वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wp20 क्र. १ पृ. १२-१३
  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • येशूने देवाच्या राज्याविषयी काय शिकवले?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१०
  • देवाच्या राज्याविषयी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • देवाचे राज्य आधिपत्य गाजवते
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • देवाचे राज्य म्हणजे काय?
    देव आपल्याकडून काय अपेक्षितो
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
wp20 क्र. १ पृ. १२-१३
पृथ्वीवर सूर्यकिरणं पडत असतानाचं अंतरिक्षातलं एक दृश्‍य

देवाच्या सरकाराबद्दल अचूक माहिती

येशूने आपल्या शिष्यांना अशी प्रार्थना करायला शिकवलं: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो. तुझं राज्य येवो. तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण होत आहे, तशी पृथ्वीवरही होवो.” (मत्तय ६:९, १०) देवाचं सरकार किंवा राज्य काय आहे? ते कोणकोणत्या गोष्टी साध्य करेल? आपण त्याबद्दल प्रार्थना का केली पाहिजे?

येशू हा देवाच्या सरकारचा राजा आहे.

लूक १:३१-३३: “तू त्याचे नाव येशू ठेव. तो महान होईल आणि त्याला सर्वोच्च देवाचा पुत्र म्हणतील आणि यहोवा त्याला त्याच्या पित्याचे अर्थात दावीदचे सिंहासन देईल, आणि राजा या नात्याने तो याकोबच्या घराण्यावर सदासर्वकाळ राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा कधीच अंत होणार नाही.”

देवाचं सरकार हा येशूच्या प्रचाराचा मुख्य विषय होता.

मत्तय ९:३५: “येशू सभास्थानांत शिकवत, देवाच्या राज्याविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करत आणि सर्व प्रकारचे रोग व दुखणी बरी करत सर्व नगरांतून व गावांतून फिरला.”

देवाचं सरकार कधी स्थापित होणार हे ओळखण्यासाठी येशूने आपल्या शिष्यांना काही चिन्हं दिली.

मत्तय २४:७: “कारण एका राष्ट्रावर दुसरं राष्ट्र आणि एका राज्यावर दुसरं राज्य हल्ला करेल, आणि ठिकठिकाणी दुष्काळ पडतील व भूकंप होतील.”

येशूचे शिष्य आज देवाच्या सरकाराबद्दल जगभरात लोकांना सांगत आहेत.

मत्तय २४:१४: “आणि सर्व राष्ट्रांना साक्ष मिळावी म्हणून राज्याचा हा आनंदाचा संदेश सर्व जगात घोषित केला जाईल, आणि त्यानंतर अंत येईल.”

देवाच्या सरकाराविषयी अचूक माहिती

ते कुठे असेल? देवाचं सरकार हे एक असं खरंखुरं सरकार आहे जे देवाने स्वर्गात स्थापित केलं आहे.—दानीएल २:४४; मत्तय ४:१७.

त्याचा उद्देश काय असेल? देवाचं सरकार या पृथ्वीला एका सुंदर बागेसारखं बनवेल. त्यावर सर्व मानव शांती आणि एकतेत राहतील. ते कधीच आजारी पडणार नाहीत किंवा मरणार नाहीत.—स्तोत्र ३७:११, २९.

त्याचे शासक कोण असतील? देवाने येशूला राजा म्हणून आणि त्याच्यासोबत १,४४,००० जणांना सहराजे म्हणून नेमलं आहे. हे सहराजे पृथ्वीवरून घेण्यात आले आहेत. ते सर्व स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करतील.—लूक १:३०-३३; १२:३२; प्रकटीकरण १४:१, ३.

त्याची प्रजा कोण असेल? देवाच्या सरकारने ठरवलेले नियम जे स्वखुशीने पाळतील आणि येशूच्या अधीन राहतील असे लोक या पृथ्वीवर राहतील.—मत्तय ७:२१.

मानवजातीवर राज्य करण्यासाठी येशूचीच निवड का योग्य आहे?

पृथ्वीवर असताना येशूने दाखवून दिलं की तो एक निपुण आणि प्रेमळ राजा आहे. कारण,

  • तो गरीबांशी दयाळूपणे वागला.—लूक १४:१३, १४.

  • तो भ्रष्टाचार आणि अन्यायाचा द्वेष करायचा.—मत्तय २१:१२, १३.

  • नैसर्गिक शक्‍ती त्याच्या नियंत्रणात होत्या.—मार्क ४:३९.

  • त्याने हजारो लोकांना जेवू घातलं.—मत्तय १४:१९-२१.

  • त्याला आजारी लोकांची दया आली आणि त्याने त्या सर्वांना बरं केलं.—मत्तय ८:१६.

  • त्याने मरण पावलेल्या लोकांना जिवंत केलं.—योहान ११:४३, ४४.

देवाच्या सरकारामुळे तुम्हाला आज कसा फायदा होऊ शकतो?

तुम्ही देवाच्या सरकारची प्रजा बनला तर तुम्हाला आज एक आनंदी जीवन जगता येईल. उदाहरणार्थ, देवाच्या सरकारच्या अधीन असलेले लोक आज,

  • सर्वांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करतात.—इब्री लोकांना १२:१४.

  • कुटुंबात शांती आणि एकता अनुभवतात कारण पती-पत्नी एकमेकांशी प्रेमाने वागतात आणि एकमेकांचा आदर करतात.—इफिसकर ५:२२, २३, ३३.

  • आनंदी आणि समाधानी जीवन जगतात कारण ते “देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे वागतात.”—लूक ११:२८.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा