वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ३/०६ पृ. ३-४
  • नियमन मंडळाकडून पत्र

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियमन मंडळाकडून पत्र
  • आमची राज्य सेवा—२००६
आमची राज्य सेवा—२००६
km ३/०६ पृ. ३-४

नियमन मंडळाकडून पत्र

“देव आपला पिता व प्रभु येशू ख्रिस्त ह्‍यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांति असो.” मंडळ्यांना पत्र लिहिताना पौल सहसा हीच सदिच्छा व्यक्‍त करून सुरुवात करत असे. आमचीही तुमच्यावतीने हीच सदिच्छा आहे.—इफिस. १:२.

ख्रिस्त येशूच्या खंडणी बलिदानाद्वारे यहोवाने दाखवलेल्या अपार कृपेबद्दल आपण त्याचे किती ऋणी आहोत! खंडणीमुळेच आपल्याला देवाची संमती मिळवून त्याची उपासना करणे शक्य झाले आहे. आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्याला कधीही हे साध्य करता आले नसते. आपण बायबलचा कितीही सखोल अभ्यास केला किंवा कितीही आवेशाने प्रचार कार्य किंवा इतर चांगली कार्ये केली, तरीसुद्धा हे शक्य नव्हते. पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन मिळण्याची आशा ही आपल्या प्रयत्नांच्या मोबदल्यात नव्हे, तर येशू ख्रिस्ताद्वारे यहोवाने अपरिपूर्ण व पापी मानवांबद्दल व्यक्‍त केलेल्या अपार कृपेमुळे आपल्याला मिळाली आहे.—रोम. ११:६.

पौलाने बांधवांना लिहिले: “आम्ही . . . विनंती करितो की, तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो: ‘अनुकूलसमयी मी तुझे ऐकले, व तारणाच्या दिवशी मी तुला साहाय्य केले.’ पाहा! आताच समय अनुकूल आहे. पाहा! आताच तारणाचा दिवस आहे.” पहिल्या शतकात जेरूसलेमच्या नाशाच्या आधीचा काळ हा एक “अनुकूल समय” होता. यहोवावर प्रेम करणाऱ्‍या प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना त्यावेळी आध्यात्मिक दृष्ट्या तारण मिळाले. यामुळे, सा.यु. ७० साली जेरूसलेमचा नाश होण्याआधी जे सर्व विश्‍वासू जन त्या शहरातून पळून गेले त्यांचे शारीरिक दृष्ट्याही तारण झाले.—२ करिंथ. ६:१, २.

आज आपणही एका ‘अनुकूल समयात,’ जगत आहोत; हा “तारणाचा दिवस” आहे. आज यहोवा ज्यांना आपले सेवक म्हणून स्वीकारतो व ज्यांचे आध्यात्मिक दृष्ट्या तारण होत आहे त्यांना ‘यहोवाच्या मोठ्या दिवशी’ शारीरिकदृष्ट्या तारण मिळण्याची आशा आहे. यहोवाचा तो मोठा दिवस आता अगदी जवळ आला आहे.—सफ. १:१४.

यहोवाचा दिवस जवळ आला आहे हे लक्षात घेता, आपल्यावर अतिशय महत्त्वाची एक जबाबदारी आहे. आपल्याला लोकांना यहोवाच्या येणाऱ्‍या दिवसाबद्दल धोक्याची सूचना द्यायची आहे आणि त्यासोबतच, प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांचे तारण व्हावे म्हणून यहोवाच्या अपार कृपेचा लाभ करून घेण्यास त्यांना साहाय्य करायचे आहे. पौलाला या महत्त्वाच्या जबाबदारीची जाणीव होती. त्याने लिहिले: “मी सुवार्ता सांगितली नाही तर माझी केवढी दुर्दशा होणार!” त्याच्या भावना पुढील शब्दांतूनही व्यक्‍त होतात: “ज्ञानी व अज्ञानी, ह्‍यांचा मी ऋणी आहे. ह्‍याप्रमाणे . . . सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.”—१ करिंथ. ९:१६; रोम. १:१४, १५.

लोकांना सूचना देण्याच्या या महत्त्वाच्या कार्याकडे आपण दुर्लक्ष केल्यास यहोवा आपल्याला याकरता जबाबदार धरेल. संदेष्टा यहेज्केलला यहोवाने काय म्हटले होते हे आपल्याला माहीतच आहे: “मानवपुत्रा, मी तुला इस्राएल घराण्यावर पहारेकरी नेमिले आहे, म्हणून तू माझ्या तोंडचे वचन ऐकून माझ्या वतीने त्यास बजावून सांग. तू खात्रीने मरशील असे मी पातक्यास म्हणालो असता तू जर त्यास बजाविले नाही व पातक्याने आपला कुमार्ग सोडून जगावे म्हणून तू त्यास बजावून सांगितले नाही, तर तो पातकी आपल्या दुष्टाईमुळे मरेल; पण त्याच्या रक्‍ताचा झाडा मी तुझ्या हातून घेईन.”—यहे. ३:१७, १८.

या शेवटल्या काळात जगणे सोपे नाही. कौटुंबिक व प्रापंचिक जबाबदाऱ्‍या, मंडळीच्या जबाबदाऱ्‍या तसेच प्रचार कार्य या सर्वांचा मेळ बसवणे निश्‍चितच कठीण आहे. याशिवाय, तुमच्यापैकी बऱ्‍याच जणांना आजारपण, निराशा, म्हातारपण व विरोध यांसारख्या समस्यांनाही तोंड द्यावे लागते. तुमच्यापैकी बहुतेकजण “भाराक्रांत” आहेत. “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन,” या येशूच्या शब्दांनुसार, आम्हीही तुमच्याविषयी सहानुभूती व्यक्‍त करतो. (मत्त. ११:२८) जीवनातल्या लहानमोठ्या आव्हानांना तोंड देऊन विश्‍वासूपणे यहोवाच्या सेवेत टिकून राहण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या तुम्हा सर्वांची आम्ही मनापासून प्रशंसा करतो.

प्रचाराच्या व बायबल अभ्यास चालवण्याच्या कार्यात तुमच्या आवेशी योगदानामुळे व यहोवाच्या आशीर्वादामुळे सबंध जगात दर आठवडी ४,७६२ लोक बाप्तिस्मा घेत आहेत. मागील सेवा वर्षादरम्यान, १,३७५ नव्या मंडळ्या सुरू करण्यात आल्या. १२० भाषांत उपलब्ध असलेले, बायबल नेमके काय शिकवते? हे नवे पुस्तक आणखी लाखो लोकांना या ‘तारणाच्या दिवशी’ यहोवाकडून मिळणाऱ्‍या अपार कृपेचा व शांतीचा लाभ करून घेण्यास मदत करील अशी आम्ही आशा व प्रार्थना करतो.

शेवटी हेच सांगू इच्छितो, की तुम्ही सर्वजण आम्हाला प्रिय आहात व तुमच्याकरता आम्ही सदोदीत प्रार्थना करत असतो. तसेच, आमच्यासाठी केलेल्या तुमच्या प्रार्थनांबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानतो.

आपले बंधू,

यहोवाच्या साक्षीदारांचे नियमन मंडळ

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा