वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ८/०७ पृ. ६-७
  • नवीन सेवा वर्षाचे प्रशंसनीय ध्येय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नवीन सेवा वर्षाचे प्रशंसनीय ध्येय
  • आमची राज्य सेवा—२००७
  • मिळती जुळती माहिती
  • पाहिजेत—४,००० सहायक पायनियर तुम्ही मार्च, एप्रिल वा मे महिन्यांत सहायक पायनियरींग करू शकाल का?
    आमची राज्य सेवा—१९९७
  • सर्वदूर यहोवाचे गुण प्रसिद्ध करा
    आमची राज्य सेवा—२००७
  • तुम्हाला साहाय्यक पायनियरींग करता येईल का?
    आमची राज्य सेवा—१९९२
  • आपण पुन्हा करणार का?—सहायक पायनियरांसाठी आणखीन एक आवाहन
    आमची राज्य सेवा—१९९८
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००७
km ८/०७ पृ. ६-७

नवीन सेवा वर्षाचे प्रशंसनीय ध्येय

१. पुढील नवीन सेवा वर्षासाठी आपण कोणते ध्येय ठेवण्याचा विचार करू शकतो?

१ आपल्याला आध्यात्मिक प्रगती करायची आहे तर आपण ध्येये ठेवली पाहिजेत. नवीन सेवा वर्षासाठी तुम्ही कोणती वैयक्‍तिक ध्येये ठेवली आहेत? एक सर्वोत्कृष्ट ध्येय म्हणजे, एक अथवा अधिक महिन्यांसाठी सहायक पायनियरींग करणे. सहायक पायनियरींग एक असे कार्य आहे ज्यातून आनंद मिळतो; पण त्याआधी पूर्वतयारी करण्याची गरज आहे आणि पूर्वतयारी करण्याची आताच वेळ आहे. पण सहायक पायनियरींग करण्याचे ध्येय का ठेवावे?

२. सहायक पायनियरींग करण्याचे ध्येय का ठेवावे?

२ सहायक पायनियरींग करण्याची कारणे: सहायक पायनियरींगमुळे आपण सेवेमध्ये अधिक वेळ खर्च करून आपल्या स्वर्गीय पित्याला आणखी ‘संतोषवू’ शकतो. (१ थेस्सलनी. ४:१) यहोवाने आपल्यासाठी काय काय केले आहे यावर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याच्याविषयी इतरांना सांगण्यास आपण प्रवृत्त होतो. (स्तो. ३४:१, २) सेवेमध्ये अधिक भाग घेण्याकरता आपण करत असलेल्या व्यक्‍तिगत त्यागांची यहोवा दखल घेतो आणि त्याला याचे कौतुक वाटते. (इब्री ६:१०) ख्रिस्ती सेवेत आपण घेत असलेले परिश्रम पाहून यहोवाला संतोष होतो, या जाणीवेने आपण हर्षित होतो.—१ इति. २९:९.

३, ४. सहायक पायनियरींगमधून आपण लाभ कसा मिळवू शकतो?

३ सहसा, जी गोष्ट तुम्ही वारंवार करता ती हळूहळू सोपी वाटू लागते आणि ती करण्यातही मजा येते. सेवेमध्ये जास्त वेळ खर्च केल्याने, प्रचार कार्यात लोकांशी बोलण्याचा तुमचा आत्मविश्‍वास वाढेल. तुम्ही संभाषण सुरू करण्यात व बायबलचा उपयोग करण्यात प्रावीण्य मिळवाल. तुम्ही तुमच्या विश्‍वासाची जितकी चर्चा कराल तितका तुमचा विश्‍वास भक्कम बनेल. ज्यांच्याकडे एकही बायबल अभ्यास नव्हता, त्यांना, सहायक पायनियरींग करत असल्यामुळे एक बायबल अभ्यास सुरू करता आला आहे.

४ सहायक पायनियरींग आपल्याला एकसूरीपणातून निघण्याचे प्रोत्साहन देऊ शकते. एक बांधव जो पूर्वी सामान्य पायनियर होता त्याला जाणवले, की तो त्याच्या नोकरीत खूप वेळ घालवत होता. त्यामुळे त्याने एक महिन्यासाठी सहायक पायनियरींग करायचे ठरवले. तो म्हणतो: “फक्‍त या एका महिन्यानेच माझ्यात पुन्हा किती आध्यात्मिक जोम आणला, याचेच मला आश्‍चर्य वाटते. मी नियमाने सहायक पायनियरींग करायचे ठरवले. यामुळे मी पुन्हा एकदा सामान्य पायनियर बनू शकलो.”

५. आपण पायनियरींग करण्यास असमर्थ आहोत अशा भावना आपल्या मनात असतील तर आपण यांच्यावर कशाप्रकारे मात करू शकतो?

५ अडखळणांवर मात करणे: आपण प्रचार करण्यात इतके तरबेज नाही, असा विचार करून काहीजण सहायक पायनियरींग करण्यास कांकू करतात. जर या कारणामुळे तुम्ही पायनियरींग करत नसाल तर यिर्मयाप्रमाणे तुम्ही देखील मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. (यिर्म. १:६-१०) मोशे “मुखाचा जड व जिभेचाहि जड” होता तरीपण यहोवाने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला. (निर्ग. ४:१०-१२) पायनियरींग करण्यास असमर्थ आहोत असे जर तुम्हाला वाटत असेल तर यहोवाकडे धैर्यासाठी विनंती करा.

६. आरोग्याच्या समस्या व कामाचा व्याप असूनही काहींना सहायक पायनियरींग करणे कसे शक्य होऊ शकते?

६ तुमच्या तब्येतीमुळे किंवा कामाच्या व्यापामुळे तुम्ही पायनियरींगचा फॉर्म भरायला कचरत आहात का? तुम्हाला जर आरोग्याच्या समस्या असतील तर, जमेल तसे क्षेत्र सेवेत गेल्याने तुम्ही सहायक पायनियरींग करू शकाल. तुम्हाला कामाचा व्याप असेल तर, काही कामे जी इतकी महत्त्वाची नाहीत ती दुसऱ्‍या महिन्यात करण्याचे ठरवून तुम्ही पायनियरींग करू शकाल. काही जण जे आठ तासांची नोकरी करतात ते, एक अथवा दोन दिवसांची सुटी काढून सहायक पायनियरींग करू शकले आहेत.—कलस्सै. ४:५.

७. सहायक पायनियरींगविषयी प्रार्थना करणे योग्य का आहे?

७ कशी करायची सुरुवात: सहायक पायनियरींग करण्याविषयी प्रार्थना करा. तुमची सेवा वाढवण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना आशीर्वादित करण्यास यहोवाला विनंती करा. (रोम. १२:११, १२) तुमच्या आराखड्यात फेरबदल कसे करायचे याबाबतीत सुज्ञ निर्णय घेण्यास तो तुम्हाला मदत करू शकतो. (याको. १:५) तुमची पायनियरींग करण्याची इच्छा नसेल तर प्रचार कार्यात आनंद मिळावा म्हणून यहोवाला प्रार्थना करा.—लूक १०:१, १७.

८. नीतिसूत्रे १५:२२ चा अवलंब केल्यामुळे तुम्हाला सहायक पायनियरींग करायला मदत कशी मिळू शकेल?

८ सहायक पायनियरींगविषयी आपल्या कुटुंबात चर्चा करा. (नीति. १५:२२) घरातील एक सदस्य सहायक पायनियरींग करू शकतो व इतर सदस्य त्याला साथ देऊ शकतात. मंडळीतील इतरांशी खासकरून ज्यांची परिस्थिती तुमच्यासारखीच आहे अशांशी बोलून, सहायक पायनियरींग करण्याची आपली इच्छा व्यक्‍त करा. यामुळे सहायक पायनियरींगविषयी अनेकांमध्ये उत्साह निर्माण होऊ शकतो.

९. सहायक पायनियरींगसाठी तुम्ही कोणते महिने निवडू शकता?

९ नवीन सेवा वर्षाच्या ईश्‍वरशासित कॅलेंडरची पाहणी केल्यावर, तुम्हाला सहायक पायनियरींग करायला केव्हा जमेल? तुम्ही जर आठ तासांची नोकरी करत असाल किंवा शाळेत जाणारे असाल तर तुम्ही कदाचित सुटीचा काळ किंवा ज्या महिन्यात पाच शनिवार अथवा रविवार येतात तो महिना सहायक पायनियरींगसाठी निवडाल. जसे की, सप्टेंबर, डिसेंबर, मार्च व ऑगस्ट या महिन्यांमध्ये पाच शनिवार व रविवार येतात. मे महिन्यात पाच शनिवार आहेत आणि जून महिन्यात पाच रविवार आहेत. तुमची तब्येत बरी नसल्यास, ज्या महिन्यात चांगले हवामान असते तो महिना तुम्ही सहायक पायनियरींगसाठी निवडू शकता. ज्या महिन्यात तुमच्या मंडळीत प्रवासी पर्यवेक्षक भेट द्यायला येणार आहेत तो महिना कदाचित तुम्ही निवडू शकता. प्रवासी पर्यवेक्षकांच्या भेटीत तुम्हाला, सामान्य पायनियरांबरोबर असलेल्या सभेच्या पहिल्या अर्ध्या भागास उपस्थित राहण्याचा सुहक्क मिळू शकेल. पुढच्या वर्षी स्मारक विधी मार्च २२ तारखेला येत असल्यामुळे, मार्च, एप्रिल व मे हे सहायक पायनियरींगसाठी उत्तम महिने आहेत. तुम्ही एक अथवा अनेक महिन्यांसाठी पायनियरींग करण्याचे ठरवल्यावर, तास भरण्याकरता एक आराखडा बनवण्यास सुरुवात करा.

१०. तुम्हाला सहायक पायनियरींग करणे शक्य नसेल तर काय करता येऊ शकते?

१० येत्या सेवा वर्षांत तुम्हाला सहायक पायनियरींग करायला जमणार नाही असे तुम्हाला वाटत असले तरी, तुम्ही तुमच्यातला पायनियर आत्मा कायम ठेवू शकता. तुम्हाला होता होईल तितके सेवेत भाग घ्यायचा प्रयत्न करीत राहा. यहोवासाठी तुमच्यापरीने होईल तितका प्रयत्न करीत आहात, याने तो संतुष्ट होतो, ही खात्री तुम्ही बाळगू शकता. (गलती. ६:४) जे सहायक पायनियरींग करतात त्या सर्वांना साथ व प्रोत्साहन द्या. कदाचित जे पायनियरींग करतात अशांबरोबर आठवड्यातला एक दिवस तुम्ही सेवेमध्ये भाग घेण्याकरता आपल्या व्यक्‍तिगत आराखड्यात काही फेरबदल करू शकता.

११. आपण कोणत्या काळात जगत आहोत याची आपण जाणीव का बाळगली पाहिजे?

११ यहोवाच्या लोकांना, आपण कोणत्या काळात जगत आहोत याची जाणीव आहे. सुवार्तेचा प्रचार करण्याचे मोठे काम बाकी आहे. लोकांचे जीव धोक्यात आहेत व वेळ फार कमी आहे. (१ करिंथ. ७:२९-३१) देव आणि शेजाऱ्‍यांबद्दलचे प्रेम आपल्याला, सेवेमध्ये आपल्या परीने होता होईल तितका प्रयत्न करण्यास प्रवृत्त करेल. आपले प्रयत्न आणि चांगली योजना यांद्वारे आपण येत्या नवीन सेवा वर्षादरम्यान निदान एक महिन्यासाठी तरी का होईना सहायक पायनियरींग करू शकू. नाही का हे प्रशंसनीय ध्येय?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा