वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०७ पृ. १
  • बायबल अभ्यास चालवण्याचे ध्येय ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • बायबल अभ्यास चालवण्याचे ध्येय ठेवा
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही तुमची आध्यात्मिक ध्येयं पूर्ण करू शकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • लोकांना शिकवा आणि शिष्य बनवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • तुम्ही पवित्र शास्त्र अभ्यास चालविण्याची इच्छा का धरली पाहिजे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • गृह पवित्र शास्त्र अभ्यास चालू करणे
    आमची राज्य सेवा—१९९३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km १२/०७ पृ. १

बायबल अभ्यास चालवण्याचे ध्येय ठेवा

१ “आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पांढरी होऊन चुकली आहेत.” (योहा. ४:३५) येशू ख्रिस्ताचे हे शब्द, ख्रिस्ती सेवकांसमोर असलेल्या परिस्थितीला अगदी योग्यरीत्या लागू होतात.

२ यहोवाचे मार्ग शिकून घेण्यास उत्सुक असलेले प्रामाणिक मनाचे लोक अजूनही आपल्याला भेटतात. दरवर्षी बाप्तिस्मा घेणाऱ्‍या नव्या शिष्यांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते. तुम्हाला जर खरोखरच बायबल अभ्यास चालू करण्याची इच्छा असेल तर तुम्ही काय करू शकता?

३ ध्येय ठेवा: सर्वात आधी एक नियमित बायबल अभ्यास सुरू करून तो चालवण्याचे ध्येय ठेवा. क्षेत्र सेवेत भाग घेत असताना हे ध्येय नजरेसमोर राहू द्या. आपल्याला मिळालेल्या ख्रिस्ती कामगिरीत, प्रचार करण्यासोबत शिकवणे देखील गोवलेले असल्यामुळे, आपण सर्वांनी बायबल अभ्यास मिळवण्यासाठी सेवेतला आपला सहभाग वाढवला पाहिजे.—मत्त. २४:१४; २८:१९, २०.

४ लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे: राज्य प्रचारकांनी याबाबतीत कळकळीने प्रार्थना केली पाहिजे. कधीकधी लोक, देवाबद्दलचे व बायबलचे अचूक ज्ञान मिळावे म्हणून प्रार्थना करतात. अशा लोकांना शोधून त्यांना शिकवण्याकरता यहोवा आपला उपयोग करून घेतो, हा आशीर्वादच नाही का?—हाग्ग. २:७; प्रे. कृत्ये १०:१, २.

५ एका भगिनीने बायबल अभ्यास मिळावा म्हणून प्रार्थना केली आणि मग तिच्या कामाच्या ठिकाणी, तुम्हाला बायबलविषयी अधिक माहिती हवी आहे का? या पत्रिकेच्या काही प्रती आपल्या कार्यालयात इकडे-तिकडे ठेवून दिल्या. एका स्त्रीने एक पत्रिका उचलली, ती वाचून काढली आणि वाचल्यानंतर मागच्या पानावर असलेले कूपन भरत असतानाच आपली भगिनी तिच्याशी बोलली व तिच्याबरोबर एक बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.

६ बायबल अभ्यास सुरू करण्यात व ते संचलित करण्यात अनुभवी असलेले सहप्रचारक तुम्हाला, बायबल अभ्यास मिळवण्याचे ध्येय प्राप्त करण्यास मदत करू शकतात. निदान एक तरी बायबल अभ्यास मिळवण्याचा प्रार्थनापूर्वक प्रयत्न करा आणि मग हे ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला दिले जाणारे साहाय्य स्वीकारा. कदाचित तुम्हालाही, बायबल अभ्यास चालवण्यात असलेला आनंद अनुभवता येईल!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा