वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जानेवारी पृ. ७
  • “पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • उत्तेजन मिळवणे व देणे
    आमची राज्य सेवा—२००७
  • आपल्यासाठी ते खूप मेहनत घेतात
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • फिरते देखरेखे सत्यातील सहकारी
    यहोवाचे साक्षीदार जगभरात देवाची इच्छा ऐक्याने आचरीत आहेत
  • प्रश्‍न पेटी
    आमची राज्य सेवा—१९९०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जानेवारी पृ. ७
पौलने त्याला भेटायला आलेल्या बांधवांसाठी देवाचे आभार मानले

ख्रिस्ती जीवन

“पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला”

जेव्हा रोममधल्या मंडळीला पौल येत असल्याचं कळलं, तेव्हा तिथल्या काही बांधवांनी जवळजवळ ६४ कि.मी. चा प्रवास केला आणि त्याची भेट घेतली. त्यांनी दाखवलेल्या आत्मत्यागी वृत्तीचा आणि प्रेमाचा पौलवर कसा परिणाम झाला? “त्यांना पाहताच पौलने देवाचे उपकार मानले आणि त्याला धीर मिळाला.” (प्रेका २८:१५) मंडळ्यांना भेटी देऊन त्यांना बळकट करणारा म्हणून पौलला ओळखलं जात होतं. पण यावेळी मात्र उलट झालं होतं. तो कैदेत असल्यामुळे, त्यालाच प्रोत्साहनाची गरज होती. आणि ही गरज या बांधवांनी पूर्ण केली होती.​—२कर १३:१०.

आज विभागीय पर्यवेक्षक प्रत्येक मंडळीला भेट देऊन बंधुभगिनींचा विश्‍वास भक्कम करण्याचं काम करतात. आणि साहजिकच आपल्या सर्वांप्रमाणे, त्यांनाही कधीकधी थकल्यासारखं, चिंतेने दबून गेल्यासारखं आणि निरुत्साहित झाल्यासारखं वाटतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांची पत्नी तुमच्या मंडळीला भेट द्यायला येतील तेव्हा त्यांना धीर मिळावा आणि “एकमेकांना प्रोत्साहन” मिळावं म्हणून तुम्ही काय करू शकता?​—रोम १:११, १२.

  • क्षेत्र सेवेची सभा चालवताना एक विभागीय पर्यवेक्षक

    क्षेत्र सेवेच्या सभांना हजर राहा. विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीच्या खास आठवड्यात प्रचारकांच्या फायद्यासाठी बऱ्‍याच योजना केल्या जातात. यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी जेव्हा प्रचारक दररोजच्या कामात बरेच फेरबदल करतात, तेव्हा विभागीय पर्यवेक्षकांना यामुळे प्रोत्साहन मिळतं. (१थेस १:२, ३; २:२०) मग तुम्ही त्या महिन्यात सहायक पायनियरींग करू शकाल का? तसंच, क्षेत्रसेवेत त्यांच्यासोबत आणि त्यांच्या पत्नीसोबत कार्य करायला तुम्हाला आवडेल का? किंवा आपल्या बायबल अभ्यासाला त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला सोबत घेऊन जाण्याविषयी तुम्हाला विचार करता येईल का? त्यांनाही नवीन असणाऱ्‍या किंवा क्षेत्रसेवेत कमी अनुभव असलेल्या आणि इतर वेगवेगळ्या प्रचारकांसोबत काम करायला नक्की आवडेल.

  • एक कुटुंब विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीचा पाहुणचार करत असताना

    पाहुणचार करा. तुम्ही त्यांच्या राहण्याची किंवा एखाद्या वेळी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करू शकता का? यामुळे विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीबद्दल तुमच्या मनात आपुलकी असल्याचं त्यांना दिसून येईल. पण त्यासाठी तुम्ही काहीतरी विशेष करावं अशी अपेक्षा ते कधीच करत नाहीत.​—लूक १०:३८-४२.

  • मंडळीतील वडिलांसोबत सभा घेत असताना एक विभागीय पर्यवेक्षक

    त्यांनी दिलेल्या सूचना आणि सल्ले स्वीकारा आणि त्यांचं पालन करा. यहोवाच्या सेवेत आपल्याला आणखी प्रगती करता यावी म्हणून विभागीय पर्यवेक्षक आपल्याला प्रेमळपणे मदत करण्याचा प्रयत्न करत असतात. कधीकधी ते कदाचित आपल्याला कडक शब्दातही सल्ला देतील. (१कर ५:१-५) पण जेव्हा आपण त्यांनी दिलेला सल्ला नम्रपणे स्वीकारतो आणि अधीनता दाखवतो तेव्हा त्यांना त्याचा खूप आनंद होतो.​—इब्री १३:१७.

  • विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानताना मंडळीतील बंधुभगिनी

    कदर असल्याचं व्यक्‍त करा. विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीमुळे, तुम्हाला कसा फायदा झाला आहे ते त्यांना सांगा. तुम्ही हे कदाचित त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलून किंवा त्यांना एखाद्या कार्डवर किंवा चिठ्ठीवर लिहून सांगू शकता.​—कल ३:१५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा