वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०८ पृ. ४
  • तुम्ही शिक्षक होऊ शकता!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही शिक्षक होऊ शकता!
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • इतरांना प्रशिक्षित करणं गरजेचं का आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • यहोवा आपल्याला या कामासाठी प्रशिक्षित करत आहे
    आमची राज्य सेवा—२०११
  • पूर्ण जिवाने क्षेत्र कार्य करा
    आमची राज्य सेवा—१९९१
  • वडिलांनो, प्रशिक्षण देण्यासाठी तुम्ही वेळ काढत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km ११/०८ पृ. ४

तुम्ही शिक्षक होऊ शकता!

१. प्रत्येक राज्य प्रचारकाचे कोणते विशेष लक्ष्य असले पाहिजे?

१ सेवेचा एक अतिशय महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे एखाद्या व्यक्‍तीला सत्य शिकवणे. ती व्यक्‍ती राज्य संदेशाला प्रतिसाद देत असल्याचे आपण पाहतो आणि विश्‍वाच्या सार्वभौमाजवळ येण्यास तिला मदत करतो तेव्हा तो आनंद आपण कधी विसरत नाही. (याको. ४:८) सत्य शिकण्याची तीव्र इच्छा असलेल्या व्यक्‍तीला शिकवणे आणि त्यानंतर त्या व्यक्‍तीला आपल्या व्यक्‍तिमत्त्वात, दृष्टिकोनात आणि वर्तनात लक्षणीय बदल करताना पाहणे, हे प्रत्येक राज्य प्रचारकाचे लक्ष्य असले पाहिजे.—मत्त. २८:१९, २०.

२. काही प्रचारक बायबल अभ्यास घेण्याकरता का कचरतात आणि यावर मात करण्यास कोणती गोष्ट त्यांना मदत करेल?

२ यहोवावर विसंबून राहा: गतकाळात, यहोवाचे विश्‍वासू सेवक, यहोवाने दिलेले काम आपण पूर्ण करू का याविषयी साशंक होते. यहोवावर विसंबून राहिल्याने मोशे, यिर्मया, आमोस आणि इतर साधारण लोक आपल्या मनातील शंकांवर किंवा आत्मविश्‍वासाच्या कमतरतेवर मात करू शकले आणि यहोवाने त्यांच्यावर सोपवलेले महत्त्वपूर्ण काम पूर्ण करू शकले. (निर्ग. ४:१०-१२; यिर्म. १:६, ७; आमो. ७:१४, १५) प्रेषित पौलाने देखील त्याला, ‘देवाकडून धैर्य’ मिळाल्याचे नंतर सांगितले. (१ थेस्सलनी. २:२) प्रगतीशील बायबल अभ्यास चालवण्याकरता यहोवाकडील मदत, बुद्धी आणि शक्‍ती मिळवण्यासाठी आपण सर्वांनी त्याच्यावर विसंबून राहिले पाहिजे.—यश. ४१:१०; १ करिंथ. १:२६, २७; १ पेत्र ४:११.

३, ४. देवाचे वचन इतरांना शिकवण्यास आपल्या मदतीकरता कोणते प्रशिक्षण उपलब्ध आहे?

३ प्रशिक्षण स्वीकारा: आपला महान शिक्षक, यहोवा देव बायबल आधारित शिक्षणाच्या नियमित कार्यक्रमाद्वारे आपल्याला प्रशिक्षण देतो जेणेकरून आपण इतरांना शिकवण्यासाठी पूर्णपणे सज्ज होतो. (यश. ५४:१३; २ तीम. ३:१६, १७) म्हणून, शास्त्रवचनाची समज वाढवण्याकरता तसेच इतरांना बायबलविषयीचे सत्य शिकवण्याची तुमची कसब सुधारण्याकरता मिळत असलेल्या संधीचा होईल तितका फायदा घेण्याद्वारे हे प्रशिक्षण स्वीकारा. ईश्‍वरशासित सेवा प्रशाला आणि सेवा सभेचा प्रामुख्याने हाच उद्देश असला तरीसुद्धा मंडळीच्या इतर सभा देखील देवाचे वचन इतरांना शिकवण्याचे प्रशिक्षण आपल्याला देतात.

४ शास्त्रवचनातील गहन सत्यसुद्धा सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करा. याविषयी सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकातील पृष्ठ २२७ वर असे सांगितले आहे: “तुमचा विषय इतरांना समजावून सांगण्याकरता आधी तो तुम्ही स्वतः स्पष्टपणे समजून घ्या.” सभांमध्ये टिपणी दिल्याने मुख्य मुद्दे लक्षात राहतात व नंतर त्यांचा वापर करण्यास मदत होते. म्हणून चांगली तयारी करा व असे केल्याने शिकवण्याच्या क्षमतेवरील तुमचा आत्मविश्‍वास वाढेल.

५. चांगले शिक्षक बनण्यासाठी मंडळीद्वारे आणखी कोणते प्रशिक्षण आपल्याला मिळते?

५ ख्रिस्ती सेवक शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घ्यायला सुरूवात करतात तेव्हापासूनच खरेतर ते एकमेकांपासून बरेच काही शिकतात. (लूक १०:१) बायबल अभ्यासाला शक्यतो अनुभवी प्रचारक तसेच पायनियर, वडील आणि प्रवासी पर्यवेक्षक यांना सोबत घेवून जा. शास्त्रवचनातील सत्य शिकवताना बायबल अभ्यासाच्या पुस्तकात दिलेल्या सोप्या दृष्टांताचा आणि शिकवणीच्या इतर पैलूंचा ते कसा वापर करतात हे पाहा. तुम्हीही एक चांगले शिक्षक कसे बनू शकता हे त्यांना विचारा. (नीति. १:५; २७:१७) बंधू-बहिणींकडून मिळत असलेले हे प्रशिक्षण खरे पाहता देवाकडूनच मिळत असल्यामुळे त्याची कदर करा.—२ करिंथ. ३:५.

६. देवाच्या वचनाचे शिक्षक बनण्याकरता, प्रामुख्याने काय करण्याची गरज आहे?

६ यहोवावर विसंबून राहा आणि तो पुरवत असलेल्या प्रशिक्षणापासून लाभ घेत राहा. प्रगती करण्याची तुमची इच्छा प्रार्थनेत सतत व्यक्‍त करत राहा. (स्तो. २५:४, ५) तुमच्याप्रमाणेच देवाच्या वचनाचे शिक्षक बनण्यास एखाद्या व्यक्‍तीला मदत करून तुम्हाला आनंद अनुभवता येईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा