मासिके कशी सादर कराल
टेहळणी बुरूज मे १५
“तुम्ही कधी विचार केला आहे का, की पृथ्वीवरील मानवांच्या कार्यांचा देवावर काही प्रभाव पडतो? [उत्तर ऐका.] आपल्या कार्यांमुळे देवाच्या भावनांवर कसा परिणाम होतो ते पाहा. [नीतिसूत्रे २७:११ वाचा.] या नियतकालिकात अशा काही लोकांची उदाहरणे दिली आहेत ज्यांनी देवाचं मन आनंदित केलं व आपणही असं कसं करू शकतो तेही यात सांगितलं आहे.”
सावध राहा! एप्रि.-जून
“आई आणि वडील या दोघांचं मुलांवर प्रेम असलं तरी, मुलांची काळजी घेणं सहसा आईवर टाकलं जातं. मुलांचं संगोपन करण्यात वडिलांची काय भूमिका आहे असं तुम्हाला वाटतं? [उत्तर ऐका.] या नियतकालिकात, आईवडील मिळून मुलांच्या गरजा उत्तमप्रकारे कशा पूर्ण करू शकतील ते सांगितलं आहे.”
टेहळणी बुरूज जून १
“देवाची उपासना करायला, कोणत्याही संघटित धर्माशी संलग्न असण्याची काही गरज नाही, असं काही लोकांना वाटतं. यावर तुम्ही कधी विचार केला आहे का? [उत्तर ऐका.] या नियतकालिकात, गतकाळात देवानं लोकांबरोबर केलेल्या व्यवहाराच्या अहवालाचे परीक्षण करण्यात आले आहे. खरेपणानं देवाची उपासना करण्याचा काय अर्थ होतो, हेही या नियतकालिकात सांगितलं आहे.” योहान ४:२४ वाचा.
सावध राहा! एप्रि.-जून
“आपलं काम पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नाही, असं पुष्कळ लोकांना वाटतं. तुमच्या बाबतीत हे खरं आहे का? [उत्तर ऐका. मग पृष्ठ २१ वरील हा लेख काढा.] सावध राहा! याच्या या अंकात, आपल्या जवळ असलेल्या वेळेचा पुरेपूर फायदा कसा घ्यावा याबाबतीत व्यावहारिक सूचना दिल्या आहेत.”