टेहळणी बुरूज नियतकालिकात एक नवीन सदर
दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण टेहळणी बुरूज नियतकालिकातील “देवाच्या वचनातून शिका” हे लेख वापरत आलो आहोत. पण जानेवारी २०१३ पासून याऐवजी “बायबल प्रश्नांची उत्तरे” हे नवीन सदर सार्वजनिक आवृत्तीच्या शेवटल्या पानावर पाहायला मिळेल. पूर्वी आपण “देवाच्या वचनातून शिका” हे सदर ज्या प्रकारे क्षेत्र सेवेत वापरायचो त्याच प्रकारे “बायबल प्रश्नांची उत्तरे” हे सदर आपण वापरू शकतो. (आमची राज्य सेवा ०६/११ पृ. २) महिन्याच्या पहिल्या शनिवारी वापरण्यासाठी पूर्वीप्रमाणेच आमची राज्य सेवा यात नमुना सादरीकरण दिले जाईल.