वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०६ पृ. ८
  • उद्‌बोधक दृश्‍य साधनांचा उपयोग करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • उद्‌बोधक दृश्‍य साधनांचा उपयोग करा
  • आमची राज्य सेवा—२००६
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—शिकवण्यासाठी व्हिडिओंचा वापर करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • व्हिडिओचा वापर करून विद्यार्थ्याला शिकवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • व्हिडिओंचा चांगला उपयोग करा
    आमची राज्य सेवा—२०१३
  • साक्ष देणाऱ्‍या व्हिडिओंमुळे पडणारी छाप
    आमची राज्य सेवा—२००२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००६
km २/०६ पृ. ८

उद्‌बोधक दृश्‍य साधनांचा उपयोग करा

१. आपल्या प्राचीन सेवकांना शिकवण्याकरता यहोवाने दृश्‍य साधनांचा उपयोग कशाप्रकारे केला आणि याचा काय परिणाम झाला?

१ आपल्या प्राचीन सेवकांना महत्त्वपूर्ण माहिती देताना यहोवाने काहीवेळा दृष्टान्तांचा व स्वप्नांचा उपयोग केला. यहोवाच्या ज्योर्तिमय रथाच्या, यहेज्केलाला दिलेल्या दृष्टांताचा विचार करा. (यहे. १:१-२८) दानीएलाला जागतिक सत्तांच्या वाटचालीचे चित्रण करणारे भविष्यसूचक स्वप्न पडले तेव्हा त्याला कसे वाटले असेल याची कल्पना करा. (दानी. ७:१-५, २८) आणि प्रेषित योहानाला ‘प्रभूच्या दिवसांत’ घडणाऱ्‍या घटनांचे ‘चिन्हांद्वारे’ दाखवलेले शिरशिरी भरवणारे प्रकटीकरण देण्यात आले तेव्हा त्याच्या प्रतिक्रिया काय असतील? (प्रकटी. १:१, १०, पं.र.भा.) विविध रंगांचा व सामर्थ्यशाली दृश्‍यांचा उपयोग करून यहोवाने या संदेष्ट्यांना शिकवले तेव्हा त्यांच्या मनावर अमीट छाप पडली.

२. इतरांना बायबल सत्ये शिकवण्यासाठी आपण कोणत्या दृश्‍य साधनांचा उपयोग करू शकतो?

२ लोकांच्या मनावर अमीट छाप पाडण्याच्या हेतूने जर आपण त्यांना बायबल सत्ये समजावून सांगू इच्छित असू तर आपण शिकवताना आपल्या व्हिडिओंचा उपयोग करू शकतो. आपले व्हिडिओ विविध विषयांवर आहेत. बायबल, यहोवाची संघटना आणि आपल्याला उत्तम ख्रिस्ती बनवणारी तत्त्वे यांवर ते आपला भरवसा वाढवतात. शिकवण्यासाठी आपण आपल्या व्हिडिओंचा उपयोग कसा करू शकतो त्याचे काही मार्ग खाली दिले आहेत. व्हिडिओंचे काही नमुने खाली दिले आहेत ज्यांचा तुम्ही उपयोग करू शकता.

३. एखाद्या बायबल विद्यार्थ्याला संघटनेकडे आकर्षित करण्याकरता तुम्ही कशाचा उपयोग करू शकता?

३ सेवेत: तुम्ही बरेचदा तुमच्या बायबल विद्यार्थ्याला आपल्या विश्‍वव्यापी ख्रिस्ती समाजाविषयी सांगितले आहे का? आपला संपूर्ण बंधूसमाज (इंग्रजी) या व्हिडिओद्वारे तो त्यांना दाखवा. तुमच्या पुढील अभ्यासाच्या आधी पाहण्याकरता तुम्ही त्यांना तो एकतर देऊ शकता किंवा मग येत्या अभ्यासादरम्यान तुम्ही तो त्यांच्याबरोबर पाहू शकता. मग, आमची राज्य सेवा जून २००२ अंकातील उजळणी प्रश्‍नांचा उपयोग करून त्यांच्याबरोबर चर्चा करा.

४. साक्षीदार असलेले तरुण, कोणत्या उद्‌बोधक साधनांचा उपयोग करू शकतात?

४ तरुणांनो, तुम्ही तुमच्या शिक्षकांना यहोवाचे साक्षीदार नात्सी छळातही खंबीर किंवा परीक्षेत विश्‍वासू राहिलेले सोव्हियत संघातील यहोवाचे साक्षीदार (इंग्रजी) माहितीपट असलेले व्हिडिओ, वर्गाला दाखवण्याची परवानगी मागू शकता. आमची राज्य सेवा जून २००१ किंवा फेब्रुवारी २००३ अंकातील प्रश्‍नांचा उपयोग करून तुम्ही एक प्रश्‍नावली तयार कराल व वर्गाबरोबर त्याची चर्चा कराल, असे सांगा.

५. पालकांसाठी, कौटुंबिक अभ्यासात उपयोग करण्याजोगे कोणते साधन उपलब्ध आहे?

५ परिवारासोबत व मित्रांसोबत: पालकांनो, तुमच्या मुलांनी, तरुण लोक विचारतात—मला खरे मित्र कसे बनवता येतील? (इंग्रजी) हा व्हिडिओ पाहिला होता, त्याला कदाचित आता बराच काळ झाला असेल. आपल्या पुढील कौटुंबिक अभ्यासात तो पुन्हा पाहायला काय हरकत आहे? आमची राज्य सेवा एप्रिल २००२ अंकात प्रश्‍न दिले आहेत ज्यांचा तुम्ही उत्साही, मनमोकळी चर्चा करण्यासाठी उपयोग करू शकता.

६. आपल्या मित्रांबरोबर तुम्ही उभारणीकारक पद्धतीने वेळ घालवण्याची कशाप्रकारे योजना करू शकता?

६ मंडळीतील तुमच्या मित्रांना तुम्ही घरी बोलवू इच्छिता का? यहोवाच्या अधिकाराचा आदर करा (इंग्रजी) हा व्हिडिओ तुम्ही एकत्र पाहू शकता. व्हिडिओत शिकलेल्या धड्यांची उजळणी करायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही संध्याकाळी आमची राज्य सेवा सप्टेंबर २००४ अंकातील प्रश्‍नांचा उपयोग करून उभारणीकारक चर्चा करू शकता.

७. कोणकोणत्या संधीला तुम्ही आपल्या व्हिडिओंचा उपयोग करण्याचा विचार करू शकता?

७ इतर संधी: इतर कोणत्या मार्गांनी आपण आपल्याजवळ असलेल्या २० विविध व्हिडिओंचा उपयोग करू शकतो? तुम्ही नियमितरीत्या जिला पुनर्भेट देता अशा व्यक्‍तीला एक अथवा दोन व्हिडिओ दाखवल्याने तिला आध्यात्मिक प्रगती करण्यास मदत मिळू शकेल का? स्थानीय नर्सिंग होममध्ये अथवा ज्येष्ठ नागरीकांसाठी असलेल्या केंद्रांत तुम्ही व्हिडिओ दाखवू शकाल का? आपले व्हिडिओ दाखवून तुम्ही साक्षीदार नसलेल्या तुमच्या नातेवाईकांचा, शेजाऱ्‍यांचा व तुमच्या सहकर्मचाऱ्‍यांचा आदर मिळवू शकाल का? आपले व्हिडिओ प्रभावी, बोधकारक आणि परिणामकारी दृश्‍य साधने आहेत. शिकवण्याकरता त्यांचा उपयोग करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा