वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०७ पृ. ३
  • सेवेमध्ये अधिक करू पाहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सेवेमध्ये अधिक करू पाहणे
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • तरुण बांधवांनो, जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी तुम्ही पुढे येऊ शकता का?
    आमची राज्य सेवा—२०१३
  • आपली सेवा वाढवण्याचे मार्ग
    आमची राज्य सेवा—१९९९
  • जबाबदाऱ्‍या सांभाळण्यासाठी पुढे येण्याचे इतरांना प्रशिक्षण द्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km १२/०७ पृ. ३

सेवेमध्ये अधिक करू पाहणे

१ प्रेषित पौलाने ख्रिश्‍चनांना देवाच्या मार्गात चालण्यास व त्यात “उत्तरोत्तर वृद्धी” करण्यास आर्जवले. (१ थेस्सलनी. ४:१) यात काय काय गोवलेले आहे? एक गोष्ट म्हणजे आपण सतत आध्यात्मिक कार्यात अधिकाधिक करू पाहण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत आणि ‘आपल्याला सोपवलेली सेवा पूर्ण’ करण्याचा नेहमी प्रयत्न केला पाहिजे.—२ तीम. ४:५.

२ उद्देश: सेवेमध्ये अधिक सहभाग घेण्यामागचा आपला उद्देश, निर्माणकर्त्याची अधिक सेवा करण्याची इच्छा असली पाहिजे. आपण, आध्यात्मिक प्रगती करू इच्छितो व म्हणून सेवा सुधारण्याचे नवनवीन मार्ग शोधत असतो. योग्य हेतू मनात बाळगून आपण जर चांगला नित्यक्रम ठेवला तर देवाच्या सेवेसंबंधाने ठेवलेली ध्येये आपण गाठू शकू.—स्तो. १:१, २; फिलिप्पै. ४:६; इब्री १०:२४, २५.

३ सेवेमध्ये आपला सहभाग वाढवण्याकरता आपण, देण्याचा आणि आत्म-त्यागाचा आत्मा विकसित केला पाहिजे. येशूच्या उत्तम उदाहरणावर प्रार्थनापूर्वक मनन केल्याने आपण अशाप्रकाराचा आत्मा अंगी बाणवू शकतो. (मत्त. २०:२८) येशूला आपल्या संपूर्ण सेवेदरम्यान इतरांची सेवा करण्यात खूप आनंद होत असे. (प्रे. कृत्ये २०:३५) आपणही लोकांमध्ये व्यक्‍तिगत आवड घेऊन व संधी मिळेल तेव्हा सुवार्ता सांगण्यास जागृत राहून येशूचे अनुकरण करू शकतो.—यश. ६:८.

४ पालकांची जबाबदारी: पालक आपल्या मुलांच्या मनात बाळपणापासूनच, इतरांची सेवा करण्याची व आपली सेवा वाढवण्याची इच्छा जागृत करू शकतात. कुटुंबातील इतर सदस्य सेवेत कसे परिश्रम घेतात व हिरिरीने भाग घेतात हे मुले पाहतील. एक बांधव लहान होता तेव्हा आपल्या आजोबांना मंडळीच्या कार्यात आवेशाने भाग घेताना पाहायचा. याचा परिणाम असा झाला, की आपल्या आजोबांची मेहनत व आनंद पाहून हा बांधवही मंडळीतल्या इतर बंधूभगिनींना मदत करण्यासाठी संधी शोधू लागला. आता हा बांधव एक सेवा सेवक आहे.

५ बांधवांची गरज आहे: “कोणी अध्यक्षाचे काम करू पाहतो तर तो चांगल्या कामाची आकांक्षा धरितो.” (१ तीम. ३:१) हे शब्द बांधवांना यहोवाच्या संघटनेत आणखी विशेषाधिकार मिळण्याच्या पात्रतेचे होण्याचे उत्तेजन देतात. यासाठी त्यांच्याजवळ खास कौशल्ये असण्याची आवश्‍यकता नाही. जो बांधव विशेषाधिकार मिळवू पाहतो तो राज्याला प्रथम स्थान देईल आणि सेवेमध्ये आवेशाने भाग घेईल. (मत्त. ६:३३; २ तीम. ४:५) इतरांपुढे तो स्वतःचे उत्तम उदाहरण मांडायचा प्रयत्न करेल.

६ संपूर्ण जगभरात: लोकांना गोळा करण्याच्या कामात यहोवा त्वरा करीत आहे. (यश. ६०:२२) येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करणाऱ्‍या सर्वांनी आपली सेवा अगदी तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. २००६ सेवा वर्षाच्या जागतिक अहवालावरून दिसते, की २,४८,३२७ जणांनी बाप्तिस्मा घेतला. याचा अर्थ दररोज, ६८० पेक्षा अधिक नवीन लोक देवाच्या संस्थेत येत होते! तेव्हा, आपली सेवा पूर्ण करण्याकरता आपण नवनवीन मार्ग शोधत राहूया.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा