तुम्हाला आणखी भाग घ्यायची इच्छा आहे का?
१ येशूने राज्याची तुलना अमूल्य ठेवीशी केली. (मत्त. १३:४४-४६) राज्य सुवार्तेचा प्रसार करण्याचे काम देखील मौल्यवान ठेवीसारखेच आहे. या सेवेत पूर्ण भाग घेताना आपल्याला पुष्कळ प्रमाणात आत्म-त्याग करावा लागला तरीसुद्धा ती आपल्या जीवनात प्राधान्य देण्याजोगी आहे. (मत्त. ६:१९-२१) राज्य सेवेत तुम्हाला आणखी भाग घ्यायची इच्छा आहे का?
२ विचारात घेण्याजोगे महत्त्वपूर्ण मुद्दे: सेवेमध्ये आपला सहभाग वाढवण्यासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता आहे: (१) आपल्या जीवनात राज्याला प्रथम स्थान देण्याचा निश्चय करणे (मत्त. ६:३३); (२) यहोवावर विश्वास ठेवून त्याच्यावर पूर्णपणे विसंबून राहणे (२ करिंथ. ४:१, ७); (३) मनःपूर्वक व निरंतर प्रार्थना करून देवाची मदत घेणे (लूक ११:८-१०); (४) प्रार्थना करीत राहणे व प्रार्थनांच्या सामंजस्यात वागणे.—याको. २:१४, १७.
३ आपली सेवा वाढवण्याचे मार्ग: सर्वप्रथम आपण सर्वजण, दर महिन्याला नियमितरीत्या ठराविक वेळ सेवेत घालवण्याचे ध्येय ठेवू शकतो. पण या व्यतिरिक्त तुम्ही, अनौपचारिकरीत्या साक्ष देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्याचा, तुमच्या सादरता आणखी अर्थपूर्ण करण्याचा, तुमच्या पुनर्भेटींचा प्रभावीपणा वाढवण्याचा आणि प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करण्याचा विचार केला आहे का? तुम्ही सहायक पायनियरींग अथवा सामान्य पायनियरींग करू शकाल का? किंवा, अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करू शकाल का? तुम्ही बाप्तिस्मा घेतलेले बांधव असाल तर सेवा सेवक अथवा वडील होण्यास लायक बनण्याचा प्रयत्न करीत आहात का? (१ तीम. ३:१, १०) सेवा प्रशिक्षण शाळेसाठी आपले नाव देऊन तुम्ही तुमची सेवा आणखी वाढवू शकाल का?—लूक १०:२.
४ पूर्ण वेळची नोकरी असलेला व आपला बहुतेक वेळ खेळांत घालवणाऱ्या एका बांधवाला सामान्य पायनियर होण्याचे उत्तेजन देण्यात आले. त्याने आधी सहायक पायनियरींग सुरू केली आणि मग पूर्ण वेळेच्या सेवत प्रवेश करण्याकरता आपल्या परिस्थितीत काही फेरबदल केले. नंतर तो सेवा प्रशिक्षण शाळेतही दाखल झाला ज्यामुळे तो, सध्या विभागीय पर्यवेक्षकाची जी नेमणूक करत आहे त्या नेमणुकीसाठी स्वतःला तयार करू शकला. मिळालेल्या उत्तेजनाचा त्याने स्वीकार केल्याबद्दल आता तो खूप आनंदी आहे. आणि, राज्य सेवेत आणखी सहभाग घेण्याचा त्याने जो निर्णय घेतला त्यामुळे तो पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आहे याची त्याला खात्री आहे.
५ यहोवाची सेवा करण्याकरता जे स्वतःहून पुढे येतात अशांवर त्याचा आशीर्वाद असतो. (यश. ६:८) तेव्हा, तुम्हालाही जमत असेल तर आपली सेवा वाढवण्यापासून स्वतःला आवर घालू नका; आणि अशाप्रकारे सेवा वाढवल्यावर तुम्हाला देखील पूर्वीपेक्षा अधिक समाधान व तजेला मिळेल.