मंडळीचा पुस्तक अभ्यास —आपल्याला त्याची गरज का आहे
१. मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेची सुरवात कशी झाली?
१ सन १८९५ मध्ये, बायबल विद्यार्थी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांना डॉन सर्कल्स फॉर बायबल स्टडी असे म्हटले जायचे. तेव्हा मिलेनियल डॉन या खंडांच्या आधारावर अभ्यास केला जायचा. नंतर या सभांना बायबल अभ्यासाचे बिरुयन मंडळ असे संबोधण्यात येऊ लागले. (प्रे. कृत्ये १७:११) बहुतेकदा, सर्वांसाठी सोयीस्कर असलेल्या एखाद्या संध्याकाळच्या वेळी एका खासगी घरात लहान संख्येत हा गट एकत्र यायचा. अशाप्रकारे मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची सुरवात झाली.
२. पुस्तक अभ्यासात, आपण ‘परस्परांना उत्तेजन’ कसे देऊ शकतो?
२ उत्तेजन आणि साहाय्य: पुस्तक अभ्यास गट मुद्दामहून लहान ठेवण्यात येत असल्यामुळे, उपस्थित असलेल्यांना उत्तरांद्वारे आपला विश्वास प्रकट करण्याच्या अनेक संधी मिळतात. यामुळे ‘परस्परांना विश्वासाच्या योगाने उभयतांस, . . . उत्तेजन प्राप्त’ होते.—रोम. १:१२.
३, ४. पुस्तक अभ्यास व्यवस्था आपल्याला, आपली सेवा पार पाडण्यास कशाप्रकारे मदत करते?
३ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीला न्याहाळण्यामुळे आपल्याला “सत्याचे वचन नीट” सांगण्यास मदत होईल. (२ तीम. २:१५) साहित्यातील शास्त्रवचनांवर ते कशाप्रकारे जोर देतात त्याची नोंद घ्या. उचित असल्यास, ते समाप्तीस बायबलचा उपयोग करून उजळणीद्वारे ज्याचा अभ्यास केला जात आहे त्या प्रकाशनातील मुख्य मुद्द्यांवर जोर देऊ शकतात. त्यांच्या उत्तम उदाहरणामुळे आपल्याला, ख्रिस्ती सेवेतील आपल्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करण्यास मदत मिळू शकेल.—१ करिंथ. ११:१.
४ आठवड्याचा धडा संचालित करण्याव्यतिरिक्त, पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक सुवार्तिक कामात पुढाकार घेतात. सेवा पर्यवेक्षकांसोबत ते क्षेत्र सेवेसाठी व्यावहारिक व्यवस्था करतात. सुवार्तेचा प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची आपली ख्रिस्ती जबाबदारी पार पाडण्यासाठी ते गटातील सर्वांना मदत करायचा प्रयत्न करतात.—मत्त. २८:१९, २०; १ करिंथ. ९:१६.
५. पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांद्वारे कोणते व्यक्तिगत साहाय्य दिले जाते?
५ पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांना गटातील सर्वांच्या आध्यात्मिक कल्याणाची काळजी आहे. मंडळीच्या सभा आणि क्षेत्र सेवेत इतरांबरोबर कार्य करण्याद्वारे ते ही काळजी व्यक्त करतात. ते बांधवांना त्यांच्या घरी जाऊन भेट देतात तेव्हाही त्यांना आध्यात्मिक उत्तेजन देतात. आध्यात्मिक साहाय्य हवे असते तेव्हा सर्वांना, बिनासंकोच पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांकडे जावेसे वाटले पाहिजे.—यश. ३२:१, २.
६. (अ) विशिष्ट देशांतील बांधवांना, लहान लहान गटांनी एकत्र आल्याने कशाप्रकारे मजबूती मिळाली आहे? (ब) तुम्हाला व्यक्तिगतरीत्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेचा फायदा कसा झाला आहे?
६ एकमेकांना मजबूत करा: देवाच्या लोकांच्या कार्यावर बंदी असलेल्या देशांत, बांधव सहसा लहान लहान गटांनी एकत्र येतात. एका बांधवाने आठवून सांगितले: “आपल्या ख्रिस्ती कार्यांवर बंदी होती तरी देखील आम्ही शक्य तेव्हा १० ते १५ जणांच्या गटात आमच्या सप्ताहाच्या सभा भरवल्या. या सभांद्वारे, बायबलचा अभ्यास आणि बांधवांबरोबरचा सहवास या दोन्हीद्वारे आम्हाला आध्यात्मिक शक्ती मिळाली. आम्ही आमच्या अनुभवांची तुलना करायचो तेव्हा प्रत्येकाला एकाच प्रकारच्या संघर्षाचा सामना करावा लागतोय हे आम्ही समजू शकलो.” (१ पेत्र ५:९) तेव्हा आपण, मंडळीच्या पुस्तक अभ्यास व्यवस्थेला पाठिंबा देऊन एकमेकांना मजबूत करू या.—इफिस. ४:१६.