मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज ऑक्टो. १
“तुम्हाला काय वाटते, जीवनात उद्देश असला तर जीवन आणखी अर्थभरीत होईल का? [उत्तर ऐकून घ्या आणि मग १ योहान २:१५-१७ वाचा. पृष्ठ १७ वरील लेख काढा.] या आणि यानंतरच्या लेखात, देवाची इच्छा पूर्ण केल्याने आपले जीवन उद्देशपूर्ण व आनंदी कसे होऊ शकते, याची चर्चा करण्यात आली आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“आपल्या सर्वांनाच चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य हवे आहे, नाही का? तुम्हाला काय वाटते, जीवनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने आपले आरोग्य सुधारू शकेल का? [उत्तर ऐकून घ्या आणि मग नीतिसूत्रे १७:२२ वाचून दाखवा.] सकारात्मक दृष्टिकोन बाळगल्याने कोणता फायदा होतो, ते या लेखात सांगितलेले आहे.” पृष्ठ २१ वरील लेख दाखवा.
टेहळणी बुरूज नोव्हें. १
“पुष्कळ लोकांना वाटते, की उद्याचा काही भरवसा नाही. त्यामुळे ते केवळ फक्त आजचाच विचार करतात. तुमचे याबाबतीत काय मत आहे? [उत्तर ऐकून घ्या.] येशूने एक अतिशय रोचक विधान केले. [मत्तय ६:३४ वाचा.] भवितव्याचा विचार करायचा परंतु त्यासोबतच त्याविषयी अनावश्यक चिंता करणे कसे टाळायचे, हे या मासिकात सांगितलेले आहे.”
सावध राहा! ऑक्टो.-डिसें.
“तुमच्या मते आईवडिलांना खरोखर उपयोगी पडेल असा सल्ला कुठे मिळू शकेल? [उत्तर ऐकून घ्या.] यासंबंधी बायबलमध्ये एक प्रतिज्ञा दिली आहे. [२ तीमथ्य ३:१६ वाचा.] मुलांचे आनंददायक संगोपन करण्यासाठी बायबल आईवडिलांना व्यावहारिक दृष्टीने कसे साहाय्य करते याविषयी या मासिकात चर्चा केली आहे.”