वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ११/०२ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००२
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००२
km ११/०२ पृ. ८

मासिके कशी सादर कराल?

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“असे दिसते की पुष्कळ लोकांना पोलिस आवडत नाहीत, पण पोलिस नसते तर देशाची काय अवस्था झाली असती याचा तुम्ही कधी विचार केला का? [उत्तरासाठी थांबा.] सध्यातरी पोलिसांची अत्यंत गरज आहे परंतु असा एक काळ फार लवकर येणार आहे जेव्हा कोणालाच त्यांची गरज भासणार नाही; का भासणार नाही त्याचे कारण या वचनात दिले आहे ते पाहा. [२ पेत्र ३:१३ वाचा.] हिंसा नसलेल्या जगाविषयी तुम्हाला आणखी माहिती वाचायची असेल तर तुम्हाला सावध राहा! चा हा अंक वाचायला आवडेल.”

टेहळणी बुरूज नोव्हें. १५

“काहींना प्रश्‍न पडतो, की देवाची उपासना करण्यासाठी आपल्याला चर्च किंवा मंदिराची आवश्‍यकता आहे का. तुम्हाला काय वाटते? [उत्तरासाठी थांबा.] बायबल या विषयावर काय म्हणते ते पाहा. [प्रेषितांची कृत्ये १७:२४ वाचा.] तेव्हा उपासना स्थळांचा काय उद्देश असला पाहिजे? या मासिकात या प्रश्‍नाचे शास्त्रवचनांवर आधारित उत्तर देण्यात आले आहे.”

सावध राहा! ऑक्टो.-डिसें.

“आज पुष्कळ लोक कार आणि स्कूटर विकत घेत आहेत, पण जीवघेणे अपघात देखील वाढत चालले आहेत. अपघात टाळता येऊ शकतात का? [उत्तरासाठी थांबा.] संकटापासून कोणीही स्वतःला वाचवू शकत नाही, हे बायबल कबूल करते. [वाचा उपदेशक ९:११. नियतकालिकाचे पृष्ठ २२ दाखवा.] पण कोणतीही गाडी चालवताना तुम्ही सुरक्षित कसे राहू शकता हे सावध राहा! च्या या अंकात सांगितले आहे.”

टेहळणी बुरूज डिसें. १

“आजकाल, बहुतेक सर्वांनाच आर्थिक तंगी जाणवते. चर्चेसच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे आणि लोकांना देणग्यांसाठी वारंवार विनंती केली जाते. हे ऐकून तुम्हाला दुःख वाटते का? [उत्तरासाठी थांबा. मग १ थेस्सलनीकाकर २:९ वाचा.] बायबल याविषयी काय म्हणते ते या टेहळणी बुरूज नियतकालिकात सांगितले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा