वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०२ पृ. १
  • राज्य संदेशाची घोषणा करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्य संदेशाची घोषणा करा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • “अविनाशी” राज्य
    उपासनेतील ऐक्य
  • देवाचे राज्य आधिपत्य गाजवते
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • देवाचे राज्य काय आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १२/०२ पृ. १

राज्य संदेशाची घोषणा करा

१ “मला इतर गावीहि देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.” (लूक ४:४३) या शब्दांनी येशूने देवाचे राज्य, हा आपल्या सेवेचा विषय असल्याचे सांगितले. आजही आपण घोषणा करीत असलेला संदेश राज्यावरच केंद्रित आहे; मत्तय २४:१४ मध्ये त्याविषयी असे भाकीत करण्यात आले आहे: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” देवाच्या राज्याविषयीची कोणती सत्ये लोकांना माहीत असली पाहिजेत?

२ देवाचे राज्य सध्या स्वर्गातून राज्य करीत आहे आणि लवकरच सर्व मानवी शासनांच्या ऐवजी राज्य करणार आहे. दियाबलाची तर स्वर्गातून हाकलपट्टी केव्हाच झाली आहे आणि सध्याचे दुष्ट व्यवस्थीकरण शेवटल्या टप्प्यात येऊन पोहंचले आहे. (प्रक. १२:१०, १२) सैतानाच्या या दुष्ट जुन्या व्यवस्थीकरणाचा नाश केला जाईल परंतु देवाचे राज्य स्थिर राहील. ते सदासर्वदा राहील.—दानी. २:४४; इब्री १२:२८.

३ हे राज्य, सर्व आज्ञाधारक मानवांच्या उचित इच्छा पूर्ण करील. युद्ध, गुन्हेगारी, जुलूम आणि दारिद्र्‌य यांमुळे होणाऱ्‍या दुःखापासून ते सर्वांची सुटका करील. (स्तो. ४६:८, ९; ७२:१२-१४) सर्वांसाठी विपुल अन्‍न असेल. (स्तो. ७२:१६; यश. २५:६) आजारपण आणि अपंगत्व या गोष्टी इतिहासजमा होतील. (यश. ३३:२४; ३५:५, ६) मानव जसजसा परिपूर्णतेकडे वाटचाल करील तसतसे पृथ्वीचे परादीसमध्ये रूपांतर होईल आणि सर्व लोक एकजुटीने राहतील.—यश. ११:६-९.

४ सध्या आपल्या जीवनशैलीवरून आपण दाखवून देतो की आपल्याला देवाच्या राज्याची प्रजा व्हायचे आहे. राज्य संदेशाचा आपल्या संपूर्ण जीवनशैलीवर तसेच आपली ध्येये आणि प्राधान्यता यांच्यावर प्रभाव पडला पाहिजे. उदाहरणार्थ, आपल्या घराण्याची तरतूद करण्याची आपली जबाबदारी असली तरीसुद्धा, आपण भौतिक गोष्टींच्या चिंतांमुळे इतके दबून जात नाही की राज्याच्या संबंधाने असलेल्या गोष्टी करायला आपल्याला वेळ मिळत नाही. (मत्त. १३:२२; १ तीम. ५:८) उलट, आपण येशूच्या या सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.”—मत्त. ६:३३.

५ वेळ आहे तोपर्यंत लोकांनी राज्य संदेश ऐकून त्यानुसार कार्य करण्याची निकडीची गरज आहे. ‘देवाच्या राज्याविषयीचे . . . प्रमाण पटवून’ आपण त्यांना संदेश ऐकण्यास मदत करू या.—प्रे. कृत्ये १९:८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा