वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १०/०७ पृ. १२
  • उत्तेजन मिळवणे व देणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उत्तेजन मिळवणे व देणे
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • “पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • फिरते देखरेखे सत्यातील सहकारी
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • आपल्यासाठी ते खूप मेहनत घेतात
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • प्रवासी पर्यवेक्षक विश्‍वासू कारभाऱ्‍यांप्रमाणे सेवा कशी करतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km १०/०७ पृ. १२

उत्तेजन मिळवणे व देणे

१. प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटींत कोणती खास संधी मिळते?

१ प्रेषित पौलाने रोम येथील मंडळीला लिहिले: “तुम्ही स्थिर व्हावे म्हणून मी तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान द्यावे, ह्‍यासाठी तुमची भेट घेण्याची मला फार उत्कंठा आहे; म्हणजे मी तुमच्या सन्‍निध असून तुमच्या व माझ्या अशा परस्परांच्या विश्‍वासाच्या योगाने आपणा उभयतास, मला तुम्हाविषयी, व तुम्हाला माझ्याविषयी उत्तेजन प्राप्त व्हावे.” (रोम. १:११, १२) आपल्या काळात, प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटी उत्तेजन मिळवण्याची व उत्तेजन देण्याची संधी प्राप्त करून देतात.

२. प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटीविषयी आगाऊ सूचना का दिली जाते?

२ मंडळी: प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटीबाबत सहसा मंडळीला तीन महिन्यांआधीच सूचना दिली जाते. त्यामुळे आपल्याला त्यांच्या भेटीचा पुरेपूर लाभ घेण्याकरता आधीपासूनच योजना व आपल्या कार्यांत आवश्‍यक फेरबदल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. (इफिस. ५:१५, १६) जर तुम्ही नोकरी करत असाल, तर या आठवड्यादरम्यान क्षेत्र सेवाकार्यात सहभागी होण्याकरता तुम्ही रजेसाठी अर्ज करू शकता. काहीजण त्या महिन्यात सहायक पायनियर सेवा करतात. तुम्ही जर त्याच काळात शहराबाहेर जाण्याची योजना केली असेल तर पर्यवेक्षकांची भेट चुकू नये म्हणून तुम्ही आपल्या योजना बदलू शकाल का?

३. प्रोत्साहन मिळवण्याकरता आपण व्यक्‍तिशः काय काय करू शकतो?

३ प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटीचा एक मुख्य उद्देश बांधवांना वैयक्‍तिक उत्तेजन देणे आणि क्षेत्र सेवाकार्याकरता प्रशिक्षण देणे हा असतो. तुम्ही त्यांच्यासोबत किंवा ते विवाहित असल्यास त्यांच्या पत्नीसोबत कार्य करण्याची विनंती करू शकता का? प्रवासी पर्यवेक्षकांना निरनिराळ्या प्रचारकांसोबत, फारसा अनुभव नसणाऱ्‍या किंवा सेवाकार्यात जे निपुण नाहीत अशा प्रचारकांसोबतही कार्य करण्यास आनंद वाटतो. ते कशाप्रकारे सुवार्ता सादर करतात हे पाहण्याद्वारे व त्यांनी प्रेमळपणे दिलेल्या सूचनांद्वारे सर्वांना काही न काही शिकायला मिळू शकते. (१ करिंथ. ४:१६, १७) तुम्ही त्यांना आपल्याकडे जेवायला बोलावल्यास, त्यांच्या सहवासाचा आनंद घेण्याची व प्रोत्साहन मिळवण्याची ती आणखी एक सुसंधी ठरेल. (इब्री १३:२) त्यांची भाषणे खास तुमच्या मंडळीला लक्षात घेऊन तयार केलेली असल्यामुळे ती लक्षपूर्वक ऐका.

४. आपण आपल्या विभागीय पर्यवेक्षकांना प्रोत्साहन कसे देऊ शकतो?

४ प्रवासी पर्यवेक्षक: प्रेषित पौल ज्या बांधवांची सेवा करत होता त्यांच्यापेक्षा तो स्वतः फार वेगळा नव्हता. कारण त्याच्याही जीवनात अनेक आव्हाने व समस्या होत्या. त्यालाही प्रोत्साहनाची गरज होती आणि बांधवांकडून मिळणाऱ्‍या प्रोत्साहनाबद्दल तो कृतज्ञ होता. (२ करिंथ. ११:२६-२८) रोममधील मंडळीला जेव्हा कैदी असलेला पौल तेथे येणार आहे हे समजले तेव्हा त्यांच्यापैकी काहीजण त्याला भेटण्याकरता ७४ किलोमीटरचा प्रवास करून अप्पियाच्या पेठेला गेले! “त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुति करून धैर्य धरले.” (प्रे. कृत्ये २८:१५) तुम्हीसुद्धा अशाचप्रकारे आपल्या प्रवासी पर्यवेक्षकांना प्रोत्साहन देऊ शकता. त्यांच्या भेटीदरम्यान आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांना आवेशाने सहकार्य देऊन त्यांना ‘दुप्पट सन्मान’ द्या. (१ तीम. ५:१७) त्यांच्या सर्व परिश्रमांची आपल्याला किती कदर वाटते हे प्रामाणिक शब्दांद्वारे व्यक्‍त करा व आपल्या कृतींतूनही दाखवा. तुमचा विश्‍वास, प्रीती व धीर पाहून त्यांना व त्यांच्या पत्नीला खरोखर आनंद वाटेल.—२ थेस्सलनी. १:३, ४.

५. आपल्यापैकी सर्वांनाच आज प्रोत्साहनाची गरज का आहे?

५ ‘शेवटल्या काळातील या कठीण दिवसांत’ आपल्यामध्ये असा कोण आहे की ज्याला प्रोत्साहनाची गरज नाही? (२ तीम. ३:१) विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीच्या आठवड्यादरम्यान त्यांच्यासोबत खास कार्यात पुरेपूर सहभाग घेण्याचा आतापासूनच निर्धार करा. आपण सर्वजण—प्रवासी पर्यवेक्षक तसेच प्रचारकही एकमेकांना प्रोत्साहन देण्याचा आनंद अनुभवतो. अशारितीने आपण सतत ‘एकमेकांचे सांत्वन व एकमेकांची उन्‍नती’ करू.—१ थेस्सलनी. ५:११.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा