वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/१२ पृ. २
  • माघार घेऊ नका —कमीपणाच्या भावनांवर मात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • माघार घेऊ नका —कमीपणाच्या भावनांवर मात
  • आमची राज्य सेवा—२०१२
  • मिळती जुळती माहिती
  • लोकांना शिकवा आणि शिष्य बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्ही शिक्षक होऊ शकता!
    आमची राज्य सेवा—२००८
  • शिष्य बनवण्याच्या कार्यातून आनंद मिळवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • बायबल अभ्यास चालवण्याचे ध्येय ठेवा
    आमची राज्य सेवा—२००७
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१२
km ११/१२ पृ. २

माघार घेऊ नका —कमीपणाच्या भावनांवर मात

१. बायबल अभ्यास घेण्यास काही लोक का कचरतात?

१ बायबल अभ्यास चालवण्याचा आत्मविश्‍वास नसल्यामुळे तुम्ही बायबल अभ्यास घेण्यास कचरता का? प्राचीन काळातील देवाचे काही विश्‍वासू सेवक जसे की, मोशे आणि यिर्मया यांना, दिलेल्या जबाबदारीसाठी आपण योग्य नाही असे वाटले होते. (निर्ग. ३:१०, ११; ४:१०; यिर्म. १:४-६) त्यामुळे आपल्याही मनात अशा भावना येणे साहजिक आहे. त्यांवर आपण मात कशी करू शकतो?

२. बायबल अभ्यास इतर जण घेतील आणि आपण फक्‍त घरोघरचे सेवाकार्य केले तरी चालेल असा विचार आपण का करू नये?

२ यहोवा आपल्याकडून कधीही आपल्या क्षमतेपलीकडे अपेक्षा करत नाही हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. (स्तो. १०३:१४) त्यामुळे, लोकांना “शिष्य” बनवणे आणि त्यांना शिकवणे हे कार्य आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. (मत्त. २८:१९, २०) आपल्यात जे जास्त अनुभवी किंवा जास्त शिकलेले आहेत त्यांनाच यहोवाने हा विशेषाधिकार दिला आहे असे नाही. (१ करिंथ. १:२६, २७) म्हणून, आपण फक्‍त घरोघरचे सेवाकार्य करायचे आणि बायबल अभ्यास घेण्याचे काम इतर जण करतील असा विचार करू नये.

३. बायबल अभ्यास घेण्यासाठी यहोवाने आपल्याला पात्र कसे बनवले आहे?

३ यहोवा आपल्याला पात्र बनवतो: शिष्य बनवण्याची पात्रता खुद्द यहोवाकडून आपल्याला मिळाली आहे. (२ करिंथ. ३:५) जगातील सर्वात उच्च शिक्षित लोकांनाही माहीत नाहीत अशी बायबलची सत्ये त्याने त्याच्या संघटनेद्वारे आपल्याला शिकवली आहेत. (१ करिंथ. २:७, ८) यहोवाने महान शिक्षक येशू याच्या शिकवण पद्धती आपल्यासाठी बायबलमध्ये नमूद करून ठेवल्या आहेत जेणेकरून आपण त्याचे अनुकरण करू शकू. त्याचबरोबर तो आपल्याला मंडळीद्वारे नियमित रीत्या प्रशिक्षणही देतो. याशिवाय, यहोवाने आपल्याला असेच सोडून दिलेले नाही तर बायबल अभ्यास घेण्यासाठी बायबल काय शिकवते यांसारखी अनेक साहित्येही पुरवली आहेत. यांत बायबलचे सत्य तर्कशुद्ध आणि सहजासहजी समजेल अशा पद्धतीने मांडले आहे. त्यामुळे बायबल अभ्यास घेणे आपण विचार करतो तेवढे कठीण वाटणार नाही.

४. यहोवा आपल्याला मदत करू शकतो याची खातरी आपण का बाळगू शकतो?

४ यहोवाच्या मदतीने मोशे आणि यिर्मया आपापली जबाबदारी पूर्ण करू शकले. (निर्ग. ४:११, १२; यिर्म. १:७, ८) आपणही यहोवाकडून मदत मागू शकतो, कारण आपण जेव्हा इतरांचा बायबल अभ्यास घेत असतो तेव्हा आपण त्यांना यहोवाबद्दलचे सत्य सांगत असतो. आणि हे यहोवाला आवडते. (१ योहा. ३:२२) म्हणूनच, सेवाकार्यातील सर्वात आनंददायी व फलदायी कार्य करण्याचे अर्थात बायबल अभ्यास घेण्याचे ध्येय ठेवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा