वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km १२/०२ पृ. १
  • विश्‍वासू वयोवृद्धांची आठवण ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासू वयोवृद्धांची आठवण ठेवा
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा आपल्या वयोवृद्ध सेवकांची प्रेमाने काळजी घेतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • आपले वयस्कर भाऊबहीण अनमोल रत्नांसारखे आहेत!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • म्हातारपणातही आनंद टिकवून ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • अनिष्ट दिवस येण्याआधी यहोवाची सेवा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km १२/०२ पृ. १

विश्‍वासू वयोवृद्धांची आठवण ठेवा

१ हन्‍ना ८४ वर्षांची विधवा व वयोवृद्धा होती, तरीसुद्धा ती “मंदिर सोडून” कधीही गेली नाही. तिचा विश्‍वासूपणा पाहून यहोवाने तिला एक खास आशीर्वाद दिला. (लूक २:३६-३८) आज, अनेक बंधूभगिनी कठीण परिस्थितीला तोंड देऊनही हन्‍नासारखी मनोवृत्ती दाखवतात. हे विश्‍वासू लोक आरोग्याच्या समस्या किंवा वाढत्या वयोमानामुळे येणाऱ्‍या मर्यादा यांमुळे कधीकधी निराश होतील. अशांना उत्तेजन देऊन चांगला आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवण्यास मदत करण्याकरता आपण काही व्यावहारिक मार्गांचा विचार करू या.

२ सभा आणि क्षेत्र सेवा: मंडळीतल्या कोणी या बंधूभगिनींची जाण्या-येण्याची व्यवस्था केली तर पुष्कळ वृद्ध जनांना ख्रिस्ती सभांना नियमितरीत्या उपस्थित राहता येईल. यामुळे अनेक वर्षांपासून सेवा करत आलेल्या या विश्‍वासू सेवकांची आध्यात्मिकता आणखी मजबूत होते आणि मंडळीला सुद्धा त्यांचा फायदा होतो. तुम्हाला हे उत्तम कार्य करण्याची संधी मिळाली आहे का?—इब्री १३:१६.

३ सेवेमध्ये नियमितरीत्या भाग घेतल्याने खऱ्‍या ख्रिश्‍चनांना आनंद व समाधान मिळते. परंतु वृद्ध किंवा वयोमानामुळे अशक्‍त झालेल्यांना कदाचित सेवेत जाता येत नसेल. या प्रिय जनांपैकी एकाला तुम्ही आपले “सहकारी” म्हणून साक्षकार्याच्या कोणत्याही कार्यात सोबत घेऊन जाऊ शकता का? (रोम. १६:३, ९, २१) तुम्ही कदाचित त्यांना टेलिफोनद्वारे साक्षकार्य करताना किंवा पुनर्भेटीला अथवा बायबल अभ्यासाला जाताना सोबत नेऊ शकता. ही वृद्ध व्यक्‍ती घरातून बाहेर पडू शकत नसेल तर एखादा बायबल विद्यार्थी त्यांच्या घरी येऊन अभ्यास करू शकेल का?

४ अभ्यास आणि सहवास: काही जण अधूनमधून एखाद्या वृद्ध किंवा आजारी बंधूभगिनीला आपल्या कौटुंबिक बायबल अभ्यासासाठी घरी बोलवतात; किंवा त्यांच्या घरी जाऊन कौटुंबिक अभ्यास करतात. एका आईने आपल्या दोन मुलांचा बायबल कथांचं माझं पुस्तक या पुस्तकाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना एका वृद्ध भगिनीच्या घरी नेले; यामुळे सर्वांना एकमेकांकडून उत्तेजन प्राप्त झाले. वृद्धांना घरी जेवायला किंवा इतर कोणत्याही सामाजिक प्रसंगासाठी घरी बोलवल्यास त्यांना आनंद वाटेल. अशांना दीर्घकाळासाठी घराबाहेर पडता येत नसेल तर तुम्ही त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटू शकता, काही तरी वाचून दाखवू शकता, त्यांच्याबरोबर प्रार्थना करू शकता किंवा एखादा उभारणीकारक अनुभव त्यांना सांगू शकता.—रोम. १:११, १२.

५ यहोवा, विश्‍वासू वृद्ध जनांना मौल्यवान समजतो. (इब्री ६:१०, ११) आपणही या लोकांना मौल्यवान समजून, त्यांना चांगला आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवण्यास मदत करण्याद्वारे यहोवाचे अनुकरण करू शकतो.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा