वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/१४ पृ. ७
  • सेवाकार्यासाठी मोठे द्वार खुले आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवाकार्यासाठी मोठे द्वार खुले आहे
  • आमची राज्य सेवा—२०१४
  • मिळती जुळती माहिती
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—२०११
  • आपली अधिकृत वेबसाईट —आपल्या व इतरांच्या फायद्यासाठी
    आमची राज्य सेवा—२०१२
  • कृपया लवकर भेट द्या
    आमची राज्य सेवा—२००३
  • प्लीज फॉलो अप (S-43) फॉर्मचा वापर कसा करावा?
    आमची राज्य सेवा—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२०१४
km ६/१४ पृ. ७

सेवाकार्यासाठी मोठे द्वार खुले आहे

सुवार्तेचा आवेशी प्रचारक असणारा पौल अगदी उत्सुकतेने अशी क्षेत्रे शोधायचा जिथे सुवार्तिकांची जास्त गरज आहे. त्यांपैकी एक क्षेत्र होते इफिस शहर. तो त्या ठिकाणी प्रचार कार्य करण्यात इतका यशस्वी झाला की त्याने ख्रिस्ती बांधवांना असे लिहिले: “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार माझ्यासाठी उघडले आहे.” (१ करिंथ. १६:९) पौलाने या क्षेत्रात सेवाकार्य सुरू ठेवले आणि अनेक इफिसकरांना सत्यात येण्यास मदत केली. (प्रे. कृत्ये १९:१-२०, २६) आज आपल्यासाठीही सेवाकार्याचे एक मोठे द्वार खुले आहे. अलीकडील खास साक्षकार्याच्या मोहिमेदरम्यान अनेक क्षेत्रांमध्ये, विशेषतः कोणत्याही मंडळीला नेमलेली नाहीत अशा नवीन क्षेत्रांमध्ये बऱ्‍याच लोकांना सत्यात आवड असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे, ज्या क्षेत्रांत सहसा सेवाकार्य केले जात नाही त्या क्षेत्रांत सुवार्तेचा प्रसार करण्यात हातभार लावण्याचे आणि आवड दाखवणाऱ्‍या लोकांना साहाय्य करण्याचे निमंत्रण आपल्याला देण्यात येत आहे.—२ करिंथकर ८:१३-१५ पडताळून पाहा.

तुम्ही जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करू शकता का? इतर ठिकाणी जाऊन सेवा करण्याविषयी तुम्ही प्रार्थनापूर्वक विचार केला आहे का? कापणीच्या कामात पुरेपूर सहभाग घेण्यासाठी गेल्या काही वर्षांत हजारो ख्रिस्ती कुटुंबे जास्त गरज असलेल्या ठिकाणी स्थलांतरित झाली आहेत. अशा प्रकारे स्थलांतर केलेल्या एका जोडप्याने म्हटले: “आमच्या सेवेचा सर्वात चांगला उपयोग होऊ शकेल अशा ठिकाणी यहोवाची सेवा करण्याची आमची इच्छा होती.” तुमचीही अशी इच्छा असेल आणि इतर ठिकाणी जाऊन सेवा करणे तुम्हाला शक्य असेल तर मंडळीच्या वडिलांशी याबद्दल चर्चा करा. त्यानंतर विभागीय पर्यवेक्षकांशी बोला आणि ते याविषयी काय सल्ला देतात ते पाहा.

कोणत्या भागात जास्त गरज आहे याबद्दल शाखा कार्यालयाकडून माहिती मिळवण्यासाठी तुमची ठराविक इच्छा पत्रात लिहून ते पत्र मंडळीच्या सेवा समितीकडे द्या. त्यानंतर ते त्यांचे अभिप्राय पत्रासोबत शाखा कार्यालयाला पाठवतील. सेवाकार्याचे हे द्वार जोपर्यंत खुले आहे तोपर्यंत होताहोईल तितकी यहोवाची सेवा करण्यात आपण व्यस्त राहू या.—१ करिंथ. १५:५८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा