व्यापारी क्षेत्रात प्रचार कसा करावा
१. व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्याचे काही फायदे कोणते आहेत?
१ तुम्हाला अशा क्षेत्रात प्रचार करायला आवडेल का जिथे लोकांचे सहसा स्वागत केले जाते आणि जिथे कोणीही घरात नाही अशी स्थिती क्वचितच येते? तुमच्या मंडळीच्या क्षेत्रातच तुम्ही असे करू शकता. ते कसे? दुकानांमध्ये प्रचार करण्याद्वारे. दुकानांमध्ये साक्षकार्य करणाऱ्या प्रचारकांना बहुतेकदा चांगले परिणाम मिळाले आहेत.
२. व्यापारी क्षेत्रात साक्षकार्याची व्यवस्था कशाप्रकारे करता येऊ शकेल?
२ काही मंडळ्यांकडे, त्यांच्या नेमलेल्या क्षेत्राचा भाग म्हणून व्यापारी क्षेत्रे आहेत. मंडळीच्या प्रचार क्षेत्राचे काम पाहणारा बांधव दाटीवाटीने असलेल्या व्यापार विभागांचे खास नकाशा कार्ड बनवू शकतो. वसाहतींच्या क्षेत्रात व्यापारी क्षेत्रही येत असेल तर या व्यापारी क्षेत्रात, क्षेत्राचा एक भाग म्हणून प्रचारकार्य केले जाऊ नये, असे नकाशा कार्डावर स्पष्टपणे नमूद करावे. दुसऱ्या क्षेत्रांत, घरोघरच्या कार्याबरोबर दुकानांतही प्रचार कार्य करता येऊ शकते. तुम्ही पूर्वी कधी व्यापारी क्षेत्रात काम केले नसेल तर, लहान लहान दुकानांत प्रचार कार्य करण्याद्वारे सुरवात करा.
३. दुकानांत साक्षकार्य करताना कोणती गोष्ट आपल्याला प्रभावकारी असण्यास मदत करू शकेल?
३ साधीसोपी सुरवात: दुकानांमध्ये साक्षकार्य करायला जाताना तुम्ही राज्य सभागृहात जाता तेव्हा जसा पोशाख घालता तसा पोशाख घालणे महत्त्वाचे आहे. दुकानात जास्त रहदारी नसते अशा वेळी जाणे जास्त उचित असेल. शक्य असेल तर कोणी गिऱ्हाईक नसताना दुकानात प्रवेश करा. मॅनेजरबरोबर किंवा दुकानाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीबरोबर बोला. संक्षिप्त आणि मुद्द्याला धरून बोला. तुम्ही काय बोलू शकता?
४-६. स्टोअरकिपर किंवा मॅनेजरला साक्ष देताना तुम्ही काय म्हणू शकता?
४ स्टोअरकिपर किंवा मॅनेजरबरोबर बोलताना, तुम्ही असे म्हणू शकता: “धंदा करणारे लोक अधिक व्यस्त असल्यामुळे सहसा ते घरी सापडत नाहीत. त्यामुळे आम्ही कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेत आहोत. आमच्या या नियतकालिकांमध्ये सध्याच्या घडामोडींवर विश्वव्यापी दृष्टिकोन दिलेले आहेत.” मग नियतकालिकामधून एखाद्या मुद्द्यावर संक्षिप्तपणे बोला.
५ किंवा कदाचित तुम्ही असे म्हणू शकता: “लोकांची चूक नसताना त्यांना दुःख का सहन करावे लागते, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? अशा लोकांचा कदाचित अतिशय गरीब कुटुंबात जन्म झाला असेल व काही तर जन्मतःच अधू किंवा पांगळे असतात. पुष्कळ लोकांना वाटते, की एखाद्याला त्याच्या गत जीवनांतील कर्मांमुळे आता दुःख सहन करावे लागते. हे खरे असू शकते का? मानवांनी अशाप्रकारे दुःख सहन करावे, हा निर्माणकर्त्याचा उद्देश होता का? ही पत्रिका तुम्हाला या प्रश्नांची तर्काला पटतील अशी उत्तरे शोधण्यास मदत करेल.” मग, दुःखाचा कधी अंत होईल का? ही नवीन पत्रिका त्यांना द्या. त्या व्यक्तीला बायबलबद्दल थोडासुद्धा आदर असल्याचे दिसत असेल तर या पत्रिकेच्या पृष्ठे ५-६ वरील उचित शास्त्रवचने दाखवा.
६ दुकानाचा मालक/मॅनेजर व्यस्त आहे असे तुम्हाला दिसल्यास, तुम्ही फक्त त्याला पत्रिका देऊन असे म्हणू शकता: “तुम्ही कामातून थोडे मोकळे झाल्यावर मी तुम्हाला पुन्हा येऊन भेटेन. ही पत्रिका तुम्हाला कशी वाटली ते मला नंतर तुम्ही सांगू शकता.”
७. व्यापारी क्षेत्रातील लोकांची आवड आपण आणखी कशी वाढवू शकतो?
७ लोकांची आस्था आणखी वाढवणे: व्यापारी क्षेत्रात तुम्ही बायबल अभ्यास देखील संचालित करू शकता. एक खास पायनियर बांधव नियमितरीत्या एका व्यापाऱ्याला नियतकालिके देत असे. त्या मनुष्याने वाचत असलेल्या गोष्टींबद्दल गुणग्राहकता व्यक्त केली तेव्हा पायनियर बांधवाने त्याला अपेक्षा माहितीपत्रकाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा करता येईल त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. त्या मनुष्याच्या कामाच्या ठिकाणीच अभ्यास सुरू करण्यात आला. परिस्थिती लक्षात घेऊन, पायनियर बांधव दर वेळेला फक्त १० ते १५ मिनिटे अभ्यास संचालित करायचा. आपणही अशाचप्रकारे व्यापारी क्षेत्रात साक्षकार्य करण्याद्वारे योग्य लोकांना शोधत राहू या.