घोषणा
▪ साहित्य सादरता जानेवारी: पिवळ्या पडत असलेल्या कागदावर छापलेले अथवा १९९१ सालाआधी प्रकाशित झालेले कोणतेही १९२ पृष्ठांचे पुस्तक सादर करावे. मंडळीत यांपैकी कोणत्याही पुस्तकांचा साठा नसल्यास, ज्ञान पुस्तक किंवा जागृत राहा! माहितीपत्रक सादर करावे. फेब्रुवारी: तुमच्याविषयी काळजी करणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का? (इंग्रजी) किंवा कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य. मार्च: बायबल नेमके काय शिकवते? बायबल अभ्यास सुरू करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करा. एप्रिल व मे: टेहळणी बुरूज नियतकालिक. स्मारकविधी आणि त्यानंतरच्या खास जाहीर भाषणाला उपस्थित असलेल्या परंतु मंडळीसोबत सक्रिय नसलेल्या आस्थेवाईक लोकांना या महिन्यांमध्ये भेट देण्याचा खास प्रयत्न केला जाईल. अशा भेटी देण्याचा उद्देश, ज्यांनी अद्याप गृह बायबल अभ्यास स्वीकारलेला नाही अशांबरोबर अभ्यास सुरू करणे हा असला पाहिजे.
▪ मार्च महिन्यात पाच शनिवार-रविवार असल्यामुळे, हा महिना साहाय्यक पायनियरींगसाठी उत्तम महिना आहे.
▪ फेब्रुवारी पासून, विभागीय पर्यवेक्षकांच्या नव्या जाहीर भाषणाचा विषय, “संकटकाळात तुम्हाला साहाय्य कुठून मिळू शकेल?” हा असेल. हे जाहीर भाषण देण्यास सुरुवात करण्याची शेवटली तारीख मार्च २ ही आहे.
▪ या वर्षी शनिवार, मार्च २२ रोजी सूर्यास्तानंतर स्मारक विधीकरता मंडळ्यांनी चांगल्या सुयोग्य व्यवस्था कराव्यात. भाषण आधी सुरू करण्यास हरकत नाही, पण बोधचिन्हे सूर्यास्त होईपर्यंत उपस्थितांमध्ये फिरवू नयेत. तुमच्या भागात किती वाजता सूर्यास्त होतो याविषयी तुम्ही संबंधित सूत्रांकडून माहिती मिळवू शकता. प्रत्येक मंडळीने आपापला स्मारकविधी साजरा करावा हे उचित असले तरी ते नेहमीच शक्य नसते. जेथे अनेक मंडळ्या सहसा एकच राज्य सभागृह वापरतात तेथे एक किंवा अनेक मंडळ्या त्या संध्याकाळपुरते दुसरे एखादे सभागृह वापरण्याची व्यवस्था करू शकतात. एकाच सभागृहात होणाऱ्या स्मारकविधीच्या दोन कार्यक्रमांदरम्यान कमीत कमी ४० मिनिटांचे अंतर ठेवावे असे आम्ही सुचवू इच्छितो; यामुळे सर्वांना त्या प्रसंगाचा पुरेपूर लाभ घेता येईल. वाहतूक, पार्किंगची सोय, उतारूंची वाहनांमध्ये चढण्याची व उतरण्याची सोय या सर्व गोष्टींवरही विचार करावा. स्थानिकरित्या कोणत्या व्यवस्था उत्तम ठरतील हे वडील वर्गाने ठरवावे.
▪ मंडळीतल्या प्रत्येक सामान्य पायनियरचे पायनियर नियुक्ती पत्र (S-202) आपल्याजवळ आहे की नाही याची मंडळीच्या सचिवांनी खात्री करावी. जर नसेल, तर त्यांनी याविषयी शाखा दप्तराला लेखी कळवावे.