ईश्वरशासित सेवा प्रशाला उजळणी
ऑक्टोबर २९, २००७ ने सुरू होणाऱ्या सप्ताहातील ईश्वरशासित सेवा प्रशालेत पुढील प्रश्नांची तोंडी उजळणी होईल. प्रशाला पर्यवेक्षक, सप्टेंबर ३ ते ऑक्टोबर २९, २००७ पर्यंतच्या आठवड्यांदरम्यान चर्चिलेल्या साहित्यावर आधारित ३० मिनिटांची उजळणी घेतील. [सूचना: ज्या प्रश्नांनंतर संदर्भ दिलेला नाही, त्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ती स्वतःच प्रकाशनांमधून शोधावी लागतील.—सेवा प्रशाला (इंग्रजी), पृष्ठे ३६-७ पाहा.]
भाषणाचे गुण
१. पुनरुक्ती ही एक महत्त्वाची शिकवण्याची पद्धत का आहे? [be पृ. २०६ परि. १-२, चौकोन]
२. भाषणाच्या मुख्य विषयावर आपण कशाप्रकारे जोर देऊ शकतो? [be पृ. २१०, चौकोन]
३. भाषणातील मुख्य मुद्दे कोणते असतात आणि कोणत्या धर्तीवर वक्ता ते निवडतो? [be पृ. २१२ परि. १-३]
४. भाषणात बरेच मुख्य मुद्दे का नसावेत? [be पृ. २१३ परि. २-४]
५. आपली प्रस्तावना श्रोत्यांमध्ये आवड निर्माण करणारी का असली पाहिजे व अशी प्रस्तावना कशी तयार करता येईल? [be पृ. २१५ परि. १; पृ. २१६ परि. १-३, चौकोन]
नेमणूक क्र. १
६. स्तोत्र ११९:८९, ९० आपल्याला, देवाच्या वचनावर आपण भाव ठेवू शकतो, हे समजण्यासाठी कशाप्रकारे मदत करते? [w०५-MR ५/१ पृ. २७ परि. ३]
७. यहोवाचे नाव जाणून त्यानुसार चालण्यात काय काय गोवलेले आहे? [wt पृ. २१ परि. १३]
८. काबाड कष्ट करणे हे प्रशंसनीय असले तरी, कामात समाधान मिळवण्याची एक महत्त्वपूर्ण गोष्ट कोणती आहे? [w०५ ७/१ पृ. ७, परि. २]
९. बायबलचे वाचन करण्यामागचा आपला उद्देश काय असला पाहिजे? [wt पृ. २८ परि. ११]
१०. येशूने जेव्हा पृथ्वीवर आपल्या सेवेस सुरुवात केली तेव्हा कोणत्या गोष्टीने तो मशिहा असल्याचे स्पष्ट झाले? [wt पृ. ३४ परि. ५]
साप्ताहिक बायबल वाचन
११. यहेज्केलाच्या दृष्टांतात, मंदिराचे माप घेणे कशास चित्रित करत होते आणि यामुळे आज आपल्याला कोणते आश्वासन मिळते? (यहे. ४०:२-५) [w९९-MR ३/१ पृ. ९, परि. ६; पृ. १४ परि. ७]
१२. यहेज्केलाच्या दृष्टांताच्या शेवटल्या पूर्णतेत ‘अधिपती’ कोण आहे? (यहे. ४८:२१) [w९९-MR ३/१ पृ. १६ परि. १३-१५; पृ. २२-२३ परि. १९, २०]
१३. दानीएल २:२१ वचनाचा काय अर्थ होतो? [w९८-MR ९/१५ पृ. १२, परि. ९]
१४. कोणत्या गोष्टीमुळे दानीएल यहोवाच्या दृष्टीत “परमप्रिय” बनला? (दानी. ९:२३) [dp पृ. १८५; परि. १२; w०४-MR ८/१ पृ. १२ परि. १७]
१५. इस्राएल देशात “देवज्ञान” नव्हते हे कोणत्या अर्थाने आणि याविषयी आपण कोणता दृष्टिकोन बाळगला पाहिजे? (होशे. ४:१, २, ६) [w९७-MR ३/१ पृ. १४, परि. १-पृ. १५ परि. ३]