वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०४ पृ. १
  • यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करा
  • आमची राज्य सेवा—२००४
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा—खऱ्‍या न्यायाचा आणि धार्मिकतेचा स्रोत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००४
km ७/०४ पृ. १

यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करा

१ “परमेश्‍वराला न्याय प्रिय आहे.” (स्तो. ३७:२८) यास्तव, या अधार्मिक जगाचा नाश होवो, असा त्याने हुकूम दिलेला असला तरी, या नाशाविषयीचा इशारा देण्याची त्याने व्यवस्था केली आहे. (मार्क १३:१०) यामुळे लोकांना पश्‍चात्ताप करून आपले जीव वाचवण्याची संधी मिळते. (२ पेत्र ३:९) आपण यहोवाच्या न्यायाचे अनुकरण करण्यास झटतो का? मानवी कुटुंबातील दुःख आणि हालअपेष्टा पाहून आपण त्यांना राज्याच्या आशेविषयी सांगायला प्रवृत्त होतो का? (नीति. ३:२७) न्यायाबद्दलचे प्रेम आपल्याला प्रचार कार्यात सक्रिय भाग घेण्यास प्रवृत्त करेल.

२ निःपक्षपातीपणे प्रचार करणे: देवाच्या उद्देशांची घोषणा निःपक्षपातीपणे केल्याने आपण ‘नीतीने वागतो.’ (मीखा ६:८) लोकांच्या बाह्‍यस्वरूपावरून त्यांच्याबद्दल मत बनवण्याची अपरिपूर्ण प्रवृत्ती आपण टाळली पाहिजे. (याको. २:१-४, ९) यहोवाची “इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीम. २:४) देवाच्या सत्य वचनात, लोकांच्या जीवनात विलक्षण बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. (इब्री ४:१२) हे समजल्याने, लोकांनी पूर्वी आपला संदेश ऐकण्यास नकार दिलेला असला तरी, त्यांच्याकडे पूर्ण भरवशाने जाण्यास आपण प्रवृत्त होऊ.

३ एका दुकानात काम करणाऱ्‍या भगिनीला, दुकानात नेहमी येणाऱ्‍या एका गिऱ्‍हाईकाची वेशभूषा आणि केशभूषा पाहून भीती वाटायची. तरीपण, एका उचित प्रसंगी तिने त्याला देवाने अभिवचन दिलेल्या परादीसविषयी साक्ष देण्याचा प्रयत्न केला. त्याने तिला सडेतोडपणे म्हटले, मी भाकड कथांवर विश्‍वास ठेवत नाही आणि मी एक हिप्पी आहे व मला मादक पदार्थ्यांचे व्यसन आहे. तरीसुद्धा तिने हार मानली नाही. एके दिवशी त्याने तिला त्याच्या लांब केसांविषयी विचारले तेव्हा तिने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून उत्तर दिले आणि बायबल याविषयी काय म्हणते ते सांगितले. (१ करिंथ. ११:१४) दुसऱ्‍या दिवशी त्याला दाढी केलेली, केस बारीक कापल्याचे पाहून तिला खूप आश्‍चर्य वाटले! त्याने तिला बायबल अभ्यासाविषयी विचारले; तिने एका बांधवाला त्याच्याकडे पाठवण्याची सोय केली आणि या मनुष्याने समर्पण व बाप्तिस्मा घेण्याप्रत प्रगती केली. या मनुष्याप्रमाणे आज यहोवाची सेवा करणारे पुष्कळ जण, पक्षपाती भावना न बाळगता ज्यांनी त्यांना राज्य संदेश सांगितला होता त्यांचे आभार मानतात.

४ यहोवा लवकरच या पृथ्वीवरून अधार्मिकता काढून टाकणार आहे. (२ पेत्र ३:१०, १३) तेव्हा उरलेल्या सीमित काळात आपण, सर्व लोकांना सैतानाच्या अभक्‍त जगाच्या नाशातून वाचण्याची संधी देण्याद्वारे यहोवाच्या न्यायीपणाचे अनुकरण करू या.—१ योहा. २:१७.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा