व्यापारी क्षेत्रात आत्मविश्वासाने प्रचार कार्य करा
१. व्यापारी क्षेत्रात प्रचार करण्याची भीती वाटत असल्यास आपण घाबरून का जाऊ नये?
१ व्यापारी क्षेत्रात प्रचार करण्याच्या विचारानेच तुम्हाला धडकी भरते का? असल्यास घाबरू नका, कारण धाडशी व निर्भय असलेल्या पौलालासुद्धा प्रचार करायला “धैर्य” एकवटावे लागले होते. (१ थेस्सलनी. २:२) व्यापारी क्षेत्रात प्रचार कार्य करताना आपल्या समोर कोणती आव्हाने येऊ शकतात व आपण त्यांना कसे तोंड देऊ शकतो त्यावर काही व्यावहारिक तोडगे खाली सुचवण्यात आले आहेत.
२. कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत बोललेले आवडणार नाही अशी चिंता आपण का करू नये?
२ कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत बोललेले आवडेल का? अनेक व्यापारी संकुलात काम करणारे कर्मचारी त्यांच्याकडे येणाऱ्यांना मदत करायला तयार असल्यामुळे कामाच्या वेळी त्यांच्याशी बोलल्याने त्यांना आवडते. तुम्ही एखादे गिऱ्हाईक आहात असे समजून ते तुमच्याशी आदराने बोलतील. नीटनेटके कपडे घातले व हसमुख चेहरा ठेवला तर ते तुमच्याशी चांगले वागतील.
३. गिऱ्हाईकांची चिडचिड होऊ नये म्हणून आपण काय टाळू शकतो?
३ अनेक गिऱ्हाईकांसमक्ष मला बोलावे लागेल का? शक्यतो अशी वेळ निवडा जेव्हा दुकानांत जास्त वर्दळ नसते, जसे की दुकाने उघडतात तेव्हा. मॅनेजर किंवा क्लार्क एकटे असतात तेव्हा त्यांच्याकडे जा व आपले म्हणणे थोडक्यात सांगा.
४. दुकानांमध्ये प्रचार कार्य करताना आपण काय म्हणू शकतो?
४ काय बोलले पाहिजे? दुकानात अनेक कर्मचारी असल्यास जबाबदार व्यक्तीशी बोला. तुम्ही म्हणू शकता: “तुमच्यासारखे व्यापारी लोक घरी सापडणे खूप कठीण आहे. म्हणून आम्ही कामाच्या ठिकाणी तुमची भेट घ्यायला आलोत. तुम्ही कामात आहात हे मला दिसतंय, मी थोडक्यातच बोलतो.” आपण कोणी विक्रेता आहोत अशी गल्लत होऊ नये म्हणून शक्यतो दानाचा उल्लेख न केलेलाच बरा. पण आपल्या कार्याचा खर्च कसा भागवला जातो असे कोणी विचारल्यास आपण दानाच्या व्यवस्थेबद्दल त्याला सांगू शकतो. व्यापाराचे स्वरूप लक्षात घेऊन, कर्मचारी व्यस्त नसले तर त्यांच्याशी थोडक्यात बोलण्यासाठी मॅनेजरची परवानगी तुम्ही घेऊ शकता. जबाबदार व्यक्तीशी तुम्ही जे बोललात तेच कर्मचाऱ्यालाही सांगा. एखादा कर्मचारी व्यस्त दिसत असल्यास, थोडक्यात बोला व एक पत्रिका त्याला द्या. कर्मचारी वर्गाशी बोलणे शक्य नसेल, तर दुकानात जेवणासाठी असलेल्या खोलीत किंवा सार्वजनिक ठिकाणी कदाचित प्रकाशने ठेवण्याची परवानगी तुम्हाला दिली जाईल.
५. लोकांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन आत्मविश्वासाने साक्षकार्य करण्याची कोणकोणती कारणे आहेत?
५ जर लोकांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन येशू व पौल पूर्ण आत्मविश्वासाने प्रचार करू शकले, तर तुम्हीही करू शकता. (मत्त. ४:१८-२१; ९:९; प्रे. कृत्ये १७:१७) शांत चित्ताने व धैर्याने प्रचार करता यावा म्हणून यहोवाकडे मदत मागा. (प्रे. कृत्ये ४:२९) हे एक असे क्षेत्र आहे जेथे लोक भेटतातच; फार कमी दारांना कुलपे दिसतात. मग अशा फलदायी क्षेत्रात साक्षकार्य करायला तुम्हाला आवडणार नाही का?