प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा वापर कसा करावा?
तुमच्या क्षेत्रात राहत नसलेली किंवा दुसरी भाषा बोलणारी आस्थेवाईक व्यक्ती जेव्हा तुम्हाला भेटते तेव्हा तुम्ही हा फॉर्म भरला पाहिजे. सहसा, त्या व्यक्तीला खरोखरच सत्य जाणून घेण्याची इच्छा असते तेव्हाच आपण हा फार्म भरतो. पण यातही एक अपवाद आहे. समजा, आपण एखाद्या कर्णबधीर व्यक्तीला भेटलो आणि आपल्या जवळच्या मंडळीत संकेत भाषा गट असेल. अशा परिस्थितीत, त्या व्यक्तीने आस्था दाखवली असली किंवा नसली तरीसुद्धा आपण हा फॉर्म (S-43) भरला पाहिजे.
फॉर्म भरल्यावर तो कोणाला द्यावा? फॉर्म भरल्यावर तो मंडळीच्या सचिवांना दिला पाहिजे. मंडळीच्या सचिवांना, तो फॉर्म कोणत्या मंडळीला पाठवला पाहिजे हे माहीत असेल तर ते, त्या मंडळीच्या वडिलांना तो फॉर्म पाठवून देतील जेणेकरून आस्थेवाईक व्यक्तीची भेट घेण्यासाठी ते पुढील व्यवस्था करतील. पण सचिवांना जर तो फॉर्म कोणाला दिला पाहिजे हे माहीत नसेल तर त्यांनी तो शाखा कार्यालयाला पाठवावा.
आस्थेवाईक व्यक्ती दुसरी भाषा बोलत असेल आणि तुमच्या क्षेत्रात राहत असेल, तर जोपर्यंत तुमच्या मंडळीतील किंवा शक्य असेल तर दुसऱ्या मंडळीतील तिची भाषा बोलणाऱ्या प्रचारकाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीची भेट घेऊन तिची आस्था वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.—नोव्हेंबर २००९, आमची राज्य सेवा पृष्ठ ३ पाहा.