५ पृ. ३२ परि. ७]
२. तीमथ्याच्या उदाहरणाचे परीक्षण व त्याचे अनुकरण केल्यामुळे ख्रिस्ती युवकांना काय फायदा होऊ शकतो? (प्रे. कृत्ये १६:१, २) [जुलै ८, टेहळणी बुरूज ०८ ५/१५ पृ. ३२ परि. १०]
३. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी अपुल्लो याला इफिसमधील सभास्थानात “निर्भीडपणे” बोलताना ऐकले तेव्हा त्यांनी त्याला प्रेमळपणे कसे साहाय्य केले? (प्रे. कृत्ये १८:२४-२६) [जुलै १५, टेहळणी बुरूज १० ६/१५ पृ. ११ परि. ४]
४. यहोवाचे साक्षीदार शास्त्रवचनातील कोणत्या आधारावर प्रचार करण्याच्या आपल्या हक्कासाठी देशाच्या न्यायालयांचा उपयोग करू शकतात? (प्रे. कृत्ये २५:१०-१२) [जुलै २२, टेहळणी बुरूज ०३ १०/१ पृ. १५ वरील चौकट]
५. रोममध्ये कैदेत असतानासुद्धा पौल कशा प्रकारे साक्ष देत राहिला आणि आज यहोवाचे सेवक त्याच्या उदाहरणाचे अनुकरण कसे करतात? (प्रे. कृत्ये २८:१७, २३, ३०, ३१) [जुलै २९, टेहळणी बुरूज १२ १/१५ पृ. १२, १३ परि. १८, २१]
६. आपण सुवार्ता का सांगतो? (रोम. १:१४, १५) [ऑग. ५, टेहळणी बुरूज ०८ ६/१५ पृ. ३० परि. २]
७. इ.स. ३३ मध्ये ख्रिस्त येशूने दिलेल्या खंडणीमुळे “पूर्वी झालेल्या पापांची” क्षमा मिळणे कसे शक्य झाले? (रोम. ३:२४, २५) [ऑग. ५, टेहळणी बुरूज ०८ ६/१५ पृ. २९ परि. ६]
८. आपण जेव्हा खूप बिकट परिस्थितीचा सामना करतो व काय प्रार्थना करावी हे आपल्याला कळत नाही तेव्हा यहोवाच्या कोणत्या प्रेमळ तरतुदीचा आपल्याला फायदा होतो? (रोम. ८:२६, २७) [ऑग. १२, टेहळणी बुरूज ०८ ६/१५ पृ. ३० परि. १०]
९. “आतिथ्य करण्यात तत्पर असा” याचा काय अर्थ होतो? (रोम. १२:१३) [ऑग. १९, टेहळणी बुरूज ०९ १०/१५ पृ. ५-६ परि. १२-१३]
१०. प्रेषित पौलाने सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ती कोणत्या अर्थाने “प्रभु येशू ख्रिस्ताला परिधान” करतात? (रोम. १३:१४) [ऑग. २६, टेहळणी बुरूज ०५ १/१ पृ. ११-१२ परि. २०-२२]