वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/९४ पृ. १
  • राज्य सेवेचा तुमचा ठेवा वाढवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • राज्य सेवेचा तुमचा ठेवा वाढवा
  • आमची राज्य सेवा—१९९४
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आणखी भाग घ्यायची इच्छा आहे का?
    आमची राज्य सेवा—२००१
  • आपली सेवा वाढवण्याचे मार्ग
    आमची राज्य सेवा—१९९९
  • तुम्ही तुमचे सेवाकार्य वाढवू शकता का?
    आमची राज्य सेवा—२००९
  • यहोवाच्या सेवेत कार्यमग्न राहणे
    आमची राज्य सेवा—१९९२
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—१९९४
km ९/९४ पृ. १

राज्य वेचा तुमचा ठेवा वाढवा

१ येशूने राज्य आशेची तुलना एका मौल्यवान ठेवीसोबत केली. (मत्त. १३:४४-४६) येशूच्या दृष्टांतातील लोकांनी त्यांचे सर्वस्व विकून त्याहून अधिक मोलाची गोष्ट विकत घेतली, त्यांच्याप्रमाणे आपण आहोत का? तसे असल्यास, सोयीस्कर नसले किंवा स्व-त्याग करावा लागत असला, तरी आपण देवाच्या राज्याला प्राधान्य देऊ.—मत्त. ६:१९-२२.

२ आमची राज्य सेवा एक ठेवा असल्यामुळे, ती वाढवण्याची आपली इच्छा असली पाहिजे. आमच्या जीवनातील वैयक्‍तिक मार्गाक्रमण काय दाखवून देतो? आम्ही आमचे राज्य कार्य वाढवत आहोत का? ते आम्ही, घरोघरचे कार्य, पुनर्भेटी घेणे, पवित्र शास्त्राभ्यास चालवणे व अनौपचारिकपणे साक्ष देणे यांचा समावेश असणाऱ्‍या विविध पैलूंमध्ये सहभाग घेण्याद्वारे करू शकतो.

३ ‘मी माझा सहभाग कसा वाढवू शकतो?’ नवीन सेवा वर्षाची सुरवात झालेली असताना, क्षेत्र सेवेत घालवत असलेला वेळ वाढवण्यासाठी काय करू शकतो हे पाहण्यास प्रत्येकाने त्याच्या व्यक्‍तिगत कार्याची उजळणी करणे उत्तम ठरेल. तो असे विचारू शकतो: ‘वेळोवेळी किंवा नियमितरित्या साहाय्यक पायनियर या नात्याने नाव नोंदवण्यासाठी मी माझ्या कार्यांची योजना करू शकतो का? केवळ काही बदल करून मी नियमित पायनियर सेवेत उतरू शकतो का?’ सप्टेंबर १ पर्यंत नाव नोंदवणारे नवीन पायनियर, पुढील पायनियर सेवा प्रशालेसाठी उपस्थित राहण्यास पात्र ठरतील.

४ काही प्रचारकांनी अधिक अनौपचारिक साक्षकार्य करण्याचे वैयक्‍तिक ध्येय ठेवले आहे. बहुतेकवेळा या कार्यामुळे उत्तम फळ मिळते. इतरांना परिणामकारी पुनर्भेटी घेण्यामध्ये सुधारणा करण्याची किंवा नवीन पवित्र शास्त्राभ्यास सुरू करण्याची गरज भासेल.

५ आमची सेवा कोणत्या ना कोणत्या प्रकारे मर्यादित आहे असा निष्कर्ष आम्ही काढला तर, ती वाढवण्यासाठी आम्ही काय करू शकतो? यशस्वीपणे अधिक ध्येये ज्यांनी गाठली ते अशी शिफारस करतात की, कोणत्याही किंमतीवर राज्य आस्थेस प्राधान्य देण्यासाठी आम्ही प्रथम निश्‍चय केला पाहिजे. (मत्त. ६:३३) यहोवावर भाव व पूर्णपणे विसंबून राहणे आवश्‍यक आहे. (२ करिंथ. ४:७) प्रामाणिक व नित्य प्रार्थना करण्याद्वारे त्याची मदत मिळवा. (लूक ११:८, ९) यहोवाच्या सेवेतील आमचा सहभाग वाढवण्याच्या खऱ्‍या प्रयत्नांना तो आशीर्वादित करील ही खात्री आम्हाला असू शकते.—१ योहान ५:१४.

६ यशस्वीपणे ज्यांनी सेवा वाढवली आहे अशा इतर बंधू व भगिणींशी बोला. निरुत्साही न होता त्यांनी अडथळ्यांवर मात कशी केली हे त्यांस विचारा. त्यांचे व्यक्‍तिगत अनुभवच तुम्हाला हे पटवून देतील की, अधिक सेवा साध्य करणे ही अशक्य गोष्ट नाही.

७ क्षेत्र सेवेविषयी तुम्ही टेहळणी बुरुज किंवा आमची राज्य सेवा यातील लेख वाचता तेव्हा, त्या सूचना तुम्ही तुमच्या सेवेसाठी कशा लागू करू शकता यावर प्रार्थनापूर्वक विचारविनिमय करा. मंडळीच्या सभा किंवा संमेलनांना उपस्थित असताना तेच करा. या लेखातील सूचना, मागील वर्षाच्या विभागीय संमेलनाच्या कार्यक्रमाचा भाग असलेल्या चर्चेवर आधारित आहेत. लेखांच्या श्रृंखलेतील हा पहिला लेख आहे जो मागोवा घेण्यास व त्या कार्यक्रमाद्वारे पुरवलेल्या उत्तेजनाचा अवलंब करण्यास आम्हाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

८ येशूने त्याच्या सेवेस फार गंभीरपणे घेतले व तिला सर्वांत महत्त्वाचे असे समजले. त्याने घोषित केले: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे . . . हेच माझे अन्‍न आहे.” (योहा. ४:३४) आम्हालाही तसेच वाटते का? आम्हाला तसे वाटत असल्यास, आम्ही आमचे कार्य वाढवण्यास मार्ग शोधून काढू व आमच्या ठेवीमधून इतरांसोबत ‘चांगल्या गोष्टींचा’ सहभाग करू.—मत्त. १२:३५; लूक ६:४५.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा